Home शहरं औरंगाबाद Police Suicide in Hingoli: Cop Suicide in Hingoli: हिंगोलीत पोलीस कर्मचाऱ्याची गोळी...

Police Suicide in Hingoli: Cop Suicide in Hingoli: हिंगोलीत पोलीस कर्मचाऱ्याची गोळी झाडून आत्महत्या – hingoli: police constable kills self with slr rifle


हिंगोली पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या ४५ वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याने आज शनिवारी दुपारच्या सुमारास स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना पोलिस मुख्यालयात घडली. या घटनेमुळं हिंगोली पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

वाचा: करोनाचे बळी ठरलेल्या पोलिसांना ‘हा’ सन्मान दूरच

हिंगोली पोलिस दलातील शस्त्रास्त्र दुरुस्ती विभागात कार्यरत असणारे पोलिस कर्मचारी जितेंद्र साळी यांनी आज, शनिवारी दुपारी पोलीस मुख्यालयात एसएलआर रायफलद्वारे स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. साळी त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत शहर पोलिस अधिक तपास करीत आहेत.

आणखी वाचा: तीन भाऊ ठरले होते संपूर्ण तालुक्याची डोकेदुखी; पोलिसांनी दिला ‘असा’ दणका

नैराश्येतून उचललं जातंय टोकाचं पाऊल

नैराश्यातून आत्महत्या होण्याचं प्रमाण सध्या बरंच वाढलं आहे. पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण असतो. त्यातच करोनाच्या साथीमुळं देशभरात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं यात भरच पडली आहे. कामाच्या वेळा आणि ताण-तणावामुळं पोलिसांमध्ये आजाराचं प्रमाणही मोठं आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत आजाराला कंटाळून अनेक पोलिसांनी जीवन संपवल्याचे प्रकार घडले आहेत. पोलीस दलासाठी आणि राज्य सरकारसाठी ही चिंतेची बाब ठरली आहे.

राज्यभरात करोनामुळं ४६ पोलिसांचे बळी

करोनाच्या काळात आघाडीवर राहून कर्तव्य बजावणाऱ्या हजारो पोलिसांना आतापर्यंत करोनाची लागण झाली आहे. यातील अनेक जण बरे झाले असले तरी शेकडो पोलीस आजही करोनाची झुंज देत आहेत. तर, आतापर्यंत राज्यात एका अधिकाऱ्यासह ४६ पोलिस कर्मचाऱ्यांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे.

वाचा: लष्करातून बडतर्फ केलेल्या अधिकाऱ्यानं केली फसवणूक; पोलिसांनी असा रचला सापळाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

bike taxi service in mumbai: बाइक टॅक्सी सुरू – rapido company has decided to start bike taxi service in mumbai

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबईच्या वाहतूककोंडीतून मार्ग काढण्यासाठी मुंबईकरांना नवीन प्रवासी वाहतूक सेवेचा पर्याय शुक्रवारपासून खुला झाला आहे. मुंबईत बाइक टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय...

पैशाच्या व्यवस्थापनाचे धडे

जॉन कोलासो तुम्ही श्रीमंत असा की गरीब, हातात असलेल्या कसं करायचं हे जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही अडचणीत सापडणारच! वित्तीय वा आर्थिक...

Recent Comments