Home शहरं मुंबई Pooja Chavan Suicide Case: 'संजय राठोड प्रायश्चित्त करतील असं वाटलं होतं' -...

Pooja Chavan Suicide Case: ‘संजय राठोड प्रायश्चित्त करतील असं वाटलं होतं’ – bjp leader pravin darekar attacks on sanjay rathod


हायलाइट्स:

  • पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर संजय राठोड यांची प्रतिक्रिया
  • बदनामी न करण्याचं केलं आहे आवाहन
  • संजय राठोड यांच्या प्रतिक्रियेनंतर भाजपची टीका

मुंबईः ‘संजय राठोड यांनी फक्त प्रसारमाध्यमांसमोर येण्याचं नाटक केलं. वाटलं होतं ते प्रायश्चित्त घेतील, राजीनामा देतील आणि निर्दोषत्व सिद्ध करतील. पण सत्ताच आपल्याला यातून बाहेर काढेल असा विश्वास त्यांना आहे. म्हणूनच त्यांनी राजीनामा दिला नाही,’ अशी टीका भाजपते नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री संजय राठोड दोन आठवड्यानंतर आज पहिल्यांदात सार्वजनिकरित्या समोर आले आहेत. त्यानंतर या प्रकरणात माझी बदनामी करण्यात येत असून मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करु नका अशी विनंती संजय राठोड यांनी केली आहे. त्यानंतर भाजपनं आक्रमक भूमिका घेत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

‘संजय राठोड यांनी पूजा चव्हाणचा मृत्यू कसा झाला? यावर भाष्य केलंच नाही. त्यांनी सत्य लपून ठेवण्याचा प्रयत्न केला. समोर येऊन ते प्रायश्चित्त करतील असं वाटलं होतं. त्यांनी राजीनामा दिलाच नाही,’ असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू नका; बदनामी थांबवाः संजय राठोड

‘संबंधित मंत्री व सरकारचं वागणं संशयास्पद असून १५ दिवस समाजाच्या नागरिकांना हाताशी धरून दबाव तंत्र अवलंबल असं चित्र आहे. त्यामुळे हे सर्व अनाकलनीय व घृणास्पद असून दोषारोप सिद्ध होईपर्यंत संजय राठोड यांनी राजीनामा देणं अपेक्षित आहे,’ असंही दरेकर म्हणाले आहेत.

पोहरादेवीची ‘पूजा’ तरी कशी पावेल?; भाजपचा खोचक सवाल

संजय राठोड काय म्हणाले?

समाजमाध्यम आणि प्रसारमाध्यमातून जे दाखण्यात आलंय त्यात तथ्य नाही हे मी खात्रीनं सांगू शकतो. मुख्यमंत्र्यांनी चौकशी सुरु केली आहे त्यात सर्व स्पष्टचं होईल. या प्रकरणावरुन गेल्या १० दिवसांपासून माझी बदनामी करण्यात येत आहे. मी सर्वांना विनंती करणार आहे पोलीस चौकशी करत आहेत तोपर्यंत माझ्या समाजाची, माझी बदनामी करु नका,’ अशी कळकळीची विनंती संजय राठोड यांनी केली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

LIVE : ‘भारत माता की जय’ म्हणत पंतप्रधान मोदींनी फुंकले प.बंगालच्या निवडणुकीचे रणशिंग | National

2:19 pm (IST) राज ठाकरेंच्या निर्णयाचं स्वागत - नितेश राणे 'शिवसेनेच्या प्रकल्पाविरोधाचं कारण वेगळं' राजन साळवींचाही प्रकल्पाला पाठिंबा - नितेश...

pm modi rally in kolkata live updates: pm modi rally live update : PM मोदींची कोलकात्यात प्रचारसभा, भाषण सुरू… – pm modi rally in...

कोलकाताः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोलकात्यातील ब्रिगेड मैदानावर प्रचारसभा होत आहे. या सभेला हजारो नागरिक आले आहेत. पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे सर्वांचं...

जातपंचायतीची बहिष्कारनीती सुरूच

म. टा. प्रतिनिधी, समाजमनावरील जातपंचायतीची दहशत उधळून लावल्याची घटना म्हसरूळ (ता. नाशिक) येथे ताजी असतानाच आता सिन्नरमध्ये जातपंचायतीने तरुणावर बहिष्कार घातल्याचा धक्कादायक प्रकार...

औरंगाबाद : विनयभंगप्रकरणी तीन आरोपी अटकेत

म. टा. प्रतिनिधी, कोचींग क्लासेसहून आपल्या घरी चाललेल्या एका करणाऱ्या तीन जणांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली. ऋषीकेश पालोदकर (२२, रा. पुंडलिकनगर), शुभम...

Recent Comments