Home महाराष्ट्र pm unemployment allowance: बेरोजगारांना ३५०० रुपये दरमहा? 'हे' आहे सत्य! - pm...

pm unemployment allowance: बेरोजगारांना ३५०० रुपये दरमहा? ‘हे’ आहे सत्य! – pm unemployment allowance announced fake post goes viral


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजना २०२० अंतर्गत प्रत्येक बेरोजगार तरूणास दरमहा ३,५०० रुपये दिले जाणार’, अशी पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. प्रत्यक्षात ही माहिती खोटी असल्याने अशा कोणत्याही लिंकवर जाऊन वैयक्तिक माहिती भरू नका, असे आवाहन राज्य सायबर गुन्हे प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक बलसिंग राजपूत यांनी केले आहे.

सध्या करोनामुळे अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या परिस्थितीचा गैरफायदा उचलत अनेक भामट्यांकडून खोटे मेसेज व्हायरल केले जात आहेत. अशा बनावट माहितीच्या जाळ्यात तरुण अडकण्याच्या घटना घडत आहत. अलीकडेच समाज माध्यमांवर, ‘पंतप्रधान बेरोजगार भत्ता योजनेच्या नावाखाली बेरोजगार तरुणांनी नोंदणी केल्यास प्रतिमहिना ३५०० रुपये दिले जातील’, या आशयाचा मेसेज फिरत होता. मात्र त्यासोबत जोडलेल्या लिंकवर क्लिक करून तरुणांनी नोंदणी करण्याचा प्रयत्न केला. आपली पूर्ण माहिती भरल्यानंतर हा मेसेज आणखी पाच जणांना पाठवा, त्यानंतर तुमची या योजनेसाठी निवड होईल, असे कळवण्यात आले. अनेकांनी ही लिंक शेअर केल्यानंतर, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

आपल्या संकेतस्थळाचे व्हिजिटर्स, व्ह्यूज वाढवण्यासाठी तसेच माहिती गोळा करण्यासाठी ही लिंक शेअर केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या संदर्भात अद्याप कुठलीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. तरुणांनी फसवणूक झाल्यास कुठलीही भीती न बाळगता तत्काळ तक्रार करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन सायबरतज्ज्ञ करत आहेत.

राज्य तसेच केंद्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीवरच विश्वास ठेवा. एखादा बनावट मेसेज निदर्शनास आल्यास नजीकच्या पोलिस ठाण्यामध्ये किंवा सायबर गुन्हे शाखेच्या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा. कुठलीही खातरजमा केल्याशिवाय अशा बोगस लिंकवर आपली वैयक्तिक माहिती भरू नका.

– बलसिंग राजपूत, (पोलिस अधीक्षक, राज्य सायबर गुन्हे प्रतिबंधक विभाग)Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Mumbai Indians: IPL 2021: मुंबई इंडियन्सने या अनुभवी खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता; जाणून घ्या संपूर्ण यादी – ipl 2021 mumbai indians released lasith malinga...

नवी दिल्ली: IPL 2021 आयपीएलचे सर्वाधिक विजेतेपद मिळवणारे तसेच विद्यमान विजेते मुंबई इंडियन्स (mumbai indians) संघाने या वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी रिटेन आणि रिलीझ...

रिया चक्रवर्ती: वांद्र्यात फुलं विकत घेताना दिसली रिया चक्रवर्ती, यूझर म्हणाले- ‘सुशांतच्या वाढदिवसाचा ड्रामा सुरू झाला’ – rhea chakraborty requested to not follow her

मुंबई- सुशांतसिंह राजपूत याच्या निधनानंतर बर्‍याच आरोपांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात ती वांद्रे येथे सर्वसामान्यांप्रमाणे...

jalgaon district: ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा; ५ जणांची कारागृहात रवानगी – collector take action against gram sevaks in jalgaon district

म. टा. प्रतिनिधी, जळगावः पदभार सोडूनही ग्रामपंचायतीचे दप्तर देण्यास टाळाटाळ करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील ८ ग्रामसेवकांना ही दप्तर दिरंगाई चांगलीच महागात पडली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी...

Recent Comments