Home महाराष्ट्र pandharpur vitthal mandir: 'विठुरायाच्या पूजेचा मान यंदा मुख्यमंत्र्यांसोबत सफाई कर्मचारी दाम्पत्याला मिळावा'...

pandharpur vitthal mandir: ‘विठुरायाच्या पूजेचा मान यंदा मुख्यमंत्र्यांसोबत सफाई कर्मचारी दाम्पत्याला मिळावा’ – varkari should avoid pandharpur temple visit on ashadi ekadashi


पंढरपूरः आषाढी एकादशीच्या सोहळयास पंढरपूरात गर्दी होऊ नये. यासाठी पोलिसाकडून २९ जून ते २ जुलै पर्यत परिसरात संचारबंदी करण्यात यावी. असा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. आषाढी काळात पंढरीत वारकरी येऊ नयेत. यासाठी १५०० पोलिसांचा बंदोबस्त देखील उभा करण्यात आला असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे. दरम्यान उद्या राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे पंढरपुरात येऊन पाहणी करणार आहेत. (Pandharpur Vitthal Mandir)

आषाढी एकादशीचा सोहळा १जुलै रोजी होणार आहे. या अनुषंगाने यंदा केवळ मानाच्या संताच्या पादुका पंढरपूरात येणार आहे. राज्यात करोनाचं संकट असताना अशावेळी पंढरपूरात गर्दीमुळं करोनाचा फैलाव होऊ नये व ही वारी आरोग्यसंपन्न व्हावी यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून पंढरपूरात कडक संचारबंदी करण्यात यावी. यादृष्टीनं आता पोलिसांनी पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. जे भाविक कायदा मोडून घुसखोरी करतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना मुळ जागी सोडून येणार असल्याचे, अतुल झेंडे यांनी सांगितले.

साधारणपणे दशमीच्या दिवशी अर्थात ३० जून रोजी पालख्या पंढरपूरात येतील. तत्पूर्वी एक दिवस म्हणजेच २९ जून पासून पंढरपूरात संचारबंदी सुरू करण्याची तयारी प्रशासनाची आहे. तसेच २ जुलै रोजी संताच्या पालख्या पंढरपूरचा निरोप घेणार आहेत. त्यादृष्टीने गुरूवारी मध्यरात्रीपर्यत संचारबंदी असावी. असा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे .

वाचाः रोहित पवारांमुळे जळगावातील प्रस्तावित पोलीस प्रशिक्षण केंद्र जामखडला

मुख्यमंत्र्यांसोबत पूजेला यंदा स्वच्छता कर्मचारी दाम्पत्याला मान मिळावा

करोनामुळे यंदा आषाढी वारीसाठी एकही वारकरी पंढरपुरात येऊ शकणार नसल्यानं एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत करोना विरोधात लढणाऱ्या सफाई कर्मचारी दाम्पत्याला सहभागी करून घेण्याची मागणी नगरसेवक कृष्ण वाघमारे यांनी प्रशासनाकडे कलेची आहे. दरवर्षी दर्शन रांगेत पहिला असणाऱ्या वारकरी दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसमवेत महापूजेत सहभागी होण्याचा मान देण्याची परंपरा आहे. यंदा मात्र वारकरीच येणार नसल्याने हा मान नागरिकांच्या आरोग्यासाठी जीवावर उदार होऊन करोनाच्या काळात काम करणाऱ्या सफाई कर्मचारी दाम्पत्याला दिल्यास त्याच्या कार्याची ही पोचपावती ठरेल, असे वाघमारे यांनी सांगितले . आजपर्यंत वर्षानुवर्षे गावं व शहरं स्वच्छता करणारा हा वर्ग वारकऱ्यांसाठी गाव स्वच्छ ठेवतो पण त्याला कधीच मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेता येत नाही. यंदा हि संधी शासनाने दिल्यास या वर्गाला आयुष्यभराचे समाधान मिळेल, असेही ते म्हणाले.

वाचाः प्रवाशांच्या खिशाला कात्री; मुंबईत रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीची शक्यताSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

दिल्लीतील 'या' अधिकाऱ्याच्या नावानं पुणे मेट्रोच्या संचालकांना फोन, म्हणाला…

पुणे: केंद्रीय सचिवांच्या नावाने महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)चे प्रमुख व मेट्रोचे कार्यकारी संचालक यांना फोन करून मेट्रोचे कंत्राट मिळवून देण्यास सांगितल्याचा...

Surat Truck Accident: सूरत अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधानांकडून दोन लाखांची मदत! – ‘the loss of lives due to a truck accident in surat is...

नवी दिल्ली : गुजरातच्या सूरतमध्ये एका फुटपाथवर झोपलेल्यांना ट्रकनं चिरडल्यानं तब्बल १५ मजुरांना प्राण गमवावे लागलेत. सूरत जिल्ह्याच्या कोसंबामध्ये हा अपघात घडला. या...

Sex with 12-year-olds is legal: अजब देश! वयाच्या १२ व्या वर्षी सेक्सला मंजुरी पण घटस्फोट बेकायदेशीर – sex with 12-year-olds is legal in the...

मनिला: वयाच्या १२ व्या वर्षी सहमतीने लैंगिक संबंध ठेवण्याची मंजुरी आहे. मात्र, या देशात घटस्फोट देणे हे बेकायदेशीर आहे. फिलीपाइन्स या देशात अशा...

Recent Comments