Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल poco m3: 6000mAh बॅटरीचा Poco M3 डिस्काउंट सोबत खरेदीची संधी, आज दुपारी...

poco m3: 6000mAh बॅटरीचा Poco M3 डिस्काउंट सोबत खरेदीची संधी, आज दुपारी १२ वाजता सेल – poco m3 to go on sale today via flipkart, price at 10999


हायलाइट्स:

  • Poco M3 स्मार्टफोनचा आज दुपारी १२ वाजता सेल
  • फोनला डिस्काउंट सोबत खरेदी करण्याची संधी
  • फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा

नवी दिल्लीः जर तुम्हाला गेल्यावेळीच्या सेलमध्ये पोकोचा हा बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळाली नसेल तर Poco M3 ला आज डिस्काउंट सोबत खरेदी करण्याची संधी आहे. कंपनी या फोनला आज फ्लिपकार्टवर उपलब्ध करणार आहे. या सेलची सुरुवात आज दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या या फोनची सुरुवातीची किंमत १० हजार ९९९ रुपये आहे.

वाचाः जगातील सर्वात मोठे Gmail, Netflix आयडी-पासवर्ड लीक, ‘असे’ चेक करा आपले अकाउंट

सेलमध्ये या फोनला आकर्षक बँक ऑफर सोबत खरेदी करता येऊ शकते. जर तुम्ही फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास ग्राहकांना ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळणार आहे. तर बँक ऑफ बडोदा मास्टरकार्ड वरून पहिल्यांदा शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांना या सेलमध्ये फोनच्या किंमतीवर १० टक्के सूट मिळणार आहे. फोनला नो कॉस्ट ईएमआय २ हजार रुपयांच्या किंमतीवर खरेदी करता येऊ शकते. एक्सचेंज ऑफर पोको एम ३ खरेदीवर ११ हजार २०० रुपयांचा फायदा मिळणार आहे.

वाचाः Jio, Airtel, Vi आणि BSNL चे ५० रुपयांपेक्षा कमी किंमतीतील ‘हे’ प्रीपेड प्लान्स

फोनची खास वैशिष्ट्ये
६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज ऑप्शन सोबत येणाऱ्या या फोनमध्ये ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन ६६२ एसओसी प्रोसेसर दिला आहे. ड्यूल नॅनो सिम सपोर्टचा हा फोन अँड्रॉयड १० वर बेस्ड MIUI 12 वर काम करतो. या फोनमध्ये 1080×2340 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.५३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे.

वाचाः २४ फेब्रुवारीपासून Flipkart Mobile Bonanza Sale, स्वस्तात खरेदी करा ‘हे’ स्मार्टफोन

पोकोच्या या फोनमध्ये रियरमध्ये फोटोग्राफीसाठी तीन रियर कॅमेरे दिले आहेत. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सोबत एक २ मेगापिक्सलचा मायक्रो शूटर आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 6000mAh ची बॅटरी दिली आहे. ही बॅटरी १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येते. कनेक्टिविटीसाठी यात 4G VoLTE, वाय-फाय, ब्लूटूथ, यूएसबी टाइप-C आणि 3.5mm हेडफोन जॅक दिला आहे.

वाचाः OnePlus ची खास ऑफर, फिटनेस बँड, पॉवर बँक, ईयरबड्स एकत्र खरेदीवर मोठी सूट

वाचाः Reliance Jio चा स्वस्त प्लान, १२५ रुपयांत महिनाभर अनलिमिटेड कॉलिंग आणि हाय स्पीड डेटा

वाचाः ३१ मार्चपर्यंत ‘हे’ काम करा, अन्यथा Pan Card चा वापर करता येणार नाहीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Ahmednagar: नगर: अपहरणानंतर सहा दिवसांनी ‘त्या’ उद्योजकाचा मृतदेह सापडला – ahmednagar missing businessman found dead near shrirampur midc area

नगर: श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथून सहा दिवसांपासून अपहरण झालेल्या गौतम झुंबरलाल हिरण या व्यावसायिकाचा मृतदेह श्रीरामपूर एमआयडीसी परिसरात रेल्वेमार्गाच्या कडेला रविवारी सकाळी आढळून...

Asif Shaikh: माजी आमदार आसिफ शेख यांच्यावर गुन्हा दाखल – police file fir against former mla asif shaikh for violate covid norms in malegaon

म. टा. वृत्तसेवा, मालेगावकाँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आसिफ शेख हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी...

Beef Racket: अवैधरित्या सुरु होता कत्तलखाना; पोलिसांनी धाड टाकताच…. – beef racket busted in amravati, one arrested

अमरावतीः विना परवानगी गाई ढोरांची कत्तल घडवून अवैधरित्या मास विक्री व्यवसाय चालविणाऱ्या कत्तलखान्यांपैकी एका कत्तलखान्यात धाड टाकून ३ बैल, २ गाई आणि एका...

Recent Comments