Home देश PM Narendra Modi: मोदींनी अप्रत्यक्षपणे साधला 'या' काँग्रेस नेत्यावर निशाणा; म्हणाले... -...

PM Narendra Modi: मोदींनी अप्रत्यक्षपणे साधला ‘या’ काँग्रेस नेत्यावर निशाणा; म्हणाले… – Pm Narendra Modi Mentioned Stampede In Kumbha And Indirectly Criticized Then Pm Nehru While Inaugurating Atma Nirbhar Up Rojgar Abhiyan


नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेश सरकारच्या आत्मनिर्भर यूपी रोजगार अभियानाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेल्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधण्याची संधी सोडली नाही. या वेळी बोलताना त्यांनी नाव न घेता भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशने करोनाच्या काळात केलेल्या कामगिरीचीची प्रशंसा करत असताना सन १९५४ साली कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीचा उल्लेख केला. परिस्थिती व्यवस्थित न हाताळली गेल्याने त्यांनी यावेळी अप्रत्यक्षपणे पंडित नेहरूंवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी आपल्या संबोधनात म्हणाले, ‘ एक तो दिवस होता ज्या दिवशी अलाहाबादचे खासदार देशाचे पंतप्रधान होते आणि कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली. त्यावेळी हजारो लोकांचे बळी गेले होते. त्या वेळी सरकारने मृ्त्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या लपवण्यावर सर्व वजन वापरले होते. मात्र आताच्या उत्तर प्रदेश सरकारने धोका पत्करून लाखो स्थलांतरित मजुरांना परत बोलावले. जर पूर्वीचे सरकार असते तर त्यांनी रुग्णालयांची संख्यावरून बहाणे सांगितले असते.

वाचा: ‘आत्मनिर्भर यूपी रोजगार’ अभियानाचे मोदींच्या हस्ते उद्घाटन; ५ लाख रोजगार मिळणार
या पूर्वी देखील पंतप्रधान मोदी यांनी पंडित नेहरूंवर निशाणा साधला असता. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कौशांबीमध्ये एका निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना त्यांनी कुंभमेळ्याचा मुद्दा उपस्थित केला होता. पंडित नेहरू जेव्हा कुंभमेळ्यात आले, तेव्हा, अव्यवस्था असल्याने कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली आणि हजारो लोकांचा मृत्यू झाला. मात्र काँग्रेसने ही बातमी दाबली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते.

वाचा: आणीबाणीची ४५ वर्षे: भाजपचा हल्लाबोल, मोदींचे ट्विट
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश सरकारची मोठी प्रशंसा केली. आज उत्तर प्रदेशमधील जनतेचा जीव वाचवला जात आहे, सर्व सुरक्षित आहेत. जेव्हा देशात ३० लाखांहून अधिक स्थलांतरित मजूर, कामगार काही आठवड्यांपूर्वीच परतले असताना ही स्थिती आहे. योगी आदित्यनाथ यांनी पूर्वीच्या सरकारांप्रमाणे काम केले नाही. योगींच्या सरकारने परिस्थितीचे गांभिर्य ओळखले. ही परिस्थिती पाहता त्यांनी युद्ध पातळीवर काम केले. क्वारंटीन सेंटर, आयसोलेशनच्या सोयी निर्माण करण्यासारख्या कामांवर त्यांनी पूर्ण शक्ती लावली. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नव्हते त्यांच्यासाठी यूपी सरकारने सरकारी रेशन दुकानांचे दरवाजे उघडे केले. इतकेच नाही, तर उत्तर प्रदेशातील सव्वा तीन कोटी गरीब महिलांच्या जनधन खात्यातही सुमारे ५ हजार कोटी रुपये थेट वळते केले, असे मोदी म्हणाले.

वाचा:भारत-चीन तणाव; देशाच्या सुरक्षेवर ७२ टक्के नागरिकांचा PM मोदींवर विश्वासः सर्वेक्षणSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

milk procedure farmers: शेतकऱ्यांना दुधाने तारलं; शंभर कोटीच्या बोनसने गोड होणार दिवाळी – 100 crore bonus for milk procedure farmers in kolhapur gokul warna...

म. टा. प्रतिनिधी, कोल्‍हापूरः गतवर्षी महापूराने तर यंदा परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, पण अशा कठीण काळात दूग्ध व्यवसायाने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला....

free corona vaccine: मोफत करोना लशीवर सर्वच भारतीयांचा हक्क: अरविंद केजरीवाल – all indian citizens have the right to get free corona vaccine says...

नवी दिल्ली: बिहार निवडणुकीसाठी (Bihar Election 2020) आपल्या जाहीरनाम्यात (Election Manifesto) भारतीय जनता पक्षाने (BJP) सर्व बिहारी जनतेला करोना लस मोफत देण्याची घोषणा...

Recent Comments