गेल्या आठवड्यात कंपन्यांनी दोन दिवस दरवाढ केली होती. त्यानंतर सलग पाच दिवस इंधन दर स्थिर ठेवले होते. मात्र बुधवार आणि गुरुवार असे सलग दोन दिवस पुन्हा एकदा दरवाढीचा सपाटा लावल्याने इंधन दर विक्रमी पातळीच्या उंबरठ्यावर आहेत. जागतिक बाजारात मात्र कच्च्या तेलातील तेजी कायम आहे. आज सिंगापूरमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ५२.८१ डॉलर आहे. ब्रेंट क्रूडचा भाव प्रती बॅरल ५५.८८ डॉलर झाला आहे.
सुवर्ण झळाळी ; आज पुन्हा सोने महागले, चांदी मात्र स्वस्त
सौदी अरेबियाने पुढील काही महिन्यांत उत्पन्न कपात जाहीर केल्याने डब्ल्यूटीआय क्रूडचे दर १.८४% नी वाढले व ते ५३.२ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. जगातील प्रमुख तेल उत्पादक सौदी अरेबियाने नवीन साथीच्या आजारामुळे सुरू झालेल्या निर्बंधादरम्यान उत्पादन स्थिर ठेवण्यासाठी दररोज १० लाख बॅरल अतिरिक्त उत्पादन कपात करण्याची घोषणा केली. यामुळेही तेलाच्या दरांना काहीसा आधार मिळाला.
Budget 2021 यंदा कर सवलती विसरा;’बजेट’मध्ये करदात्यांची होणार निराशा,तज्ज्ञांचे भाकीत
ओपेक आणि रशियासह इतर सहकारी संघटना अर्थात ओपेक+ यांनीही येत्या काही महिन्यात उत्पादन स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला. याउलट, कोव्हिड-१९ रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये नव्याने निर्बंध लादण्यात आले. यात ब्रिटन, चीन आणि जर्मनीचाही समावेश आहे. यामुळे तेलाच्या दरांबाबत खबरदारी बाळगली जात आहे. अमेरिकेतील वाढती राजकीय अस्थिरता आणि साथीमुळे वाढणारी चिंता यामुळे तेलाचे दर आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे.