Home आपलं जग करियर PG medical: मेडिकल पीजीसाठी निवड यादी जाहीर; २३ मे पर्यंत होणार प्रवेश...

PG medical: मेडिकल पीजीसाठी निवड यादी जाहीर; २३ मे पर्यंत होणार प्रवेश – maharashtra cet cell announced selection list of pg medical candidates


म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष तथा सीईटी सेलच्या वतीने राज्यातील मेडिकल कॉलेजांमध्ये पदव्युत्तर पदवी व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार प्रवेश घेण्यासाठी २३ मे पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

राज्यातील कोट्यानुसार सरकारी व खासगी मेडिकल कॉलेजांमध्ये एमडी, एमएस व पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांना नीट पीजी प्रवेश परीक्षेच्या गुणांवर प्रवेश देण्यात येतो. यानुसार सीईटी सेलने प्रवेश यादी जाहीर केली आहे.

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलच्या वतीने विद्यार्थ्यांना ‘ऑनलाइन रिपोर्टिंग’ ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यास संबंधित मेडिकल कॉलेजला ई-मेल पाठवावा लागणार आहे. सोबतच ऑनलाइन शुल्काचा भरणा करून ती पावती स्कॅनिंग करून संबंधित कॉलेजांना पाठवायची आहे. विद्यार्थ्यांना शक्य असल्यास कॉलेजमध्ये जाऊन पारंपरिक पद्धतीनेही ते प्रवेश निश्चित करू शकणार आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांना स्टेटस रिटेन्शन अर्ज भरण्यासाठी २३ मे पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आह. या अभ्यासक्रमांसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी सीईटी सेलच्या वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aurangabad Corona Update: Coronavirus : दोन मृत्यू, ३५७ नवे बाधित – aurangabad reported 357 new corona cases and 2 deaths in yesterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादशहरातील शिवाजीनगर येथील ८३ वर्षीय, तर जालना जिल्ह्यातील तळणी येथील ६० वर्षीय, अशा दोन बाधित पुरुष रुग्णांचा उपचारादरम्यान घाटीत मृत्यू...

raj thackeray without mask: Nashik: मास्क न घालताच राज ठाकरे नाशिकमध्ये; माजी महापौरांना म्हणाले… – mns chief raj thackeray in nashik without wearing mask

नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. मास्क न घालताच ते आज सकाळी नाशिकमध्ये पोहोचले. मास्कवर मास्क घालून स्वागतासाठी...

Recent Comments