Home शहरं अहमदनगर police: लष्करातून बडतर्फ केलेल्या अधिकाऱ्यानं केली फसवणूक; पोलिसांनी असा रचला सापळा -...

police: लष्करातून बडतर्फ केलेल्या अधिकाऱ्यानं केली फसवणूक; पोलिसांनी असा रचला सापळा – an officer who was deported from the army committed fraud


म.टा.प्रतिनिधी, नगर: लष्करामध्ये अधिकारी असल्याचे सांगून लोकांना सैन्य दलामध्ये नोकरी लावण्याचे अमिष दाखवून आर्थिक व्यवहार करून फसवणूक करणाऱ्या तोतयाला पोलिसांनी जेरबंद केले आहे. मिलेट्री इंटेलिजन्सच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. प्रशांत भाऊराव पाटील ( रा.खानापूर, बेळगाव, कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे.

मिलेट्री इंटेलिजन्सच्या जम्मु काश्मिर येथील युनिटने नगरचे पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांना नगरमध्ये सैन्य दलात नोकरीस नसतानाही सैन्यदलाचा ड्रेस घालून एक व्यक्ती संशयितरित्या फिरत असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार संबंधित व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून पकडले. या व्यक्तीला त्याचे नाव विचारले असता त्याने प्रशांत भाऊराव पाटील असे सांगितले. यावेळी संबंधित व्यक्तीच्या अंगावर सैन्यदलाचा मेजर रँकचा युनिफॉर्म होता. त्यामुळे त्याची स्थानिक मिलेट्री इंटेलिजन्सच्या कर्मचाऱ्यांनी पंचासमक्ष चौकशी केली. सध्याचे नेमणुकीचे ठिकाण, पदाबाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर पोलिसांनी त्याच्या कारची व घराची झडती घेतली असता, त्यामध्ये लष्कराचे बनावट ओळखपत्र, लष्कराच्या ड्रेसवर लावण्याचे चिन्ह व फित, नेम प्लेट, लष्कराचे कॅन्टींन कार्ड, सैन्यदलात नोकरीसाठी वेगवेगळ्या लोकांकडून भरून घेण्यात आलेले आवेदन पत्र, दोन लष्कराचे मेजर रँकच्या अधिकाऱ्याचे ड्रेस, तीन लष्कराचे साधे ड्रेस, ‘ऑन आर्मी ड्युटी’ असा लिहिलेला बोर्ड, लष्कराचे चिन्ह असलेली गाडीची नंबरप्लेट आदी साहित्य मिळून आले आहे. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्याच्यावर नगरच्या एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.

वाचाः महापालिकेच्या सभेत तुकाराम मुंढेंवर आरोपांच्या फैरी, सभा सोडून निघाले

पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

वाचाः मुंबईच्या समुद्रात उसळल्या उंचच उंच लाटा; किनाऱ्यावर जाण्यास बंदी

लष्करातून झाला होता बडतर्फ

आरोपी प्रशांत भाऊराव पाटील हा आसाम रायफल रेजीमेंट येथे नोकरी करीत होता. वर्ष २०१४ मध्ये तो रजेवर आला होता. त्यानंतर मात्र तो पुन्हा कामावर हजर झाला नाही. त्यामुळे त्याला नोकरीवरून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर तो सैन्यदलाचे अधिकारी रँकचे युनीफॉर्म वापरून व बनावट ओळखपत्र तयार करून त्याचा वापर करून लोकांना सैन्य दलामध्ये नोकरी लावण्याचे अमिष दाखवून त्यांची फसवणूक करीत होता. दरम्यान, आरोपी प्रशांत भाऊराव पाटील याने कोणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी त्याची माहिती नगरच्या एमआयडीसी पोलिस स्टेशन (०२४१-२४१६१२३) येथे द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाचा: निसर्ग वादळग्रस्त लेप गावानं दाखवली प्रकाशाची वाटSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Pune Navale Bridge: पुण्यात नवले पुलाजवळ इतके अपघात का होतात?; कारण सापडलं! – various works are underway to prevent accidents near navale bridge

हायलाइट्स:नवले पुलाजवळील अपघात का होतात, याचे झाले सर्वेक्षण.तीव्र उतारावर जड वाहने बंद करून चालवली जात असल्याचे उघड.अपघात रोखण्यासाठी युद्धपातळीवर हाती घेतली कामे.पुणे: पुण्यातीलनवले...

pune girl death case: pune girl death case : पुण्यातील ‘त्या’ तरुणीच्या मृत्यूच्या बातम्यांविषयी उच्च न्यायालयाचे निर्बंध – high court restrictions on media trial...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः पुण्यात मागील महिन्यात ८ फेब्रुवारी रोजी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून तरुणीचा झालेला मृत्यू ( pune girl death case )...

Recent Comments