Home देश PM Modi: एक इंच जमीनही बळकावण्याची हिंमत करू नका, PM मोदींचा चीनला...

PM Modi: एक इंच जमीनही बळकावण्याची हिंमत करू नका, PM मोदींचा चीनला इशारा – all-party meeting pm modi warns china


नवी दिल्लीः लडाखमधील भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत मोदींनी लडाखमधील स्थितीबाबत माहिती दिली. लडाखमध्ये भारतीय सीमेत चिनी सैनिकांनी कुठेही घुसखोरी झालेली नाही आणि भारताच्या कुठल्याही चौकीवर ताबा मिळवलेला नाही, असं मोदींनी स्पष्ट केलं. देशाच्या जवानांवर जनतेचा विश्वास आहे. जनता या जवानांसोबत आहे, असं मोदी म्हणाले.

भारताला मैत्री आणि शांतता हवी आहे. पण देशाच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला ठेच पोहोचू देणार नाही. कुठल्याही परकीय दबावापुढे भारत झुकणार नाही. देशाच्या सुरक्षेसाठी जे काही आवश्यक असेल त्यासाठी वेगाने पावलं उचलली जातील, असं मोदींनी सांगितलं. भारत सीमांच्या सुरक्षेसाठी सक्षम आहे. कुणीही भारताच्या एक इंच जागेवर ताबा मिळवण्याची हिंमत करू शकत नाही, असं मोदी म्हणाले.

भारतीय सैन्याला कारवाईसाठी मोकळीक

गलवानमध्ये ना कुणी भारतीय सीमेत घुसलंय ना कुणी चौक्यांवर ताबा मिळवलाय. लडाखमध्ये आपले २० जवान शहीद झाले. पण ज्यांनी देशाकडे वाकडी नजर करून बघितलं त्यांना शहीद जवानांनी धडा शिकवला. भारतीय सैन्य देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे, अशी ग्वाही मोदींनी जनतेला दिली. तसंच कुठल्याही हल्ल्याला उत्तर देण्यासाठी सैन्याला मोकळीक देण्यात आली आहे, मोदी म्हणाले.

चीनच्या कृत्याने देशात आक्रोश

गेल्या काही वर्षांपासून सीमांच्या सुरक्षेसाठी सीमा भागात पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. नव्या पायभूत सुविधांमुळे प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LAC) गस्त घालण्याची लष्कराची क्षमताही वाढली आहे. सीमा भागातील पायाभूत सुविधांमुळे ज्या ठिकाणी नजर जात नव्हती आता तिथे लष्कराला लक्ष ठेवण्यास मदत होत आहे. आतापर्यंत ज्यांना कुणी आडवत नव्हतं, टोकत नव्हतं त्यांना आता पावला पावलांवर रोखलं जातंय आणि टोकलं जातंय. यामुळे तणाव वाढतोय. पण एलएसीवर चीनने जे कृत्य केलं आहे यामुळे संपूर्ण देशात संताप आणि आक्रोश आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी या बैठकीत हीच भावना व्यक्त केली, असं मोदींनी सांगतिलं.

सर्वपक्षीय बैठकीत कोण काय म्हणालं… वाचा

चीनवर होऊ शकते मोठी कारवाई? राम माधव यांनी दिले संकेत

दरम्यान, भारत-चीन तणावात गुप्तचर यंत्रणांचे कुठल्याही प्रकारे अपयश नाही, असं सांगत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी विरोधांचे आरोप फेटाळून लावले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी लडाखमधील घटनेवर प्रश्न उपस्थित केले होते. गुप्तचर यंत्रणांचे हे अपयश नाही का? सरकारने यावर स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली होती.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments