Home देश PM Modi: करोनावर लस कधी तयार होणार? PM मोदींनी घेतली महत्वाची बैठक...

PM Modi: करोनावर लस कधी तयार होणार? PM मोदींनी घेतली महत्वाची बैठक – pm modi review the preparations being undertaken for vaccination against covid19


नवी दिल्लीः देशाला संबोधित करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महत्वाची बैठक घेतली. करोनावर लस तयार करण्याबाबत ही बैठक झाली. देशात करोनावर लस तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे आणि अनेक यंत्रणा यात गुंतल्या आहेत.

पतंप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेल्या उच्च स्तरीय बैठकीत अनेक वरिष्ठ अधिकारी आणि वैज्ञानिक उपस्थित होते. भारत सरकारच्या मदतीने करोनावर लस तयार करणं आणि त्यासाठी संशोधनाचे काम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम केअर्स फंडमधून या रिसर्चसाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग करून वेळेवर लस तयार करणं गरजेचं आहे. मोठ्या प्रमाणावर लस कधी तयार करता येईलल, याची तयारी करावी, अशा सूचना पंतप्रधान मोदींनी अधिकाऱ्यांना बैठकीत दिल्या.

निष्काळजीपणा चिंतेचं कारण, काळजी घ्या : पंतप्रधान मोदी

करोनावर एक चांगली बातमी आली आहे. भारतात करोनावर पहिली लस तयार केली गेली आहे. भारत बायोटेक या कंपनीने ही लस तयार केली आहे. लसीची मानवी चाचणी घेण्यास केंद्र सरकारने परवानगीही दिलीय. सोमवारी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय ) ही परवानगी दिली.

पंतप्रधान मोदींचे देशाला उद्देशून संबोधन, नागरिकांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

करोनावरील या लसीची चाचणी जुलैपासून सुरू होणार आहे. त्यानंतर लसी किती प्रभावी ठरते हे स्पष्ट होणार आहे. देशात सध्या करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशातील करोना रुग्णांची एकूण संख्या मंगळवारी साडेपाच लाखांवर गेलीय. तर करोनामुळे मृतांची संख्या १७ हजाराच्या जवळ पोहोचली आहे. सरकारने कालच अनलॉक- २ च्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Road Accidents in India: हा तर निव्वळ आत्मघात – road accidents after lockdown in india

करोनामुळे देशभरात वाहतूक मंदावली होती आणि त्यामुळे अपघात व अपघाती मृत्यूंची संख्याही कमी झाली होती. मात्र, आता टाळेबंदी संपल्यानंतर पुन्हा रस्तेअपघातांचे प्रमाण करोनापूर्व...

burglary cases in mumbai: मुंबईत वाढल्या घरफोड्या – burglary cases have increased in mumbai after lockdown

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई करोना संकटामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे नियंत्रणात असलेल्या मुंबईतील चोऱ्या आणि घरफोड्या पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. लॉकडाउन असल्याने...

Recent Comments