Home देश piyush goyal: महाराष्ट्रासाठी रोज १२५ श्रमिक ट्रेन सोडण्यास तयार, रेल्वेमंत्र्यांचे CM ना...

piyush goyal: महाराष्ट्रासाठी रोज १२५ श्रमिक ट्रेन सोडण्यास तयार, रेल्वेमंत्र्यांचे CM ना आव्हान – ready to send 125 shramik train from maharashtra said railway minister piyush goyal


नवी दिल्लीः केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारमधील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करत थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. महाराष्ट्रासाठी रोज १२५ ट्रेन सोडण्यासाठी रेल्वे तयार आहे. रेल्वेच्या
व्यवस्थापकांकडे मजुरांची यादी द्या, असं पियुष गोयल यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी रेल्वेकडून पुरेशा गाड्या मिळत नसल्याचं सांगितलं.
आपण स्थलांतरीत मजुरांसाठी रोज ८० ट्रेन सोडण्याची मागणी केली आहे. मात्र प्रत्यक्षात आपल्याला रेल्वेकडून फक्त ४० ट्रेन मिळत आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यानंतर रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करून उद्धव ठाकरेंच्या आरोपाला उत्तर दिलंय.

उद्धवजी आशा आहे तुम्ही स्वस्थ असाल. तुमच्या स्वास्थ्यासाठी शुभेच्छा. महाराष्ट्राला उद्यापासून रोज १२५ श्रमिक स्पेशल ट्रेन देण्याची रेल्वेची तयारी आहे. तुमच्या मजुरांची यादी आहे, असं तुम्ही सांगितलं. तुम्ही ही यादी कृपया रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे एका तासाच्या आत सादर करावी. यासोबतच ट्रेन कुठून सोडायची आहे, प्रवाशांनुसार ट्रेनची संख्या, त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र ही सर्व माहितीही द्यावी. यानुसार ट्रेन सोडण्याचे नियोजन आम्हाला करता येईल, असं गोयल म्हणाले.

चिनी सैनिकांनी जवानांना ताब्यात घेतल्याचे वृत्त भारतीय लष्कराने फेटाळले
ट्रेन स्टेशनवर आल्यावर त्या आधीसारख्या रिकाम्या जाणार नाहीत अशी अपेक्षा आहे. तुम्हा जितक्या ट्रेन हव्या आहेत तेवढ्या उपलब्ध करून दिल्या जातील, असं गोयल यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र सरकारने २०० ट्रेनसाठी मजुरांची यादी रेल्वेकडे दिल्याचा दावा केला आहे. पण मध्य रेल्वेने सतत पाठपुरावा करूनही महाराष्ट्र सरकारकडून कालपर्यंत एकही यादी रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे आलेली नाही. कृपया यादी लवकरात लवकर पाठवण्याची कृपा करावी, असं आवाहन ही रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केलं आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pm modi interacts with startups: नवीन स्टार्टअपसाठी १ हजार कोटींचा फंड; PM मोदी म्हणाले, ‘आमचा फोकस तरुणांवर’ – pm modi interacts with startups during...

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 'प्रारंभः स्टार्टअप इंडिया आंतरराष्ट्रीय समिट'ला संबोधित केले. वाणिज्य मंत्रालयाच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन...

Recent Comments