Home देश PMO clarification: पंतप्रधानांच्या वक्तव्यावरून वाद; PMO कडून स्पष्टीकरण - pmo clarification on...

PMO clarification: पंतप्रधानांच्या वक्तव्यावरून वाद; PMO कडून स्पष्टीकरण – pmo clarification on pm modi all party meeting speech


नवी दिल्लीः लडाखमध्ये LAC वर चिनी सैनिकांच्या हिंसक हल्ल्यात भारताचे २० जवान शहीद झाले. भारत-चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठकीत भारताची भूमिका मांडली. यावरून आता पंतप्रधान कार्यालयाकडून (PMO) स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LAC) एकांगी सुधारणेला भारताचा विरोध असेल. अशा स्वरुपाच्या बदलाला भारताची परवानगी नाही. देशाची अखंडता आणि सार्वभौमत्वाच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावलं उचललं जातील, असं पीएमओकडून (PMO) स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच पंतप्रधान मोदींच्या सर्वपक्षीय बैठकीतील वक्तव्यावर प्रश्न उपस्थित करून काही जण वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं पीएमओने म्हटलं आहे.

भारताच्या सीमेत कुणीही घुसलेलं नाही आणि भारतीय चौक्यावर ताबाही मिळवला नाही, असं पंतप्रधान मोदी सर्वपक्षीय बैठकीत म्हणाले होते. यावर पंतप्रधान कार्यालयाने भूमिका स्पष्ट केली आहे. भारतीय सीमेत चिनी सैनिकांनी घुसखोरी केलेली नाही हे पंतप्रधान मोदींचे वक्तव्य हे हिंसक संघर्षात भारतीय जवान शहीद झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीशी संबंधित आहे. पण एककीडे वीर जवान सीमांचे रक्षण करत असताना दुसरीकडे पंतप्रधानांच्या वक्तव्यावर सवाल उपस्थित करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. ही दुर्दैवाची बाब आहे. प्रत्यक्ष ताबा रेषा (LAC) ओलांडून भारतीय सीमेत घुसखोरीचा कुठलाही प्रयत्न झाल्यास त्याला ठोस प्रत्युत्तर दिले जाईल, असं पंतप्रधानांनी स्पष्ट केल्याचं पीएमओने म्हटलंय.

विनाकारण वाद निर्माण केला जातोयः PMO

प्रत्यक्ष ताबा रेषेचे स्थान बदलण्याच्या कुठल्याही प्रयत्नाला भारताकडून चोख उत्तर दिले जाईल. एलएसीवरील कुठल्याही उल्लंघनाला भारतीय सैन्याकडून निर्णायक आणि ठोस प्रत्युत्तर दिले जाईल. एलएसीवर यावेळी चिनी सैनिक मोठ्या संख्येने आले आहेत. चीनला त्यानुसार जशा तशे उत्तर भारताकडून दिले जात आहे. तेवढ्याच संख्येने भारातीय जवान सीमेवर तैनात करण्यात आलेत. गलवान खोऱ्यात १५ जूनला हिंसक संघर्ष झाला होता. चीनने त्यावेळी एलएसीजवळ बांधकाम करण्याचा प्रयत्न केला होता. तसंच ते रोखण्यास नकार दिला होता, असं पीएमओकडून स्पष्ट करण्यात आलंय.

मोदींचे वक्तव्य १५ जूनच्या घटनेवरः PMO

सर्वपक्षीय बैठकीत मोदींनी केलेले वक्तव्य हे गलवान खोऱ्यात १५ जूनला झालेल्या घटनेवर होते. या घटनेत भारताचे २० जवान शहीद झाले. लढता लढता या जवानांनी सीमेवर चीनचे मनसुबे उधळून लावले. भारतीय सीमेत चिनी सैन्याकडून कुठलीही घुसखोरी झालेली नाही. चिनी सैनिकांचा एलएसीजवळ बांधकाम करण्याचा प्रयत्न भारतीय लष्कराच्या १६ बिहार रेजिमेंटच्या जवानांनी हाणून पाडला. तसंच सीमेच्या उल्लंघनाचा प्रयत्नही मोडून काढण्यात आला, असं पीएमओकडून सांगण्यात आलंय.

गलवान हिंसा : …जेव्हा आई-मुलीनं दिला शहिदाच्या पार्थिवाला खांदा!

शहिदांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही; वायू सेना प्रमुख कडाडले

पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका

लडाखमधील भारत-चीन तणावार पंतप्रधान मोदींनी केलेल वक्तव्य हे चकीत आणि हतबल करणारे आहे, अशी टीका काँग्रेसने केलीय. लडाखमध्ये सर्वकाही अलबेल असल्याचं मोदी सांगत आहेत तर मग २० जवान शहीद कसे झाले? आणि गेल्या काही आठवड्यांपासून चीनसोबत लष्करी स्तरावर कुठल्या विषयावर चर्चा सुरू होती? असे प्रश्न काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी उपस्थित केलेत. लडाखमध्ये भारतीय सीमेत कुठलीही घुसघोरी झाली नाही असे पंतप्रधान मोदी सांगत आहेत. पण मोदींचे हे वक्तव्य लष्कर प्रमुख, संरक्षणमंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांनी आधी केलेल्या वक्तव्यांच्या उलट आहे. त्यांचे वक्तव्य चकीत आणि हतबल करणारे आहे, असं चिदम्बरम म्हणाले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

पैशाच्या व्यवस्थापनाचे धडे

जॉन कोलासो तुम्ही श्रीमंत असा की गरीब, हातात असलेल्या कसं करायचं हे जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही अडचणीत सापडणारच! वित्तीय वा आर्थिक...

Raza Academy: रजा अकादमीवर बंदीची मागणी – bjp mla atul bhatkhalkar demands ban on raza academy over spreading communal tension

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमुंबईतील भेंडीबाजार येथे फ्रान्सच्या पंतप्रधानांचे फोटो रस्त्यांवर लावून निदर्शने करणाऱ्या रजा अकादमीचे हे कृत्य देशद्रोही आहे. दहशतवादाविरोधात बोलणाऱ्या व्यक्तीचा...

Recent Comments