Home शहरं कोल्हापूर plasma therapy: सांगलीत प्लाझ्मा उपचार पद्धती सुरू; पाच जणांनी केले प्लाझ्मा दान...

plasma therapy: सांगलीत प्लाझ्मा उपचार पद्धती सुरू; पाच जणांनी केले प्लाझ्मा दान – plasma therapy trial on coronavirus patients in sangli


म. टा. प्रतिनिधी, सांगली: ‘सांगली जिल्ह्यात प्लाझ्मा संकलन आणि उपचार पद्धती पूर्ण क्षमतेने सुरू झाली असून, पाच जणांनी प्लाझ्मा दान केले आहे. या उपचार पद्धतीमुळे गंभीर रुग्णांना जीवदान मिळणार असल्याने करोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करावे,’ असे आवाहन सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी बुधवारी केले.

वाचाः … म्हणून मुंबईतील सहा पोलिसांविरुद्धच दाखल झाले गुन्हे

सांगली जिल्ह्यात आजपर्यंत १२ करोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरेपीस मान्यता मिळाली आहे. यानुसार प्लाझ्मा संकलन आणि उपचाराची सर्व यंत्रणा सांगलीतील कोविड उपचार केंद्रात सज्ज झाली आहे. करोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी केले होते. यानुसार पाच व्यक्तींनी प्लाझ्मा दान केले आहे. प्लाझ्मा थेरपीमुळे गंभीर रुग्णांना जीवदान मिळणार असून, जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास डॉ. चौधरी यांनी व्यक्त केला.

वाचाः मुंबईत जमावबंदी; काय सुरू राहणार, काय बंद; जाणून घ्या

दरम्यान, जिल्ह्यात आजवर झालेल्या १२ रुग्णांच्या मृत्यूची कारणमीमांसा करण्यासाठी जिल्हाधिका-यांनी स्वतंत्र समिती स्थापन केली. उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाला वेळेत उपचार मिळाले का? कोणत्या कारणांमुळे रुग्णांचे मृत्यू झाले? या कारणांचा शोध समितीकडून घेतला जाणार आहे. यापुढे उपचारात त्रुटी राहू नयेत, यासाठी समितीच्या निष्कर्षांची मदत घेतली जाणार आहे.

सीपीआर रूग्णालयामध्ये आठ करोना पॉझिटिव्ह रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाली आहे. यातील पाच जणांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. प्लाझ्मा थेरपी करोनाच्या उपचारात महत्वाची भूमिका बजावत आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

farmers protest: tractor rally : दिल्लीत हिंसक आंदोलन; केंद्राकडून गंभीर दखल, सिंघू सीमेवरून शेतकरी नेते ‘गायब’ – tractor rally violence in farmers protest signs...

नवी दिल्ली: प्रजासत्ताक दिनी कृषी कायद्यांविरोधात ( farmers protest ) शेतकरी ट्रॅक्टर परेडमध्ये ( tractor rally ) मंगळवारी हिंसाचार झाला. शेतकरी आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेड...

R. Ashwin: टीम इंडियामध्ये लागलं मोठं चॅलेंज, पुजाराने ‘ही’ गोष्ट केल्यावर अश्विन अर्धी मिशी ठेवणार – ind vs eng : indian cricketer r. ashwin...

नवी दिल्ली, IND vs ENG : भारतीय संघामध्ये सध्याच्या घडीला एक मोठं चॅलेंज लागलेलं आहे. हे चॅलेंज भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने भरवश्याचा फलंदाज...

Recent Comments