Home देश parliamentary committee on covid: करोना संकटात खासगी हॉस्पिटल्सकडून लूट, संसदीय समितीचा अहवाल...

parliamentary committee on covid: करोना संकटात खासगी हॉस्पिटल्सकडून लूट, संसदीय समितीचा अहवाल – parliamentary committee on covid submit report


नवी दिल्ली: संपर्ण देश करोना संकटाचा सामना ( coronavirus india ) करत आहे. पण करोनाशी लढताना सरकारी आरोग्य सेवांचा अभाव आहे. तसेच खासगी रुग्णालयांबाबत सरकारकडून कोणतेही स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. यामुळे, करोनाग्रस्त रूग्णांना संकटाच्या काळात उपचारासाठी जास्त पैसा खर्च करावा लागला. खासगी रुग्णालयांनी रूग्णाच्या उपचारासाठी जास्त पैसे आकारले. संसदीय समितीने ( covid 19 committee ) शनिवारी आपल्या अहवालात ही माहिती दिली.

करोनाची रुग्णसंख्या वाढत असताना सरकारी रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता होती. तसेच या संकटाच्या आजाराच्या उपचारासाठी विशिष्ट मार्गदर्शक सूचनांचा अभाव होता. यामुळे खासगी रुग्णालयांनी मोठ्या प्रमाणात रुग्णांकडून पैसे घेतले. खासगी रूग्णालयांवर कोरोनावर उपचार करण्यासाठी काही निश्चित दर लावण्यात आले असते तर बरेच मृत्यू टाळता आले असते, असं संसदीय समितीने म्हटले आहे.

सरकारचा आरोग्यवर कमी खर्च

आरोग्य विषयक स्थायी संसदीय समितीचे अध्यक्ष राम गोपाल यादव यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना ‘करोना व्हायरचा प्रादुर्भाव आणि व्यवस्थापन’ या विषयावरील अहवाल सादर केला. करोना संकटावरील सादर झालेला हा अहवाल इतर कुठल्या एका संसदीय समितीने सादर केलेला पहिलाच अहवाल आहे. १३० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात सरकारकडून आरोग्यावर होणारा खर्च ‘अत्यंत कमी’ आहे आणि साथीच्या रोगाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी भारतीय आरोग्य यंत्रणेच्या नाजूक स्थितीने एक मोठी अडचण आली आहे, असं समितीने म्हटलंय.

coronavirus- करोना: दिवसाला आढळले ‘एवढे’ रुग्ण, ‘या’ ५ शहरांमध्ये नाइट कर्फ्यू

करोना लस तीन ते चार महिन्यांत : डॉ. हर्षवर्धन

सार्वजनिक आरोग्यात गुंतवणुकीची गरज

सार्वजनिक आरोग्य सेवेत गुंतवणूक वाढवण्याची शिफारस संसदीय समितीने या अहवालातून सरकारला केली आहे. आगामी दोन वर्षांच्या आत जीडीपीच्या २.५ टक्क्यांपर्यंतच्या खर्च राष्ट्रीय आरोग्य धोरणांचे उद्दीष्ट निश्चित करण्यासाठी प्रयत्न केले जावेत. कारण २०२५ चा नियोजित कालावधी अजून खूप दूर आहे आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात टाकता येणार नाही, असं संसदीय समितीने अहवालात नमुद केलंय. करोना संटकात ज्या डॉक्टरांनी जीव गमावला त्यांना शहीद घोषित करावं. तसंच त्यांच्या कुटुंबीयांना पुरेसा मोबदला देण्यात यावा, अशी शिफारसही समितीने केली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

proposal to allow corporate house to set up banks: कॉर्पोरेट्सचा बँकिंग प्रवेश – rajiv madhav joshi article on proposal to allow corporate houses to...

राजीव माधव जोशी आपली बँकिंग सिस्टीम सक्षम व्हावी म्हणून अलीकडेच सादर केलेल्या अहवालानुसार पतसंस्था व बिगर बँकिंग कंपन्यांना नवीन बँक स्थापन करण्याची मुभा...

trp case: टीआरपीप्रकरणी मीडिया ट्रायल नको – bombay high court has directed news channel should not media trial in trp case

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलेले असताना, या खटल्यावर प्रभाव टाकणारे मीडिया ट्रायल वाहिन्यांकडून होऊ नये. त्यादृष्टीने...

Sourav Ganguly Announced 5 T 20 Match – करोना काळात हा संघ येणार भारत दौऱ्यावर; BCCIकडून घोषणा

नवी दिल्ली: भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून परतल्यानंतर इंग्लंडविरुद्ध कसोटी,वनडे आणि टी-२० मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीने...

Recent Comments