Home देश pm modi speech live update: Narendra Modi Speech Live Updates Address To...

pm modi speech live update: Narendra Modi Speech Live Updates Address To Nation On Unlock-2.0 India China Standoff – LIVE : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशाला संबोधन


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित केलं. यावेळी, त्यांनी अनलॉक टप्प्यात नागरिकांचा निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा चिंतेचा विषय ठरत असल्याचं म्हटलंय. तसंच यावेळी त्यांनी नागरिकांना स्वत:ची काळजी घेण्याचं आवाहन केलंय. यावेळी पंतप्रधान मोदींनी ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना’ नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुरू राहील, अशी घोषणा केलीय.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी :


– ९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले

– लवकरच देशात एक देश एक रेशनकार्ड योजनेवर काम सुरू होईल.

– प्रत्येक कुटुंबाला प्रती महिना पाच किलो गहू किंवा तांदूल आणि एक किलो चना डाळ मोफत दिली जाईल. यामध्ये ९० हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च होणार आहे. गेल्या तीन महिन्यांचा खर्च जोडला तर १.५ लाख कोटींवर हा खर्च जातो.

– लॉकडाऊनच्या संकटाशी निपटण्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजना लागू करण्यात आली. या योजनेंतर्गत गरिबांना पावणे दोन लाख कोटींचं पॅकेज दिलं गेलं. गेल्या तीन महिन्यांत जन धन खात्यांत ३१ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले.

– जे नागरिक लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करत नाहीत त्यांना थांबवायला हवं, समजवायला हवं. तुम्ही बातम्यांमध्ये पाहिलंच असेल की एका देशाच्या पंतप्रधानांवर १३ हजार रुपयांचा दंड लावण्यात आला कारण त्यांनी सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान केलं नव्हतं. भारतातही स्थानिक प्रशासनानं असंच काम करायला हवं

– जेव्हा पासून अनलॉक सुरू झालंय नागरिकांचा निष्काळजीपणाही वाढलाय. अगोदर आपण खूपच सतर्क होतो पण आता अधिक काळजीची गरज आहेत. बेजबाबदारपणा हा चिंतेचा विषय आहे

– आपण अशा ऋतूत प्रवेश करत आहोत जिथे सर्दी, खोकला आणि ताप सहजच पसरतो. त्यामुळे सर्व देशवासियांकडे प्रार्थना करतो की, अशावेळी आपली काळजी घ्या : पंतप्रधान मोदी

– वेळेवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या आणि इतर निर्णयांमुळे भारतात करोनापासून लाखो लोकांचं आयुष्य वाचलंय.

– करोनाविरुद्ध लढताना आपण अनलॉक-२ मध्ये प्रवेश करत आहोत

अमित शहांनी वाढवली उत्सुकता

उल्लेखनीय म्हणजे, पंतप्रधानांचं संबोधन सुरू होण्याच्या काही वेळ अगोदर ‘महत्त्वाचं… ४.०० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संबोधन जरुर ऐकावं’ असं ट्विट करत गृह मंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी नागरिकांची उत्सुकता आणखीनच वाढवली होती.

करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात २४ तारखेला सायंकाळी उशिरा पंतप्रधानांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा (मंगळवारी) ९८ वा दिवस आहे. लॉकडाऊनचा पाचवा टप्पाही आता संपत आलाय. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात आत्तापर्यंत ५ लाख ६६ हजार ८४० रुग्ण करोनाच्या तावडीत सापडले आहेत. यातील ३ लाख ३४ हजार ८२२ रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले. सध्या २ लाख १५ हजार १२५ रुग्णांवर देशातील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. देशभरात केवळ गेल्या २४ तासांत करोनाचे १८ हजार ५२२ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर २४ तासांत एकूण ४१८ रुग्णांचे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलीय. त्यामुळे देशातील एकूण मृत्यूंची संख्या आता १६ हजार ८९३ वर पोहचलीय.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

श्वानसंख्येला पालिका रोखणार

म. टा. वृत्तसेवा, कल्याण करोनासंबंधी उपाययोजनांमधून थोडीफार मोकळीक मिळताच पालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांकडे मोर्चा वळवला असून या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी एक कृतीयोजना...

Navi Mumbai: Navi Mumbai: रुग्ण दगावल्याने डॉक्टर, नर्सला मारहाण; रुग्णालयात तोडफोड – navi mumbai deceased patient kin create ruckus at nmmc hospital in vashi

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला रुग्ण दगावल्याने नातेवाइकांनी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांना मारहाण केली. तसेच...

Recent Comments