Home शहरं मुंबई POCSO Act: मुंबई: अल्पवयीन मुलीला शेजाऱ्यानं बळजबरी केला किस; ५ वर्षे कारावास...

POCSO Act: मुंबई: अल्पवयीन मुलीला शेजाऱ्यानं बळजबरी केला किस; ५ वर्षे कारावास – convict sentenced to 5 years for kissing minor girl by mumbai local court


मुंबई: शेजारच्या अल्पवयीन मुलीला बळजबरी किस केल्याप्रकरणी मुंबईतील एका न्यायालयाने आरोपीला पॉक्सो अंतर्गत पाच वर्षांची शिक्षा सुनावली. सध्या आरोपी आर्थर रोड तुरुंगात आहे. त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

पॉक्सो अंतर्गत तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेल्या दोषीचं नाव अब्दुल रहमान महबूब लोहार (वय ३०) आहे. त्याला मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले आहे. दोषी लोहारला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने आरोपीला ५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अँटॉप हिलमधील झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने २९ जून २०१८ रोजी शेजारी राहणाऱ्या लोहार याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्याची आठ वर्षांची मुलगी आहे. पीडितेचे वडील कामावरून घरी परतत होते. त्याचवेळी त्याच्या बहिणीचा फोन आला. तिने घटनेची माहिती दिली. त्याने तातडीने घरी धाव घेतली आणि नेमके काय घडले हे जाणून घेतले. घटनेबाबत पत्नी आणि मुलीने सर्व हकिकत सांगितली.

त्याने पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार, दोन्ही मुली सार्वजनिक शौचालयात गेल्या होत्या. मुली शौचालयात गेल्या असता, तिथे वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे अंधार होता. मोठ्या मुलीने तिच्या लहान बहिणीला मोबाइल आणायला सांगितले. आठ वर्षांची मुलगी मोबाइल घेऊन शौचालयाकडे जात असताना, अंधारात दबा धरून बसलेला शेजारचा लोहार याने मुलीला पकडले. त्यानंतर तिला जबरदस्ती किस केला. मुलीने आरडाओरडा केला. त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली. घडलेल्या घटनेबाबत तिने मोठ्या बहिणीला सांगितले. त्यानंतर घाबरलेल्या दोन्ही मुली आपल्या घरी गेल्या. घडलेली सर्व घटना तिने आईला सांगितली..

या घटनेनंतर जाब विचारण्यासाठी या मुलींचे पालक शेजारच्या लोहारच्या घरी पोहोचले. तिथे त्याची पत्नी होती. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि लोहारविरोधात तक्रार दाखल केली. मुलीची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली होती. या प्रकरणी न्यायालयात खटला सुरू झाला. मुलीच्या कुटुंबीयांनी बिनबुडाचे आरोप केले असल्याचे आरोपीच्या वकिलांनी सुनावणीवेळी सांगितले. घटनास्थळी अंधार असल्याने मुलींनी आरोपीला ओळखले नाही, असा युक्तिवादही त्यांनी केला. सरकारी वकीलांनी युक्तिवाद करताना सांगितले, की मुलींकडे खोटे बोलण्याचे काही कारणही नाही. खोटा आरोप केला जातो तेव्हा आरोपीपेक्षा पीडितेला अधिक त्रास सहन करावा लागतो, असे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले.

दरम्यान, ८ वर्षीय पीडित मुलीने न्यायालयात आरोपीला ओळखले. पोलीस, डॉक्टर आणि न्यायाधीशांसमोर पीडितेने एकच जबाब नोंदवला. सुनावणीदरम्यानही मुलीने तेच सांगितले. त्यामुळे कुणावर खोटे आरोप करण्याचे काहीच कारण नाही, असेही पीडितेच्या वकिलांनी सांगितले. अंतिम सुनावणीनंतर न्यायालयाने आरोपीला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

LIVE : मुंबईसाठी आरोग्य विभागाचं मोठं पाऊल, आता 3 ऐवजी 29 रुग्णालयांमध्ये लसीकरण | News

7:04 am (IST) विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस राज्यपालांच्या अभिभाषणावर होणार चर्चा चर्चेचा दुसरा आणि अंतिम दिवस चर्चेला मुख्यमंत्री उद्धव...

illegal parking in mumbai: अवैध पार्किंग जोरात – mumbai traffic police not strict action against illegal road parking in mumbai

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमहापालिकेने आपल्या वाहनतळांच्या परिसरातील अवैध पार्किंगवर कारवाईचे अधिकार वाहतूक पोलिसांना दिले. मात्र पोलिसांनी अद्याप ही कारवाई सुरू केलेली नाही....

Recent Comments