Home शहरं मुंबई postgraduate examination: पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलण्याचा ठराव - resolution to postpone postgraduate...

postgraduate examination: पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलण्याचा ठराव – resolution to postpone postgraduate examination


म. टा. प्रतिनिधी, मुंबई

राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने ठराव केला असून, तो केंद्राकडे पाठवणार आहे. असा ठराव करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांची परीक्षा ऑगस्टमध्ये नियोजित आहे. मात्र, हे विद्यार्थी परीक्षेच्या अभ्यासाला लागल्यावर राज्यातील रुग्णांवर उपचारासाठी डॉक्टर्सची कमतरता जाणवेल. त्यातच पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा ठराव केला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी दिली.

फेसबुक लाइव्ह संवादात त्यांनी ही माहिती दिली. तसेच खासगी रुग्णालयांचे दरांबाबत निर्णय घेतल्यानंतर आता रुग्णवाहिकांच्या माध्यमातून होणारी सामान्य रुग्णांची पिळवणूक थांबावी यासाठी खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेऊन त्यांचा प्रतिकिमी दर निश्चित करून त्याप्रमाणेच दरआकारणी बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला असन, निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त आकारणी झाल्यास अशा रुग्णवाहिकांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

करोना रुग्णांवरील उपचारासाठी रेमडेमीसीवीर, फॅबीपीरावीर, टॅझीलोझुमा ही औषधे उपलब्ध होण्यासाठी राज्य सरकारने सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आणि औषध नियंत्रण प्राधीकरणाकडे मागणी केली. त्यानुसार राज्यात जूनअखेरीस ही औषधे प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध होतील, असे टोपे यांनी आवर्जून नमूद केले.

आशा सेविकांना मानधनवाढ

ग्रामीण भागांतील आरोग्यसेवेचा कणा म्हणून ओळख असलेल्या आशा कार्यकर्तींच्या मानधनात दोन हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, राज्यातील ७१ हजार आशा कार्यकर्त्यांना या निर्णयाचा लाभ मिळेल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. ग्रामीण भागांत आशा सेविका७४ प्रकारची विविध कामे करतात. त्याचा त्यांना कामानुसार मोबदला मिळतो. मात्र, राज्य सरकारकडून दोन हजार रुपये कायमस्वरूपी मानधन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अशा प्रकारे आशा सेविका आता १५ हजार रुपयांपर्यंत मानधन मिळवू शकतात. गटप्रवर्तकांना तीन हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

फेसबुक लाइव्ह संवादातील ठळक मुद्दे

– शहरी भागातील आरोग्य सेवेमध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाकडून समन्वय व्हावा यासाठी यापुढे संचालक (शहरी आरोग्य) हे नवीन पद निर्माण करण्यात आले असून, त्याची येत्या दोन दिवसांत नियुक्ती केली जाईल.

– करोनाबरोबर जगण्यासाठी एसएमएस ही त्रिसूत्री अंगीकारावी लागेल. यातील ‘एस’म्हणजे सोशल डिस्टसिंग, ‘एम’म्हणजे मास्क आणि ‘एस’म्हणजे सॅनिटायजरचा वापर करणे.

– राज्याचा रुग्णदुपटीचा कालावधी ३० दिवसांवर गेला आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर ५२ टक्के आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

aurangabad News : अनुकंपा तत्त्वावर मिळाली पालिकेत ३९ जणांना नोकरी – 39 people got jobs in the municipality on compassionate basis

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद'लॉकडाऊन'च्या काळात महापालिकेच्या आस्थापना विभागाने ३९ जणांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिली आहे. त्यामुळे अनुकंपा तत्वावरील नियुक्तीचा अनुशेष भरून निघाल्याचे मानले...

ibps clerk recruitment 2020: सरकारी बँकेत क्लर्क पदावर मोठी भरती; हजारो पदे रिक्त – ibps clerk recruitment 2020 ibps issued notification for clerk jobs

IBPS Clerk Recruitment 2020: सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. तुमच्यासाठी सरकारी नोकरी मिळवण्याची संधी आहे.पदाचे नाव - क्लर्क पदांची...

Delhi Police: महिलेनं मैत्री करण्यास नकार दिला म्हणून असा घेतला सूड… – delhi police arrested 2 they made victim fake facebook profile and put...

नवी दिल्ली : महिलेनं मैत्री करण्यास नकार दिला म्हणून एका विकृत व्यक्तीनं तिचा सूड घेण्यासाठी अजब मार्ग निवडला. या व्यक्तीनं महिलेचा मोबाईल क्रमांक...

Recent Comments