Home देश पैसा पैसा pan aadhaar link deadline extended: पॅन-आधार जोडणीला पुन्हा मुदतवाढ ; 'ही' आहे...

pan aadhaar link deadline extended: पॅन-आधार जोडणीला पुन्हा मुदतवाढ ; ‘ही’ आहे अंतिम मुदत – pan aadhaar link deadline extended till march 2021


नवी दिल्ली : पॅन (परमनंट अकाऊंट नंबर) व आधार क्रमांक जोडणीस केंद्र सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. पॅन-आधार जोडणी आता ३१ मार्च २०२१ पर्यंत करता येईल. त्याशिवाय आयकर विभागाने २०१८-१९ या आर्थिक वर्षातील कर विवरण सादर करण्यास ३१ जुलै २०२० पर्यंत मुदत वाढवली आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढवल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या करदात्यांनी २०१८-१९ या वर्षाचे सुधारित कर विवरण पत्र (ITR) सादर केलेला नाही, अशा करदात्यांना ३० जूनपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र मुदतवाढ दिल्याने करदाते २०१८-१९ या वर्षाचे सुधारित कर विवरण पत्र आता ३१ जुलै २०२० पर्यंत सादर करू शकतात. ही डेडलाईन चुकली तर करदात्याला दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. २०१८-१९ या वर्षाचे सुधारित कर विवरण पत्र (ITR) यापूर्वी ३१ मार्च २०२० ही अंतिम मुदत दिली होती. नंतर त्यात ३० जूनपर्यंत वाढ करण्यात आली होती.

श्रीमंतांच्या संपत्तीला करोनाचा संसर्ग; दिग्गजांची मालमत्ता घटली
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) जारी केलेल्या अध्यादेशानुसार आता २०१८-१९ या आर्थिक वर्षातील ITR ३१ जुलै २०२० पर्यंत सादर करता येईल. यामुळे नोकरदारांना आणि करदात्यांना आयकर कलम ८० सी , ८० डी आणि ८० जी नुसार कर वजावटीचे नियोजन करण्यास अतिरिक्त एक महिन्याचा वेळ मिळणार आहे.

केंद्र सरकारने २५ मार्चपासून देशात टाळेबंदी जाहीर केली. नुकताच पाचवा लॉकडाउन ३० जूनपर्यंत वाढवला. त्यापार्श्वभूमीवर सरकारने कर विवरण (ITR) सादर करणे, पीपीएफ, पॅन आधार लिंक या सारख्या आर्थिक कामांची मुदत वाढवली होती. पॅन-आधार जोडणीस आतापर्यंत अनेकवेळा मुदतवाढ मिळाली आहे. यापूर्वी ३० जून २०२० ला मुदत संपणार होती. आधार क्रमांकाशी जोडणी न केलेले पॅन अवैध ठरू शकतील, अशी चुकीची माहिती पसरल्याने या प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र त्यात वेळोवेळी मुदतवाढ करण्यात आली. प्राप्तिकर विवरणपत्र सादर करताना आधार क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sudhir mungantiwar: ‘एकनाथ शिंदे, तुमच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता’ – eknath shinde has the potential to be chief minister says sudhir mungantiwar

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकाही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंद दाराआड झालेल्या चर्चेमुळे चर्चेत आलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी पुन्हा नवे वक्तव्य करून...

Chloe Zhao: आशियाचा सन्मान : क्लोई जाओ – chloe zhao is becoming the first asian woman to ever win the prize for best director

'करुणा सर्व बंधने पार करते आणि मग तुमची वेदना माझी वेदना बनते...' गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका क्लोई जाओ यांनी याच कार्यक्रमात व्यक्त...

Recent Comments