Home देश पैसा पैसा Petrol Diesel Price in Mumbai Today: पेट्रोल, डिझेलची पुन्हा दरवाढ, पाहा काय...

Petrol Diesel Price in Mumbai Today: पेट्रोल, डिझेलची पुन्हा दरवाढ, पाहा काय आहे आजचा दर


नवी दिल्लीः पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सलग सहाव्यांदा दरवाढ करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. पेट्रोलच्या दरात आज प्रतिलिटर ५७ पैसे तर डिझेलच्या दरात ५९ पैसे प्रतिलिटर इतकी वाढ आज करण्यात आलीय. गेल्या काही दिवसांतल्या दरवाढीने पेट्रोल ३.३१ रुपये तर डिझेल ३.४२ रुपयांची एकूण दरवाढ वाढ झाली आहे.

आजच्या दरवाढीनुसार मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८१.५३ रुपये इतका झाला आहे. पेट्रोलचा कालचा दर ८०.९८ रुपये इतका होता. तर डिझेलचा दर ७१.४८ रुपये इतका झाला आहे. डिझेलचा कालचा दर ७०. ९२ रुपये प्रतिलिट इतका होता. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव घसरत असल्याने मुंबईतील पेट्रोल, डिझेलचे दर वाढत आहेत. येत्या काही काळात सरकारकडून उत्पादन शुल्क कमी करण्याची शक्यता आहे. यामुळे पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जातेय.

दिल्लीत पेट्रोल ७४.५७ रुपये झाले आहे. पेट्रोलचा अधीचा दर ७४ रुपये प्रतिलिटर इतका होता. तसंच डिझेलचंही आहे. डिझेलचा आधीचा दर हा ७२.२२ रुपये इतका होता. तो वाढून आता ७२.८१ रुपये प्रतिलिटर झाला आहे. प्रत्येक राज्यातील व्हॅट आणि कर रचनेनुसार पेट्रोल, डिझेलचे दर वेगवेगळे आहेत. ८२ दिवसांच्या लॉकडाऊननंतर तेल कंपन्यांची सलग सहाव्यांदा दरवाढ आहे. तेल कंपन्यांकडून रविवारपासून ही दरवाढ सुरू आहे.

रुपयाचा भाव घसरला

अमेरिकी डॉलर जागतिक चलन बाजारात सक्षम झाल्याने भारतीय रुपया गुरुवारी डॉलरच्या तुलनेत २० पैशांनी घसरला. एका अमेरिकी डॉलरसाठी ७५.५९ रुपये मोजावे लागले. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने अर्थव्यवस्थेचे चित्र नकारात्मक रंगवल्यामुळे विदेशी चलन व्यवहार करणाऱ्यांचा धीर खचला. त्याचा परिणाम म्हणून गुरुवारी चलन बाजार उघडला तेव्हा रुपया एका डॉलरसाठी ७५.८१ या पातळीवर होता. दिवसभरात तो थोडासा सावरला. परंतु अखेर २० पैशांनी घसरला.

करोनानंतर विकासदरात वाढ?

सध्या देशाची अर्थव्यवस्था संकटात असली, तरी लवकरच ती पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. जगभरातील सर्वांत मोठ्या दोन एजन्सींनी भारताची आर्थिक स्थिती लवकरच सुधारण्याची शक्यता असल्याचे नमूद केले आहे. फिच आणि एस अॅण्ड पी या आंतरराष्ट्रीय एजन्सींनी आगामी दोन वर्षांत भारताच्या आर्थिक स्थितीबाबत सुचिन्ह व्यक्त केले आहे. फिचच्या मते आगामी दोन वर्षांमध्ये भारताचा विकास दर ९.५ टक्क्यांवर राहण्याची शक्यता आहे. एस अॅण्ड पीच्या मते आगामी दोन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग ८.५ टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. मात्र, रेटिंग एजन्सींच्या मते देशाची अर्थव्यवस्था वेगाने रूळावर येण्यासाठी वित्तीय क्षेत्रात आणि कामगार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

coronavirus in maharashtra: राज्यात करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ; रिकव्हरी रेटही वाढला – maharashtra reports 8,142 new covid 19 cases and 23,371 discharges in the...

मुंबईः राज्यात आज १८० करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, आज तब्बल २३ हजार ३७१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर, राज्यातील...

E Commerce company festive sale: आॅनलाईन शाॅपींग जोरात ; ई-कॉमर्स कंपन्यांची चार दिवसांत २२००० कोटींची विक्री – e commerce festive season sale worth rs...

बेंगळुरू : नवरात्री सोबतच ई-कॉमर्स कंपन्यांचा शॉपींग फेस्टिव्हल सुरु झाला आहे. जास्तीत जास्त सवलती आणि आकर्षक ऑफर्समधून प्रत्येक कंपनी ग्राहकांना भूरळ पडत आहेत....

Recent Comments