Home शहरं अहमदनगर police training center: रोहित पवारांमुळे जळगावातील प्रस्तावित पोलीस प्रशिक्षण केंद्र जामखडला -...

police training center: रोहित पवारांमुळे जळगावातील प्रस्तावित पोलीस प्रशिक्षण केंद्र जामखडला – police training center shifted at jamkhed


म.टा. प्रतिनिधी, नगरः महायुती सरकारच्या काळात मंजूर झालेले मात्र, नंतर जळगाव जिल्ह्यात हलविण्यात आलेले भारत बटालियनचे प्रशिक्षण केंद्र पुन्हा जामखेड तालुक्यात आणण्यात आमदार रोहित पवार यांना यश आले. आता हे केंद्र पूर्वीच्याच जागी म्हणजे जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथे होणार आहे. गृहविभागाचा तसा आदेश येथे प्राप्त झाला आहे.

तत्कालीन पालकमंत्री प्रा. राम शिंदे गृहराज्यमंत्री असताना २०१७ मध्ये भारत राखीव बटालियन (राज्य राखीव पोलिस बल गट ) च्या मुख्यालयासाठी कुसडगाव येथील सरकारी गायराण जमिनीची जागा निश्चित करण्यात आली होती. सुमारे शंभर एकर जागेत हे केंद्र मंजूर करण्यात आले होते. सुमारे पाच हजार जवानांना तेथे प्रशिक्षण देण्यात येणार होते. त्यामुळे जामखेड तालुक्यात विविध प्रकारचे व्यावसाय आणि सेवांना संधी मिळणार असल्याने आनंदाचे वातावरण होते.

वाचाः मुंबईत कोविड सेंटरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा; भाजपनं आकडेच दिले

मात्र, वर्षभरात हा निर्णय बदलण्यात आला. कुसडगाव येथील हे केंद्र रद्द करून ते जळगाव जिल्ह्यातील हातनूर-वरणगाव येथे हलविण्यात आले. त्यामुळे जामखेडकरांची निराशा झाली. त्यानंतर आमदार झालेले रोहित पवार यांनी यासाठी पुन्हा हालचाली सुरू केल्या. प्रशासकीय पातळीवर सूत्रे हलली. त्यामुळे हे केंद्र मंजूर पदांसह जळगाव जिल्ह्यातून पुन्हा जामखेडला हलविण्यात आले. शुक्रवारी गृहविभागाने यासंबंधीचा आदेश जारी केला. जळगावमधील अधिकाऱयांनी तेथे केंद्र उभारणे शक्य नसल्याने ते जामखेडला हलवावे, असा अहवाल दिल्याचे तांत्रिक कारण सांगण्यात येत असले तरी यामागे आमदार पवार यांचा पाठपुरावाही असल्याचे सांगण्यात येते.

वाचाः ग्राहकांची ‘हजामत’; केस कापणेही महागले; आता ‘एवढी’ रक्कम मोजा!

यासंबंधी आमदार पवार म्हणाले, ‘कोणी काहीही म्हणो हे प्रशिक्षण केंद्र फक्त आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे व आघाडी सरकारमुळेच मंजूर झाले आहे. या भारत बटालियन ट्रेनिंग सेंटरमुळे दुष्काळी कर्जत-जामखेड तालुक्यांसह शेजारील जिल्ह्यातील तरुणांनाही मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे’ तत्कालीन पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले, ‘आपण गृहराज्यमंत्री आसताना हा प्रकल्प जामखेडला आणायाचे ठरविले होते. त्यानुसार कुसडगाव येथील शंभर एकर जगाही हस्तांतरित करण्यात आली होती. परंतु मध्यंतरी हा प्रकल्प जळगाव जिल्ह्य़ात गेला. मात्र, अवश्यक असलेली जागा तेथे उपलब्ध नाही. त्यामुळे हा प्रकल्प आपल्याकडे आला, याचे मला समाधान आहे.’

हा तर जिल्ह्यावर मोठा अन्याय- एकनाथ खडसे

हतनूरला मंजूर झालेले पोलीस प्रशिक्षण केंद्र अहमदनगर जिल्ह्यात हलविण्यात आल्याने हा जळगाव जिल्ह्यावर झालेला मोठा अन्याय आहे. . त्यासाठी १०६ एकर जमीन देखील विनामूल्य उपलब्ध करून दिली होती. मात्र, आता ते जळगाव जिल्ह्याऐवजी अहमदनगर जिल्ह्यात होणार आहे, याचे वाईट वाटले. हे पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थलांतरित होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाचे पालकमंत्री, आमदारांनी याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला पाहिजे. जिल्ह्यातील जनतेनेही आपला विरोध दर्शवला पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजप नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sharad Pawar-Raj Thackeray: शरद पवार, राज ठाकरे, संजय राऊत आज एका मंचावर? – sharad pawar, raj thackeray, sanjay raut to share state in mumbai...

मुंबई: महाविकास आघाडीचे शिल्पकार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे तीन नेते आज...

Gupkar Declaration: काश्मिरात हालचालींना वेग; मेहबूबा मुफ्तीच्या निवासस्थानी आज मोठी बैठक – gupkar declaration peoples alliance for declaration meeting at mehbooba mufti residence

श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashmir) माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांच्या निवासस्थानी पीपल्स अलायन्स फॉर डिक्लरेशची (PAD) आज बैठक होत...

Recent Comments