Home महाराष्ट्र Pimpri police: Nitesh Rane: 'कोविड सेंटर हा भ्रष्टाचार; वाद्र्यांतील अभिनेत्याला विचारून होतात...

Pimpri police: Nitesh Rane: ‘कोविड सेंटर हा भ्रष्टाचार; वाद्र्यांतील अभिनेत्याला विचारून होतात निर्णय’ – bjp mla nitesh rane attacks thackeray, says covid centres in mumbai is a big scam


मुंबई: मुंबईत उभारण्यात येत असलेले कोविड सेंटर ही करोनाच्या नावावर चाललेली जनतेच्या पैशाची लूट आहे. यातील कुठलेही काम नियमानुसार व टेंडर काढून झालेले नाही. अनेक गोष्टी आदित्य ठाकरे यांच्या जवळपासच्या मित्रांना खूश करण्यासाठी व वांद्र्यात राहणाऱ्या एका अभिनेत्याला व त्याच्या मित्रांना विचारून होतात, असा खळबळजनक आरोप भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी आज केला. ‘कुठल्या हॉटेलात बसून आणि कशा पद्धतीनं ही कामे दिली जातात याची संपूर्ण माहिती आमच्याकडे आहे. केवळ प्रसिद्धीसाठी मी हे बोलत नसून विधीमंडळाच्या अधिवेशनात ही सगळी नावे उघड करणार,’ असा इशाराही राणे यांनी दिला. (Nitesh Rane’s Facebook Live)

‘करोनाच्या कॉलर ट्यूनमागे काय कटकारस्थान आहे; मोदींनी सांगावं

आतापर्यंत ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या नीतेश राणे यांनी प्रथमच ‘फेसबुक लाइव्ह’ केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे हे त्यांच्या निशाण्यावर होते. राज्यात वडील आणि मुलगा या दोघांचंच सरकार आहे, असा घणाघात त्यांनी केला. ‘मुंबईतील करोनाच्या परिस्थितीबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. मुंबईत जे सुरू आहे ते धक्कादायक व चिंताजनक आहे. मुंबई महापालिका व राज्य सरकारनं आरोग्य व्यवस्थेचा पोरखेळ करून टाकला आहे. रोज नवनव्या समस्या समोर येत आहेत. केंद्र सरकारच्या नावानं बोटं मोडणाऱ्यांना याचं काहीही पडलेलं नाही. एकीकडे बेड मिळत नाहीत म्हणून लोक तडफडून मरत आहेत तर, दुसरीकडं नेस्को आणि बीकेसीमध्ये जम्बो कोविड सेंटर उभारली जात आहेत. पहिल्या सेंटरमध्ये अवघे २००-२५० रुग्ण असताना हजार-हजार बेडचे दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील कोविड सेंटर उभारले जात आहेत. हे प्रत्येक सेंटर २७ कोटींचं आहे. हे सगळं विना टेंडर सुरू आहे. एका रुपयाचं टेंडर यासाठी काढण्यात आलेलं नाही. कोविड सेंटरमध्ये पुरेसे डॉक्टर आणि आरोग्य सेवक नाहीत. रुग्णांसाठी सेंटरचा वापर होत नसेल तर त्यांचा उपयोग काय,’ असा प्रश्न नीतेश यांनी केला आहे.

‘आदित्य ठाकरे यांच्या जवळच्या लोकांना खूश करण्यासाठी हे सगळं सुरू आहे. सगळे पैसे या लोकांच्या खिशात जात आहेत. हे सगळं रात्री आठनंतर कुठे ठरतं? कुठल्या हॉटेलात ठरतं? कसं ठरतं? ही सगळी माहिती आमच्याकडं आहे. वांद्र्यात हॉटेल, रेस्टॉरण्ट चालवणारा एक अभिनेता व त्याचे मित्रही यात आहेत. त्यांच्या कल्याणासाठी हे सुरू आहे,’ असा आरोप राणे यांनी केला.

वाचा: कोल्हापूर शहरात करोनाचा पहिला बळी; एका सराफाचा मृत्यू

मुंबई महापालिका आणि सरकार आपला जीव वाचवेल यावर आता लोकांचा विश्वास राहिलेला नाही. मृतांची आकडेवारी लपवली जात आहे. आमदारांनी विचारूनही त्यांना नेमकी आकडेवारी सांगितली जात नाही. मुंबई महापालिकेकडे ८० हजार कोटी रुपयांच्या ठेवी असताना प्रत्येक गोष्टीसाठी केंद्राकडे बोट दाखवले जाते, असं सांगतानच, ‘जबाबदारी पार पाडता येत नसेल तर राजीनामा द्या आणि मोकळे व्हा,’ असा सल्लाही नीतेश यांनी ठाकरे पिता-पुत्रांना दिला.

लता मंगेशकर या तेंडुलकरसारखा षटकार मारू शकतील का?

ठाकरे सरकार व महापालिका मुंबईकर जनतेच्या जिवाशी खेळत असल्याचा आरोप नीतेश यांनी केला. ‘मुंबईत ऑक्सिजन न मिळाल्यामुळं २२१ लोकांचे प्राण गेले. नंतर जाग्या झालेल्या महापालिकेनं ऑक्सिजन सिलिंडरचं काम रॉमवेल नावाच्या बिल्डरला दिलं. घरं बांधणारा बिल्डर ऑक्सिजन सिलिंडर कसा बनवू शकतो? हे तर लता मंगेशकरांना सचिन तेंडुलकरसारखा षटकार मारायला सांगण्यासारखं आहे. त्या-त्या क्षेत्रातील व्यक्तीला कामं का दिली जात नाहीत,’ असा प्रश्नही त्यांनी केला. ‘पीपीई किट, बॉडी बॅग, ऑक्सिजन सिलिंडर या सगळ्यामध्ये राजरोस चोरी, भ्रष्टाचार चाललाय. हे सगळं कुठे, कसं आणि किती वाजता ठरतं याची सगळी माहिती आमच्याकडं आहे. मुंबई महापालिकेला नियमित बॉडी बॅग पुरवणारा वितरक आहे. तो ९०० ते ११०० रुपयांमध्ये बॉडी बॅग पुरवतो. पण करोनाच्या काळात त्याला न विचारता थेट दुसऱ्याच एका व्यक्तीला ६३७१ रुपयाने बॉडी बॅगचं काम दिलं गेलं. मृतदेहांचा वापरही भ्रष्टाचारासाठी केला जात आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ज्येष्ठ नागरिकास फसविले

म. टा. प्रतिनिधी, मदतीचा बहाणा करून एटीएम कार्डची आदलाबदल करीत भामट्यांनी वृद्धाच्या बँक खात्यातून परस्पर लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे....

फसवा विकास; फसवी मंडळे!

अॅड. विलास पाटणे विशाल द्वैभाषिक मुंबई राज्याच्या निर्मितीनंतर गुजराती भाषिक प्रदेशात गुजराती भाषिक राज्याच्या निर्मितीची मागणी वाढली. पुढेमागे या भाषिक अस्मितेच्या लाटेमुळे ही दोन्ही...

Recent Comments