Home देश please save my father : PM मोदीजी माझ्या वडिलांना वाचवा, लेकीचे अश्रू...

please save my father : PM मोदीजी माझ्या वडिलांना वाचवा, लेकीचे अश्रू थांबेना… – coronavirus delhi please save my father life delhi girl appeal pm modi and cm kejriwal on social media


नवी दिल्लीः करोनामुळे कुटुंबावर किती बिकट परिस्थिती ओढावते याची मेनहेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. दिल्लीत दोन दिवसांपासून वडील करोनाने आजारी आहेत. पण सरकारी रुग्णालयांमधील भीषण वास्तव एका मुलीने व्हिडिओतून मांडलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री अरविंद केजरवाल यांची विनवणी करताना या माय-लेकींचे आश्री थांबत नाहीएत.

१६ तारखेच्या रात्री २ वाजता वडील बेशुद्ध झाले. आम्ही त्यांना शालीमार बागमधील फोर्टीस हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. डॉक्टरांना शंका आल्याने त्यांनी त्यांची करोना चाचणी केली. त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली. यानंतर हॉस्पिटलने कुठलीही कल्पना न देता वडिलांना सरकारी हॉस्पिटलमध्ये हलवलं. त्यांना लोकनायक जयप्रकाश हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. १८ तारखेला किमान दोन-तीन तासांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना रात्री ८ वाजता दाखल केलं गेलं. दाखल केल्यानंतर दुसरा दिवस उजाडल्यानंतर दुपारी १२ वाजेपर्यंत त्यांना नाश्ता -जेवण काहीही दिलं गेलं नाही. त्यानंतर त्यांना काहीतरी खायला दिलं गेलं. दुसऱ्या दिवशी ९ वाजता नाश्ता दिला गेला. त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाचा आजार आहे. त्यांना वेळेवर अन्न-पाणी दिलं नाही तर त्यांना अधिक धोका निर्माण होऊ शकतो. आज पहाटे ५ वाजता त्यांचा फोन आला. स्टाफ, नर्सना त्यांनी मदत मागितली. पण कुणीच मदत करत नाहीए. त्यांच्याकडून उठलंही जात नाही. त्यांना १०२ इतकी ताप आहे, अशी सरकारी रुग्णालयातील भीषण स्थिती आहे, असं दिल्लीतील जहांगीरपुरीत जी ब्लॉकमध्ये राहणाऱ्या प्रतिभा गुप्ता या मुलीने सांगितलं.

पंतप्रधान मोदीजी, CM केजरीवालजी हात जोडतो…


नरेला येथील क्वारंटाइन केंद्रात नेण्यात येईल, असं वडिलांना काल सांगण्यात आलं. सकाळी नऊ वाजता त्यांना सांगण्यात आलं. पण रात्रीचे दीड वाजेपर्यंत नेलं नाही. त्यानंतर त्यांना उद्या नेण्यात येईल असं सांगितलं गेलं. कधी काही सांगतात तर कधी काही. आम्हालाही त्यांची भेट घेऊ देत नाही ना त्यांची पूर्ण काळजी घेतली जातेय. दोन दिवसांपासून डॉक्टरांनी त्यांना तपासलेलं नाहीए. आज सकाळी त्यांना फोन आला. मला १०२ ताप आहे. एखाद्या खासगी रुग्णालयात तरी दाखल करा. पण काहीच काळजी घेतली जात नाहीए. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री केजरीवाल यांना हात जोडून आम्ही विनंती आहे, कृपया मदत करा. जे बातम्यांमध्ये दाखवलं जातंय आणि वास्तविक स्थितीत प्रचंड तफावत आहे. आम्ही त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करू शकतो. पण सरकारच्या आदेशानुसार आम्हाला तेही करू दिले जात नाहीए. आम्ही घरात बसून आहोत. चिंता आणि काळजी करण्याशिवाय काहीच करू शकत नाहीए. मोदीजी, केजरीवालजी आम्ही हात जोडतो, माझ्या वडिलांचे प्राण वाचवा, असं विनवणी मुलीने केलीय. सोबतच आईनेही पतीला वाचवण्याची विनंती केलीय.

पथक का पाठवताय? मोदी, शहांना ममतांचा सवाल

करोनाः चार राज्यांमधील स्थिती गंभीर, केंद्राची पथ…

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sunil Gavaskar: IND vs ENG : भारतातील सर्वाधिक क्रिकेट चाहते गुजरातमध्येच आहेत, सुनील गावस्कर यांचं वादग्रस्त विधान – ind vs eng : indian former...

अहमदाबाद, IND vs ENG : गुजरातमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना रंगत आहे. यावेळी समालोचन करत असताना भारताचे माजी कर्णधार आणि...

Kareena Kapoor Khan New Photos From Home Saif Ali Khan – स्वतःसाठी वेळ काढत घरी आराम करताना दिसली करिना कपूर, पाहा फोटो | Maharashtra...

हायलाइट्स:हॉस्पिटमधून घरी आल्यावर आराम करतेय करिना कपूरदुसऱ्या बाळाचा चेहरा पाहण्यास चाहते उत्सुक२१ फेब्रुवारीला दिला दुसऱ्या मुलाला जन्ममुंबई-करिना कपूर खानला नुकताच अजून एक मुलगा...

Sensex rise today: Sensex Today शेअर बाजारात तेजी; सलग दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स वधारला – sensex surge today reclaim 50000 mark

हायलाइट्स:भांडवली बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात तेजी आहे.सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला असून त्याने ५०१०० अंकाची पातळी ओलांडलीराष्ट्रीय शेअर बाजाराचे व्यवहार तांत्रिक बिघाडामुळे खंडीत...

Recent Comments