Home देश pamela goswami cocaine case: pamela goswami cocaine case : पामेला गोस्वामी अंमली...

pamela goswami cocaine case: pamela goswami cocaine case : पामेला गोस्वामी अंमली पदार्थ तस्करी प्रकरण; भाजप नेते राकेश सिंह यांना अटक – pamela goswami cocaine case bjp leader rakesh singh arrested


कोलकाता: भाजप युवा मोर्चाच्या नेत्या पामेला गोस्वामी ( pamela goswami cocaine case ) यांनी अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी पक्षाचे नेते राकेश सिंह यांचं नाव घेतलं होतं. आता बर्धवान जिल्ह्यात त्यांना आज पोलिसांनी अटक केली आहे. रस्तेमार्गाने राज्यातून पळून जाण्याचा प्रयत्नात होते, असं सांगितलं जातंय. कोलकाता पोलिसांनी राकेश सिंह यांच्या दोन्ही मुलांना ताब्यात घेतले आहे. घरात येण्यापासून त्यांनी पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला होता.

अंमली पदार्थ प्रकरणी भाजप नेत्या पामेला गोस्वामी यांनी पक्षाच्या ज्या नेत्याचे नाव घेतले होते त्या राकेश सिंह यांच्या निवासस्थानावर पोलिसांना प्रवेश करण्यापासून रोखले गेले होते. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. न्यू अलीपूर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीप्रकरणी पोलिस कर्मचार्‍यांचे एक पथक भाजप नेते राकेश सिंह यांच्या निवासस्थानी गेले होते. राकेश सिंह हे भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांचे निकटचे सहकारी असल्याचं बोललं जातात.

सिंह यांचे पुत्र साहेब यांनी घराची तपासणी करण्यासाठी आलेल्या पोलिसांकडे कागदपत्रे दाखवण्याची मागणी केली. यावेळी पोलिस आणि त्यांच्या बाचाबाची झाली. आपण कुटुंबाला संबंधित कागदपत्रही दाखवली आणि कायद्यानुसार काम केलं असं पोलिसांचं म्हणणं आहे.

अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी राकेश सिंह यांना लालबाजार येथील कोलकाताच्या पोलिस मुख्यालय हजर होण्यास सांगण्यात आलं होतं. पण आपण काही कामानिमित्त दिल्लीला जात आहोत आणि २६ फेब्रुवारीला परत येऊ. त्यानंतर पोलिसांसमोर हजर होऊ असं त्यांनी पोलिसांना सांगितलं.

टूलकिट प्रकरण : पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवि हिला जामीन मंजूर

gujarat municipal election : गुजरात पालिका निवडणुका; हार्दिक पटेलांचा करिश्मा संपला! काँग्रेसची धुळधाण

भाजप युवा मोर्चाच्या राज्य सचिव पामेला गोस्वामी आणि त्यांचे मित्र प्रबीर कुमार डे यांना गेल्या आठवड्यात शुक्रवारी पोलिसांनी अटक केली. पामेला गोस्वामी यांच्या बॅग आणि कारमध्ये लपवलेले कोकेन पोलिसांनी घेतलेल्या झडतीत सापडले. यानंतर त्या दोघांनाही अटक करण्यात आली पामेला गोस्वामी यांनी अंमली पदार्थ प्रकरणात राकेश सिंह यांचं नाव घेतलं. त्यांची हा कट रचल्याचा आरोप केला. पण राकेश सिंह यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

new farm laws: farm laws : निवडणुकांमधून जनतेचे नवीन कृषी कायद्यांवर शिक्कामोर्तब, भाजपचा दावा – people support new farm laws in elections says prakash...

नवी दिल्लीः गुजरातमधील महापालिका निवडणुकांनंतर राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये भाजपचा मोठा विजय झाला आहे. नव्या कृषी कायद्यांना ( new farm laws ) शेतकरी आणि...

nanded govt officers horse latest news: ‘या’ अधिकाऱ्याला घोड्यावरून ऑफिसला यायचंय!; विनंती पत्र झालं व्हायरल – official seeks nod to tie horse on campus...

हायलाइट्स:नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याचं पत्र चर्चेत.कार्यालयाच्या आवारात घोडा बांधण्यासाठी मागितली परवानगी.अजब पत्राने जिल्हाधिकारी विपिन इटनकर पडले बुचकळ्यातनांदेड:नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना विभागात...

Recent Comments