Home देश pm modi recalls emergency day: आणीबाणीची ४५ वर्षे: भाजचा हल्लाबोल, मोदींचे ट्विट...

pm modi recalls emergency day: आणीबाणीची ४५ वर्षे: भाजचा हल्लाबोल, मोदींचे ट्विट – 45 years of emergency pm modi recall that day and sacrifice by indian leaders and people


नवी दिल्ली: ४५ वर्षांपूर्वी २५ जून १९७५ या दिवशी देशात आणीबाणी घोषित करण्यात आली होती. आज आणीबाणीला २५ वर्षे पूर्ण होण्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला आहे. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीच्या काळात यातनांचा सामना करावा लागणाऱ्या वीरांचे स्मरण केले. ४५ वर्षांपूर्वी देशात आणीबाणी लादली गेली. त्या वेळी भारतातील लोकशाहीच्या रक्षणासाठी ज्या लोकांना संघर्ष केला, यातना झेलल्या, अशा वीरांचा त्याग देश कधीही विसरणार नाही, त्यांना माझे शतश: नमन, असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटसोबत ‘मन की बात’ चा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. आणीबाणीच्या काळात लोकांच्या मनात गमावलेल्या लोकशाहीबाबत तडफड दिसत होती. जेव्हा कोणी लोकशाहीतील अधिकार हिरावून घेते तेव्हा लोकांच्या अधिकाराचे काय महत्त्व आहे याची जाणीव आता होते, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

आणीबाणीच्या काळात ज्याचा आपण उपयोग केला नाही असे आपले काहीतरी हिरावून घेतले गेले आहे, अशी लोकांच्या मनात भावना निर्माण झाली होती. हे हिरावून घेतले गेल्याचे दु:ख लोकांच्या मनात होते. कायदे-नियमांच्या पलिकडे असलेली लोकशाही हा आमचा संस्कार आहे असे भारत मोठ्या अभिमानाने सांगू शकतो. लोकशाही ही आमची संस्कृती आहे, आमचा वारसा आहे. याच वारशासोबत आम्ही मोठे झालो आहोत, असे मोदी म्हणाले.

भारतासाठी हा क्रूर दिवस- रविशंकर प्रसाद

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही आणीबाणीच्या दिवसाचे स्मरण केले आहे. २५ जून १९७५ या दिवशी देशात आणीबाणी लावण्यात आली होती. लोकनायक जयप्रकाश नारायण, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, चंद्रशेखर आणि भारतातील लाखो लोकांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक करण्यात आली, असे रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.

वाचा: एका वंशातील नसलेले नेते का बोलत नाहीत?; शहांचा काँग्रेसवर निशाणा

भारतातील लोकांनी १९७७ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाविरोधात मोठ्या प्रमाणावर मतदान केले. यात इंदिरा गांधींचा पराभव झाला आणि पहिले बिगर काँग्रेसचे सरकार केंद्रात सत्तेत आले. बिहारमधील जेपी आंदोलनात एक कार्यकर्ता म्हणून मला आणीबाणी विरोधात संघर्ष करता आला हे माझे भाग्यच होते, असे रविशंकर म्हणाले.

रविशंकर प्रसाद यांची काँग्रेसवर टीका

आजचा दिवस हा काँग्रेस पक्षाच्या लोकशाही विरोधी व्यवहाराविरोधात भारतीय लोकांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करण्याचा दिवस आहे, असेही रविशंकर म्हणाले. हा वारसा अजूनही सुरूच आहे आणि नव्या पिढीला योग्य तो धडा घेऊ द्या असेही ते पुढे म्हणाले.

वाचा: पशुधन विकास, सहकारी बँका, अवकाश… केंद्रीय मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

वाचा: एक ‘कुटुंब’ म्हणजे संपूर्ण विरोधी पक्ष नाही; नड्डा यांचा सोनिया, राहुल गांधींवर हल्लाबोलSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pune phd student murder latest news: Pune Crime: पुण्यात पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याचा खून; चेहरा दगडाने ठेचला – 30 year old phd student murdered...

पुणे: पुणे येथील पाषाण भागातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एनसीएल) येथे पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक...

latest opinion poll 2021: Opinion Poll: मोदी-शहांचे आव्हान परतवत ममता साधणार हॅट्ट्रिक!; दक्षिणेतील ‘या’ राज्यात सत्तांतर? – tmc to retain bengal ldf headed for...

हायलाइट्स:पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी हॅट्ट्रिक साधण्याची शक्यता.आसाम भाजपकडे राहणार तर पुदुच्चेरीत कमळ फुलणार.तामिळनाडूत स्टॅलिन तर केरळात डाव्यांची जादू दिसणार.नवी दिल्ली: पश्चिम बंगाल, आसाम,...

Amravati lockdown news: Amravati Lockdown: अमरावती, अचलपुरात लॉकडाऊन वाढवला; ‘हे’ शहरच कंटेन्मेंट झोन! – lockdown in amravati achalpur extended till march 8

हायलाइट्स:अमरावती विभागात अनेक शहरांत करोनाचे थैमान.अमरावती व अचलपूरमध्ये लॉकडाऊन वाढवला.नागपुरातील स्थिती गंभीर, लॉकडाऊन लावला जाण्याची शक्यता.अमरावती: विदर्भात सध्या अमरावतीमध्ये करोनाने थैमान घातले असून...

Recent Comments