काय होता वाद?
पतंजली योगपीठाचे प्रमुख रामदेव बाबा यांनी मंगळवारी करोनावर कोरोनिल नावाचे औषध लाँच केले. क्लिनिकल ट्रायलमध्ये हे औषध १०० टक्के यशस्वी ठरल्याचा दावा त्यांनी केला. हे औषध बाजारात आणण्याची घोषणाही त्यांनी केली होती. पण पतंजलीच्या करोनावरील औषधाची माहिती नसल्याचं आयुष मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. तसंच या औषधावर कशा प्रकारे वैज्ञानिक अभ्यास केला गेला याची सूचना नाहीए. तसंच करोनावरील औषधाचे कम्पोजिशन, रिसर्च स्टडी आणि सॅम्पल साइजसह सर्व माहिती सादर करण्याच्या सूचना आयुष मंत्रालयाकडून पतंजली आयुर्वेद लिमिटेडला देण्यात आल्या होत्या.
राजीव गांधी फाउंडेशनला चीनचा पैसा, भाजपचा सनसनाटी आरोप
सोशल मीडियावर रंगली चर्चा
उत्तराखंड सरकारकडून पतंजलीच्या या आयुर्वेदिक औषधाच्या लायसन्सबाबत माहिती मागवण्यात आली होती. यावरून मोठा वाद रंगला. सोशल मीडियावरही जोरदार चर्चा झाली. यानंतर पतंजली योगपीठाचे आचार्य बालकृष्ण यांनी आयुष मंत्रालयाला एक पत्र लिहिलंय. पतंजलीची कागदपत्र मिळाली आहेत आणि ती तपासली जात आहेत, असं उत्तर आयुष मंत्रालयाकडून या पत्राला देण्यात आलं.
करोनावरील औषधाची पहिली खेप महाराष्ट्रासह ५ राज्यांना रवाना
महाराष्ट्रात पतंजलीच्या करोनिलवर बंदी
योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली संस्थेने लाँच केलेल्या ‘कोरोनिल’ या करोनावरील औषधांवर राजस्थान सरकारने बंदी घातली आहे. आता महाराष्ट्र सरकारनेही या औषधावर बंदी घातली आहे. महाराष्ट्रात कोरोनिल औषधांची विक्री करण्यास मनाई करण्यात येत आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगतिलं. त्यामुळे रामदेव बाबांनासाठी हा मोठा झटका मानला जातोय.