Home शहरं मुंबई police tested positive: चोराला पकडण्यासाठी गेले अन् करोनानं पोलिसांनाच गाठलं - 10...

police tested positive: चोराला पकडण्यासाठी गेले अन् करोनानं पोलिसांनाच गाठलं – 10 policemen tested coronavirus positive after contact with thieves


मुंबईः करोनाच्या संकटात अहोरात्र गस्तीवर असणाऱ्या पोलिसांसमोर चोरांना पकण्याचंही आव्हान आहे. चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच करोनाची बाधा झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. मुंबईत चोरांची टोळी पकडण्यासाठी गेलेल्या दहा पोलिसांना करोनाची बाधा झाली आहे. तर, नवी मुंबईतही एका करोनाग्रस्त चोरामुळं १५ पोलिसांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तर, आरोपीच्या वकिलही क्वांरटाइन झाला आहे. नेहरु नगर पोलिस ठाण्यातील हे दहा पोलिस कर्मचारी असून त्यात दोन अधिकारीदेखील आहेत.

चोरांच्या टोळीत करोना पॉझिटिव्ह असल्याचं सांगण्यात येतंय. तसंच, या आरोनींना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर पोलिसही क्वारंटाइन आहेत. इलेक्ट्रिक स्टोअरवर दरोडा टाकून साडेपाच लाखांचा माल लंपास केल्याचा आरोप या चोरांवर होता. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केल्यानंतर त्यांची करोना चाचणीही करण्यात आली. मात्र, चाचणीचा अहवाल येईपर्यंत पोलिसांना संसर्ग झाला होता.

वाचाः सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंसह पाच जण करोना पॉझिटिव्ह

नवी मुंबईतील आरोपीला करोना

दरम्यान, ३० वर्षांच्या एका व्यक्तीनं तळोजात घरफोडी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलं होतं. आरोपीचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर पोलिस ठाण्यातील १५ पोलिसांना व एका वकिलाला होम क्वारंटाइन करण्यात आलं. ये सर्व चोराच्या संपर्कात आले होते.

जामीनावर रुग्णालयात दाखल केलं

अटक केलेल्या आरोपीत करोनाची लक्षण आढळली होती. त्यानंतर त्याची करोना चाचणी करण्यात आली. यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आरोपीला पोलिस ठाण्यातून जामीनार सोडण्यात आलं असून रुग्णालयात दाखल केलं आहे. अशी माहिती तळोजा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी काशीनाथ चव्हाण यांनी दिली.

वाचाः लॉकडाऊनमध्ये ‘टाटा’चा आधार; ४९४ कॅन्सरग्रस्तांवर उपचारSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

heavy rain in nashik: सात हजार हेक्टरला फटका – heavy rain hits to rice , tomato, grape’s, vegetable crop in nashik

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकपरतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील भात, टोमॅटो, मक्यासह द्राक्ष, भाजीपाला आणि काढणीवर आलेल्या पिकांना मोठा फटका बसला आहे. कृषी विभागाने केलेल्या...

Kulbhushan Jadhav case: Kulbhushan Jadhav पाकिस्तानवर दबाव; कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेची समीक्षा होणार – pakistan panel wants to review kulbhushan jadhav’s punishment fearing icj

इस्लामाबाद: कथित हेरगिरी प्रकरणी पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेची पाकिस्तानच्या संसदीय समितीकडून समीक्षा करण्यात येणार आहे. या समितीतील आठही सदस्यांनी या...

Sanjay Raut: ‘खडसेंना राष्ट्रवादीत घेण्यामागे पवारांची नक्कीच काहीतरी गणितं असतील’ – sharad pawar must have some equations in mind, sanjay raut on eknath khadse...

मुंबई: 'शरद पवार हे राजकारणातील सर्वात अनुभवी आणि तालेवार नेते आहेत. ते उगाच कोणाला पक्षात प्रवेश देणार नाहीत. खडसेंना राष्ट्रवादीमध्ये घेण्यामागे त्यांची नक्कीच...

Recent Comments