Home देश पैसा पैसा Petrol price today: दरवाढीचा धडाका कायम ; आज पुन्हा पेट्रोल-डिझेल महागले -...

Petrol price today: दरवाढीचा धडाका कायम ; आज पुन्हा पेट्रोल-डिझेल महागले – Diesel Crossed 80 Mark In Delhi 19th Day Fuel Hike


मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांनी ७ जूनपासून सुरु केलेला दरवाढीचा सपाटा सलग १९व्या दिवशी सुरूच आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत १४ ते १५ पैशांनी वाढल्या आहेत. १९ दिवसांत पेट्रोल ८.६६ रुपये तर डिझेल १०.३९ रुपयांनी महागले आहे. दिल्लीत डिझेलच्या ८० रुपयांची पातळी ओलांडली आहे.

सलग तिसऱ्या आठवाड्यात कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. यातून कंपन्यांची आर्थिक स्थिती सावरणार आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव ४० डॉलरच्या आसपास आहेत. मात्र देशातील इंधन दर हे झपाट्याने वाढत आहेत. कंपन्यांनी बुधवारी पेट्रोलचे दर मात्र स्थिर ठेवले होते. आज गुरुवारी त्यामध्ये वाढ केली. आज मुंबईत पेट्रोलचा भाव ८६.७० रुपये झाला आहे. त्यात १६ पैशांची वाढ झाली. तर डिझेलचा भाव ७८.३४ रुपये झाला आहे.

…तर तुमचा विमा प्रिमियम वाढणार; ‘ही’ आहेत त्यामागची कारणे
सलग १९ व्या दिवशी इंधन दरवाढ झाली असून यामुळे ग्राहकांचे कंबरडे मोडून निघाले आहे. विशेष म्हणून डिझेलच्या वाढत्या किमतींनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि माल वाहतुकीला जबर आर्थिक फटका बसणार आहे. व्हॅट आणि उत्पादन शुल्कवाढीने डिझेलच्या किंमती झपाट्याने वाढल्या आणि पेट्रोल आणि डिझेलमधीन दर तफावत भरुन निघाली आहे.

दिल्लीत गुरुवारी पेट्रोलचा भाव ७९.९२ रुपये झाला. तर डिझेलमध्ये आज १४ पैशांची वाढ झाली. या दरवाढीने राजधानीत पहिल्यांदाच डिझेलच्या किमती ८० रुपयांवर गेल्या आहेत. आज दिल्लीत डिझेलचा भाव ८०.०२ रुपये झाला. बुधवारी तो ७९.८८ रुपये होता. कोलकात्यात आज पेट्रोल ८१.६१ रुपये आहे. तर चेन्नईत पेट्रोलचा दर ८३.१८ रुपयांवर गेला आहे. त्यात १७ पैशांची वाढ झाली. कोलकात्यात डिझेल ७५.१८ रुपये झाले आहे. तर चेन्नईत डिझेलने ७७.२९ रुपयांचा स्तर गाठला आहे. करोनाची साथ रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये इंधनाचा दैनंदीन आढावा तात्पुरता बंद होता. मात्र लॉकडाउन शिथिल झाल्याने ७ जूनपासून पेट्रोलियम कंपन्यांनी दररोजची दर निश्चिती पुन्हा सुरु केली.

हिंदुजा बंधूंमध्ये दीवार ; संपत्तीसाठी चढले कोर्टाची पायरी
देशभरात ही दरवाढ झाली असून प्रत्येक राज्याच्या मूल्यवर्धित करानुसार (व्हॅट) दोन्ही इंधनांचे दर बदलते राहिले आहेत. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंधनांच्या किरकोळ दरामध्ये करांचा वाटा एकूण दराच्या दोन तृतीयांश असतो. पेट्रोलच्या किरकोळ दरामध्ये कराचा वाटा प्रतिलीटर सरासरी ५०.६९ रुपये किंवा ६४ टक्के असतो. यामध्ये केंद्रीय उत्पादनशुल्क ३२.९८ रुपये असते, तर राज्य मूल्यवर्धित कर (व्हॅट) सरासरी १७.७१ रुपये असतो.डिझेलच्या किरकोळ दरामध्ये कराचा वाटा प्रतिलीटर सरासरी ६३ टक्के असतो. त्यामुळे एकूण ४९.४३ रुपये प्रतिलीटर कर डिझेलच्या किरकोल दरावर आकारला जातो. यामध्ये केंद्रीय उत्पादनशुल्काचे ३१.८३ रुपये तर राज्य मूल्यवर्धित कराचा वाटा १७.६० रुपये असतो. यापूर्वी १६ ऑक्टोबर २०१८ रोजी दिल्लीमध्ये डिझेलचा दर सर्वाधिक ७५.६९ रुपये होता. त्याआधी ४ ऑक्टोबर २०१८ रोजी पेट्रोलचा दर राजधानी उच्चांकी ८४ रुपये राहिला होता.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

lord arjuna promise: आस्वाद – dr namdev shastri article on lord arjuna promise and taste

न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्रीसत्य जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत मनुष्यात संशय असतो. आपल्यात संशय आहे, याचा आपल्यालाच संशय येत नसतो, तरीदेखील तो असतो. याचं...

Adesh Bandekar Selected As Brand Ambassador Of Matheran – आदेश बांदेकर बनले माथेरानचे ब्रँड अॅम्बॅसेडर; नेमकं काय करणार? | Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधीमहाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानचे ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून सिद्धीविनायक न्यासाचे अध्यक्ष आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांची निवड करण्यात आली...

Recent Comments