Home देश पैसा पैसा Petrol Rate today: दरवाढ सुरूच ; जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव -...

Petrol Rate today: दरवाढ सुरूच ; जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव – petrol and diesel price in mumbai and across major city


मुंबई : करोनाची साथ रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाउनमध्ये इंधनाचा दैनंदीन आढावा तात्पुरता बंद होता. मात्र लॉकडाउन शिथिल झाल्याने ७ जूनपासून पेट्रोलियम कंपन्यांनी दररोजची दर निश्चिती पुन्हा सुरु केली होती ती आजतागायत सुरूच आहे. त्यामुळे मागील २१ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. परिणामी टॅक्सी, रिक्षा या वाहतूकदारांनी भाडेवाढीची तयारी सुरु केली आहे. त्याचबरोबर माल वाहतुकदारांच्या संघटना भाडेवारीविरोधात आक्रमक झाल्या आहेत.

मुंबईत शनिवारी पेट्रोल २३ पैशांनी महागले आहे.पेट्रोलचा भाव ८७. १४ रुपये झाला आहे. शुक्रवारी तो ८६.९१ रुपये होता. डिझेलचा भाव ७८.७१ रुपयांवर गेला आहे. कालच्या तुलनेत डिझेल २० पैशांनी वधारले. शुक्रवारी मुंबईत डिझेलचा भाव ७८.५१ रुपये होता. मागील २१ दिवसांत पेट्रोल ९ रुपये तर डिझेल ११ रुपयांनी महागले आहे.

सहा लाख रुपयांपर्यंत विमा; ‘करोना’चे सर्वाधिक दावे महाराष्ट्रातच
दिल्लीत शनिवारी पेट्रोल ८०.३८ रुपये झाला. त्यात २५ पैशांची वाढ झाली. शुक्रवारी पेट्रोलचा भाव ८०.१३ रुपये होता. तर डिझेलमध्ये आज २१ पैशांची वाढ झाली आणि डिझेलचा भाव ८०.४० रुपयांवर गेला आहे. गुरुवारी दिल्लीत डिझेलने ८० रुपयांची पातळी ओलांडली होती. कोलकात्यात आज पेट्रोल ८२.०५ रुपये झाला. त्यात २३ पैशांची वाढ झाली. तर चेन्नईत पेट्रोलचा दर ८३.५९ रुपयांवर गेला आहे. कोलकात्यात डिझेल ७५.५२ रुपये झाले आहे. तर चेन्नईत डिझेलने ७७.६१ रुपयांचा स्तर गाठला आहे.

चीनचा माल बंदरावरच अडकला; अमेरिकन कंपन्याही धास्तावल्या
डिझेलच्या वाढत्या किमतींनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि माल वाहतुकीला जबर आर्थिक फटका बसणार आहे. व्हॅट आणि उत्पादन शुल्कवाढीने डिझेलच्या किंमती झपाट्याने वाढल्या आणि पेट्रोल आणि डिझेलमधीन दर तफावत भरुन निघाली आहे. पेट्रोलच्या किरकोळ दरामध्ये कराचा वाटा प्रतिलीटर सरासरी ५०.६९ रुपये किंवा ६४ टक्के असतो. यामध्ये केंद्रीय उत्पादनशुल्क ३२.९८ रुपये असते, तर राज्य मूल्यवर्धित कर (व्हॅट) सरासरी १७.७१ रुपये असतो.डिझेलच्या किरकोळ दरामध्ये कराचा वाटा प्रतिलीटर सरासरी ६३ टक्के असतो. त्यामुळे एकूण ४९.४३ रुपये प्रतिलीटर कर डिझेलच्या किरकोल दरावर आकारला जातो. यामध्ये केंद्रीय उत्पादनशुल्काचे ३१.८३ रुपये तर राज्य मूल्यवर्धित कराचा वाटा १७.६० रुपये असतो. यापूर्वी १६ ऑक्टोबर २०१८ रोजी दिल्लीमध्ये डिझेलचा दर सर्वाधिक ७५.६९ रुपये होता. त्याआधी ४ ऑक्टोबर २०१८ रोजी पेट्रोलचा दर राजधानी उच्चांकी ८४ रुपये राहिला होता.

देशातील पेट्रोल डिझेलचे भाव जागतिक बाजाराशी संलग्न करण्यात आले आहेत. सकाळी ६ वाजता पेट्रोलियम कंपन्या इंधन दर निश्चित करत असतात.सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये गेल्या महिनाभरात ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती प्रती बॅरल ४० डॉलरच्या पुढे आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Rajasthan Royals: IPL 2020: धोनीच्या चेन्नईची हाराकिरी, राजस्थानने साकारला मोठा विजय – ipl 2020: rajasthan royals beat chennai super kings by 7 wickets

अबुधाबी, IPL 2020 : चेन्नईच्या फलंदाजांना आजच्या सामन्यात सूर गवसला नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच चेन्नई सुपर किंग्सला राजस्थान रॉयल्सपुढे विजयासाठी १२६ धावांचे माफक...

Varun Gandhi: मदत मागणाऱ्यावर वरुण गांधी खवळले!; म्हणाले, ‘मी काय तुमचा नोकर नाही’ – bjp pilibhit mp varun gandhi viral audio illegal liquor case...

पिलीभीतः उत्तर प्रदेशमधील पिलीभीत येथील भाजप खासदार वरुण गांधी ( varun gandhi ) यांचा एक कथित ऑडिओ व्हायरल झाला आहे. या कथित व्हायरल...

Recent Comments