११३ पोस्ट झाल्या होत्या डिलिट
अकाउंट डिलिट करण्यासाठी Weibo कडून परवानगी देण्यात दिरंगाई केली गेली. पंतप्रधान मोदींच्या अकाउंटवर एकूण ११५ पोस्ट होत्या. यामुळे या सर्व पोस्ट म्यान्युअली डिलिट करण्यात आल्या. सर्व प्रयत्नानंतर ११३ पोस्ट डिलिट झाल्या. दोन पोस्ट अजूनही बाकी आहेत. ज्यात चीनचे अध्यक्ष शी जीनपिंग यांच्यासोबत पीएम मोदींचे फोटो होते. Weibo वरून चीनच्या अध्यक्षांचा फोटो हटवणं अवघड आहे. अखेर मोठ्या प्रयत्नानंतर त्या पोस्टही हटवल्या गेल्या. आता पंतप्रधान मोदींच्या Weibo अकाउंटवर काहीच नाहीए. आपल्या पोस्ट डिलिट करण्यास सुरुवात केली त्यावेळी पंतप्रधान मोदींचे २४४०० फॉलोअर्स होते.
चीनच्या कुरापतींमुळे अॅपवर बंदी
काही दिवसांपूर्वीच चीनमधील लोकप्रिय अॅप WeChatने भारतीय दुतावासाच्या अधिकृत अकाउंटवरून तीन भारतीय पोस्ट डिलिट केल्या होत्या. त्या पैकी एक पंतप्रधान मोदींचं वक्तव्य असलेली पोस्ट होती. चीनच्या कुरापतींमुळे आणि चिनी अॅपबाबत सुरक्षा आणि प्रायव्हसीसंबंधी चिंतामुळे भारत सरकारने TikTok, Weibo, Helo, WeChat अशा ५९ अॅपवर बंदी घातली. आता ही अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल प्ले स्टोअरवरून हटवण्यात आली आहेत.
भारत-चीन तणाव; संरक्षणमंत्र्यांसह लष्कर प्रमुख शुक्रवारी लडाखला जाणार
अॅप बंदीनंतर चीनला आणखी एक झटका, महामार्ग प्रकल्पांमध्येही बंदी घालणार
चीनमुळे LACवर तणावाची स्थिती
पूर्व लडाखमध्ये भारत-चीनमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LAC) दोन महिन्यांपासून तणाव आहे. या तणावातून गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये १५ जूनच्या रात्री रक्तरंजित संघर्ष झाला. यात भारताचे २० जवान शहीद झाले. यानंतर पूर्व लडाखमध्ये पँगाँग सरोवर आणि डेपसांग प्लेन्स भागात चिनी सैनिकांती उपस्थिती आहे. सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशात लष्करी पातळीवर चर्चा सुरू आहे. पण त्यात अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही.