Home शहरं मुंबई palghar mob lynching : 'पालघर प्रकरणात अटक झालेले बहुतेक लोक भाजपचे' -...

palghar mob lynching : ‘पालघर प्रकरणात अटक झालेले बहुतेक लोक भाजपचे’ – congress spokesperson sachin sawant attacks bjp over palghar mob lynching case


मुंबई: पालघरमधील मॉब लिंचिंगच्या घटनेवरून राज्य सरकारवर टीका करणाऱ्यांना व सल्ले देणाऱ्या विरोधकांवर काँग्रसेनं जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘पालघरच्या घटनेवरून भाजप धार्मिक राजकारण करण्याचा हीन प्रयत्न करत आहे. प्रत्यक्षात या प्रकरणात अटक झालेले बहुसंख्य लोक भाजपचे आहेत,’ असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

Live: आम्ही गप्प बसलेलो नाही – उद्धव ठाकरे

पालघरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्येनंतर राजकारण तापले आहे. भाजपनं या घटनेवरून सरकारवर दोषारोप सुरू केले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर सचिन सावंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर जोरदार टीका केली आहे. ‘मॉब लिंचिंगचे केंद्र असलेल्या यूपीच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फोन करणं हा शहाजोगपणा आहे. खरंतर गडचिंचले ग्रुप ग्रामपंचायत हा भाजपचा बालेकिल्ला असून तिथं गेली दहा वर्षे भाजपचा सरंपच आहे. सध्या भाजपच्या चित्रा चौधरी या सरपंच आहेत. लिंचिंगच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये बहुसंख्य भाजपचे लोक आहेत, असं सावंत यांनी म्हटलं आहे.

वाचा: ‘कामगारांनो, घराच्या अंगणात, बाल्कनीत या…’


‘काही मुस्लिम वेशांतर करून मुले पळवून किडनी काढतात वा विहिरीत थुंकून करोना पसरवतात, अशी अफवा पालघरमध्ये होती. अशा अफवांनी समाजाला हिंसक बनवण्याचे कारस्थान देशात आजवर कोण करतय? साधूंचा वेश पाहूनही मॉब थांबत नाही हे भयानक आहे. या अफवांमागे कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे,’ अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

वाचा: संजय राऊतांना आशिष शेलारांचं जशास तसं उत्तर

‘गेली ५ वर्षे भाजप सत्तेत असताना धुळ्यात झालेली वा वर्षभरापूर्वी पालघरलाच झालेल्या किंवा राज्यातील अन्य घटनांना पायबंद घालू न शकणारे आज यावर राजकारण करत आहेत हे गंभीर आहे,’ असा संतापही सावंत यांनी व्यक्त केला आहे.

वाचा: ‘फडणवीस साहेब, मुख्यमंत्र्यांना काम करू द्या’

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

खोट्या कारणांचा विनाकारण आधार…

: केलंय म्हणजे मूल जन्माला घालायलाच हवं, हा समज खोडून काढत गेल्या काही वर्षांमध्ये अनेक महिलांनी जाणीवपूर्वक मूल न होऊ देण्याचा...

water of sewage treatment plant: ‘एसटीपी’चे पाणी होणार आणखी शुद्ध – water of sewage treatment plant will be further purified by aurangabad municipal corporation

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादमहापालिकेकडून येत्या काळात सीवरेज ट्रीटमेंट प्लांटचे (एसटीपी) पाणी अधिक शुद्ध करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार...

konkan vidarbha gramin bank: बँक लुटण्यासाठी अर्ध्या रात्री खिडकीतून आत घुसले, अचानक सायरन वाजला अन्… – robber tried to rob vidarbha konkan gramin bank...

हायलाइट्स:विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्नभंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील घटनासंपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्हीत कैदभंडारा: विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेत चोरीचा प्रयत्न झाला....

Recent Comments