Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल paytm: Paytm चा इशारा, एका चुकीमुळे रिकामे होईल अकाउंट - paytm has...

paytm: Paytm चा इशारा, एका चुकीमुळे रिकामे होईल अकाउंट – paytm has warning for all users. says beware of kyc completion, account block calls, sms


नवी दिल्लीः पेटीएम केवायसी (Paytm KYC) च्या नावावर फसवणूक करीत असल्याचे समोर आले आहे. प्रसिद्ध रिचार्ज आणि पेमेंट अॅप Paytm ने आपल्या युजर्संना एक इशारा दिला आहे. कंपनीने केवायसी आणि अकाउंट ब्लॉकच्या नावावर फसवणूक करणाऱ्यांपासून सावध राहा, असे म्हटले आहे. जर तुम्ही पेटीएम युजर्स असाल तर या गोष्टी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा काही सेकंदात तुमचे बँक अकाउंट रिकामे होवू शकते.

वाचाः रियलमीच्या या फोनमध्ये 5000mAh बॅटरी, किंमत ९ हजारांपेक्षा कमी

या सारख्या एसएमएसपासून राहा सावध
– Your Paytm KYC has expired (तुमची पेटीएम KYC संपली आहे)
– Or it needs to be renewed (याला नुतनीकरण करण्याची गरज आहे)
– Or your account will be blocked in 24 hours (तुमचे अकाउंट २४ तासांत ब्लॉक करण्यात येईल.

याप्रमाणे होतो फ्रॉड
तुम्हाला एसएमएस किंवा फोन करून केवायसी किंवा अन्य कारण सांगून वैयक्तिक माहिती विचारली जाते. अनेकवेळा युजर्संकडून Anydesk या सारखा कोणताही अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. Anydesk, TeamViewer, किंवा QuickSupport यासारखे अॅप इन्स्टॉल केल्यानंतर एक ९ डिजिट कोड जनरेट केले जाते. युजर्सला या कोड मागितले जाते. कोड मिळाल्यानंतर हॅकर्स तुमच्या फोनचा अॅक्सेस मिळतो. आता तुमच्या फोनची स्क्रीन सहज ट्रॅक केले जाते. यावरून पेटीएम आणि मोबाइल बँकिंग अॅप अॅक्सेस घेतात व तुमचे अकाउंट रिकामे करू शकतात.

वाचाः जिओचे धमाकेदार डेटा पॅक, ५१ रुपयांपासून सुरू, २४० जीबी पर्यंत डेटा

एक अन्य प्रकारे म्हणजेच पेटीएम सारखी दिसणारी फेक वेबसाईट बनवून तुमचे पासवर्ड आणि ओटीपी जाणून घेतात. हॅकर्स www.paytmuser.com, www.kycpaytm.in किंवा jn29832.ngrok.io/index.php वेबसाईट बनवतात. ही दिसायला अधिकृत वेबसाइट दिसते. परंतु, ती खोटी असते. युजर्स या वेबसाइटवर क्लिक केल्यानंतर आपली माहिती नमूद करताच ही माहिती हॅकर्सला मिळते.

वाचाः गुगल प्ले स्टोरवर मिळाले १७ धोकादायक अॅप्स, तात्काळ डिलीट करा

या गोष्टी ध्यानात ठेवा

>> पेटीएम केवायसी नेहमी कंपनीची अधिकृत स्टोर किंवा त्यांनी पाठवलेल्या प्रतिनिधीकडून करून घ्या.

>> पेटीएम कधीही ऑनलाइन केवायसी किंवा एसएमएस पाठवत नाही. कंपनीच्या मेसेजमध्ये केवळ अपॉइंटमेंट करण्यासाठी किंवा जवळच्या केवायसी पॉइंट लोकेट करण्यासाठी लिंक होते.

>> पेटीएम कधीही कॉल करून तुम्हाला कोणताही अॅप इन्स्टॉल करावा असे सांगत नाही.

>> पेटीएम कधीही Paytm Minimum KYC साठी कोणताही एसएमएस किंवा ईमेल पाठवत नाही.

>> कंपनी कॅशबॅक साठी कोणतीही लिंक पाठवत नाही. तुमचे कॅशबॅक थेट तुमच्या पेटीएम वॉलेट किंवा बँक खात्यात जमा होते.

>> पेटीएम कर्मचारी तुम्हाला कोणताही पिन, ओटीपी, पासवर्ड रिसेट लिंक, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड सीव्हीव्ही किंवा पिन बँक डिटेल्ससंबंधी माहिती विचारत नाही.

>> जर पेटीएम एजंट केवायसी साठी आला तर त्याचे आयडी कार्ड चेक करा.

>> पेटीएम कधीही तुम्हाला Paytm.com सोडून कोणत्याही यूआरएलवर डिटेल्स टाकण्यास सांगत नाही. कंपनी कधीही कोणत्याही प्रकारे लॉटरी किंवा नोंदणी फीस किंवा टॅक्स पैसे मागत नाही. हे सर्व लक्षपूर्वक पाहिल्यास आपण आर्थिक फसवणूक पासून दूर राहू शकतो.

वाचाः चीनच्या ब्रँड्सवर अशी मात करणार मायक्रोमॅक्स, लावा आणि कार्बन

वाचाःशाओमीने लपवले नाव, लिहिले ‘मेड इन इंडिया’

वाचाः फ्लिपकार्टवर सेल, १०००० ₹ पर्यंत डिस्काउंटSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Road Accidents in India: हा तर निव्वळ आत्मघात – road accidents after lockdown in india

करोनामुळे देशभरात वाहतूक मंदावली होती आणि त्यामुळे अपघात व अपघाती मृत्यूंची संख्याही कमी झाली होती. मात्र, आता टाळेबंदी संपल्यानंतर पुन्हा रस्तेअपघातांचे प्रमाण करोनापूर्व...

Recent Comments