Home शहरं सोलापूर pandhapur coronavirus: pandharpur ashadhi wari: पंढरपुरात प्रदक्षिणामार्गावर आढळला करोना रुग्ण; प्रशासनानं दिल्या...

pandhapur coronavirus: pandharpur ashadhi wari: पंढरपुरात प्रदक्षिणामार्गावर आढळला करोना रुग्ण; प्रशासनानं दिल्या ‘या’ सूचना – covid -19 patient found in pandharpur


पंढरपूरः आषाढी यात्रा दोन दिवसावर आली असतानाच पंढरपुरात करोना रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे. प्रदक्षिणामार्गावर एक कोरोनाग्रस्त रुग्णाची नोंद झाल्यानं प्रशासनाची डोकेदुखी वाढली असली तरी एकादशी दिवशी पादुकांच्या नगर प्रदक्षिणेला कोणतीही अडचण येणार नसल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.

यंदा करोनाच्या संकटामुळे आषाढी यात्रा भरणार नसली तरी मानाच्या संत पादुका मात्र येणार आहेत. एकादशी दिवशी चंद्रभागेचे स्नान करून मंदिराची नगरप्रदक्षिणा करण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे. आज सकाळी नेमके प्रदसखींना मार्गावर एक कोरोना रुग्ण आढळल्यानं वरिष्ठ स्तरावर विचारविनिमय केल्यावर प्रदक्षिणेला अडचण नसल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे.

वाचाः आषाढी वारीला जाऊन करोनाचं संकट निवारण्याचं विठ्ठलाला साकडं घालणार: CM

एका बँकेचा संचालक असणारा शिक्षक करोनाग्रस्त निघाल्याने ४० पेक्षा जास्त निकटचे संपर्क आणि १०० पेक्षा जास्त दूर संपर्कातील लोकांना प्रशासनाने क्वारंटाईन करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाग्रस्त व्यक्ती बँकेच्या बैठकीलाही गेला असून शाळेतही जात असल्याने अजूनही त्याच्या संपर्कात आलेल्यांची माहिती प्रशासन घेत आहे . विशेष म्हणजे याची तपासणी केल्यामुळे तहसीलदार यांनाही क्वारंटाईन होण्याची वेळ अली असून त्या व्यक्तीनं नगरपालिकेचे कोव्हिड योद्धा प्रमाणपत्राचे वितरण केल्याने आता कोव्हिड योद्धेही अडचणीत आले आहेत

दरम्यान, प्रशासनाने या घटनेमुळे आषाढी यात्रेच्या नियोजनात कोणताही बदल झाला नसल्याचे सांगत वारकऱ्यांच्या शेकडो वर्षाच्या परंपरा पाळण्यात येणार असल्याचे सांगितले . यंदा आषाढीला करोनामुळे कोणत्याही वारकऱ्यांनी पंढरपूरला न येत घरी राहूनच विठुरायाची प्रार्थना करण्याचे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केलं आहे.

वाचाः ३० जूननंतर लॉकडाऊन उठणार नाही; पण अनेक गोष्टी सुरू होतील: उद्धव ठाकरे

आषाढी एकादशीचा सोहळा १जुलै रोजी होणार आहे. या अनुषंगाने यंदा केवळ मानाच्या संताच्या पादुका पंढरपूरात येणार आहे. राज्यात करोनाचं संकट असताना अशावेळी पंढरपूरात गर्दीमुळं करोनाचा फैलाव होऊ नये व ही वारी आरोग्यसंपन्न व्हावी यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून पंढरपूरात कडक संचारबंदी करण्यात यावी. यादृष्टीनं आता पोलिसांनी पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. जे भाविक कायदा मोडून घुसखोरी करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना मुळ जागी सोडून येणार असल्याचे, अतुल झेंडे यांनी सांगितले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ranjitsinh disale: वैश्विक शिक्षक : रणजितसिंह डिसले – india’s zp school teacher ranjitsinh disale wins 2020 global teacher prize

‘युनेस्को’ आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या ‘ग्लोबल टीचर’ या सन्मानासह सुमारे सात कोटी रुपयांचे पारितोषिक मिळविणारे रणजितसिंह डिसले हे खऱ्या अर्थाने वैश्विक शिक्षक...

आजचं राशीभविष्य… दिनांक ०५ डिसेंबर २०२०

आजचं राशीभविष्य... दिनांक ०५ डिसेंबर २०२० Source link

Recent Comments