Home देश पैसा पैसा Petrol Diesel Price Today: पेट्रोल नव्वदीच्या उंबरठ्यावर ; सलग २० व्या दिवशी...

Petrol Diesel Price Today: पेट्रोल नव्वदीच्या उंबरठ्यावर ; सलग २० व्या दिवशी इंधन दरवाढ – Petrol Diesel Price Hike On 20th Consecutive Day


मुंबई : देशात इंधन दरवाढीचा सपाट २० व्या दिवशी कायम आहे. शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ झाली आहे. त्यामुळे माल वाहतुकीचा खर्च वाढणार असून महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. दरम्यान, इंधन दरवाढीविरोधात देशभरात आंदोलने केली जात आहेत. मात्र पेट्रोलियम कंपन्यांचा दरवाढीचा सपाटा कायम आहे.

आज शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत १५ ते २० पैशांनी वाढल्या आहेत. आज मुंबईत पेट्रोलचा भाव ८६.९१ रुपये झाला आहे. त्यात २१ पैशांची वाढ झाली. तर डिझेलचा भाव ७८.५१ रुपये झाला आहे. कालच्या तुलनेत डिझेल १७ पैशांनी वधारले. २० दिवसांत पेट्रोल ८.८० रुपये तर डिझेल १०.५६ रुपयांनी महागले आहे.

दिल्लीत शुक्रवारी पेट्रोलचा भाव ८०.१३ रुपये झाला.तर डिझेलमध्ये आज १७ पैशांची वाढ झाली आणि डिझेलचा भाव ८०.१९ रुपयांवर गेला गुरुवारी दिल्लीत डिझेलने ८० रुपयांची पातळी ओलांडली होती. कोलकात्यात आज पेट्रोल ८१.८२ रुपये आहे. तर चेन्नईत पेट्रोलचा दर ८३.३७ रुपयांवर गेला आहे. त्यात १७ पैशांची वाढ झाली. कोलकात्यात डिझेल ७५.३४ रुपये झाले आहे. तर चेन्नईत डिझेलने ७७.४४ रुपयांचा स्तर गाठला आहे. करोनाची साथ रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये इंधनाचा दैनंदीन आढावा तात्पुरता बंद होता. मात्र लॉकडाउन शिथिल झाल्याने ७ जूनपासून पेट्रोलियम कंपन्यांनी दररोजची दर निश्चिती पुन्हा सुरु केली.

डिझेलच्या वाढत्या किमतींनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि माल वाहतुकीला जबर आर्थिक फटका बसणार आहे. व्हॅट आणि उत्पादन शुल्कवाढीने डिझेलच्या किंमती झपाट्याने वाढल्या आणि पेट्रोल आणि डिझेलमधीन दर तफावत भरुन निघाली आहे. पेट्रोलच्या किरकोळ दरामध्ये कराचा वाटा प्रतिलीटर सरासरी ५०.६९ रुपये किंवा ६४ टक्के असतो. यामध्ये केंद्रीय उत्पादनशुल्क ३२.९८ रुपये असते, तर राज्य मूल्यवर्धित कर (व्हॅट) सरासरी १७.७१ रुपये असतो.डिझेलच्या किरकोळ दरामध्ये कराचा वाटा प्रतिलीटर सरासरी ६३ टक्के असतो. त्यामुळे एकूण ४९.४३ रुपये प्रतिलीटर कर डिझेलच्या किरकोल दरावर आकारला जातो. यामध्ये केंद्रीय उत्पादनशुल्काचे ३१.८३ रुपये तर राज्य मूल्यवर्धित कराचा वाटा १७.६० रुपये असतो. यापूर्वी १६ ऑक्टोबर २०१८ रोजी दिल्लीमध्ये डिझेलचा दर सर्वाधिक ७५.६९ रुपये होता. त्याआधी ४ ऑक्टोबर २०१८ रोजी पेट्रोलचा दर राजधानी उच्चांकी ८४ रुपये राहिला होता.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

television news News : कपिल शर्मानं मौन सोडलं;पडद्यावरच्या ‘भीष्म पितामह’यांना दिलं ‘हे’ उत्तर – kapil sharma finally responds to mukesh khanna’s attack on his...

मुंबई: कॉमेडी किंग कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये अश्लिल भाषेचा वापर करत हुल्लडबाजी सुरु असते , अशी टीका अभिनेते मुकेश खन्ना यांनी...

Rishabh Pant Is Recover From Injury And He Will Be Play In Todays Match Against Kings Eleven Punjab – IPL2020: दिल्लीसाठी गूड न्यूज, पंजाबविरुद्धचा...

दुबई : पंजाबबरोबरचा सामना सुरु होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. दिल्लीच्या संघात एका धडाकेबाज खेळाडूचे आज पुनरागमन होऊ शकते,...

Recent Comments