Home मनोरंजन Prajwal Devaraj and Chiranjeevi Sarja: चिरंजीवीला लागली होती मृत्यूची चाहूल; अखेरच्या चॅटमध्ये...

Prajwal Devaraj and Chiranjeevi Sarja: चिरंजीवीला लागली होती मृत्यूची चाहूल; अखेरच्या चॅटमध्ये म्हणाला…


मुंबई- कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी सरजाच्या आकस्मित निधनामुळे सिनेसृष्टीला धक्का बसला होता. वयाच्या ३९ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं होतं. चिरंजीवीच्या निधनावर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याला श्रद्धांजली वाहिली होती. दरम्यान, चिरंजीवीचा जवळचा मित्र प्रज्वल देवराजने अभिनेत्यासोबतचा शेवटचा स्क्रीनशॉट शेअर केला. या चॅटमध्ये चिरंजीवी उद्या आपल्यासोबत काय होणार हे माहीत नाही असं सांगताना दिसतो.

बाळाचं तोंडही पाहू शकला नाही चिरंजीवी, पत्नी आहे गरोदर

चिरंजीवीच्या निधनाच्या काही दिवसांपूर्वीचे हे चॅट आहेत. यात तो मित्रांसोबत ट्रीपला जाण्याचे बेत आखत होता. यात चिरंजीवी म्हणाला की, ‘एका आठवड्यासाठी आपण कुठे तरी फिरायला गेलं पाहिजे. फक्त आपणच. निवांत राहू.. एकमेकांसोबत वेळ घालवू आणि परत येऊ. विश्वास ठेव की आपण एकत्र असण्याशिवाय दुसरं काहीच महत्त्वाचं नाही. कारण आपल्याला माहीत नाही की उद्या आपल्यासाठी काय लिहून ठेवलं आहे.’

प्रज्वल देवराज आणि चिरंजीवी सरजाचे चॅट

गेल्या शनिवारी चिरंजीवी सरजाने त्याच्या छातीत दुखत असल्याचं सांहितलं होतं. यानंतर त्याला इस्पितळात नेण्यात आलं. मीडिया रिपोर्टनुसार, हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाला. २००९ मध्ये आलेल्या ‘वायूपुत्र’ या कन्नड सिनेमातून केली होती. याआधी त्याने काका अर्जुन सरजा यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. करिअरमध्ये २० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये त्याने काम केलं होतं.

कधी सलमान- आयुष्मानसोबत केलं होतं काम, आता चालवतो कचऱ्याची गाडी

चिरंजीवीचं जाणं त्याच्या कुटुंबावर दुःखाचा आभाळ कोसळण्यासारखं आहे. यातही त्याची पत्नी मेघना राजसाठी हा सर्वात कठीण काळ आहे. मेघना राज आणि चिरंजीवी सरजाचं २ मे २०१८ रोजी लग्न झालं होतं. मेघना गरोदर असून यातच पतीचा मृत्यू झाल्याने ती पुरती कोसळून गेली आहे. गेल्या १० वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये होते. यानंतर त्यांनी २०१८ मध्ये लग्न केलं. चिरंजीवी आपल्या पहिल्या बाळाला पाहूही शकला नाही याच गोष्टीची चुटपूट सर्वांना लागली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Devendra Fadnavis: फडणवीसांनी शब्द पाळला; करोना उपचारांसाठी सरकारी रुग्णालयांत दाखल – bjp leader devendra fadnavis tested covid positive admitted to government hospital

मुंबईः महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाची लागण झाली आहे. फडणवीस यांना पुढील उपचारांसाठी सरकारी रुग्णालयांत दाखल करण्यात...

renuka mata temple: देवी तुझ्या भक्तीने तहान, भूक हरली! – navratri 2020, history of renuka mata devi mandir

म. टा. प्रतिनिधी, फुलंब्रीफुलंब्री - राजूर रस्त्यावरील रिधोरा येथे रेणुका मातेचे भव्य मंदिर आहे. देवीच्या यात्रेसाठी दरवर्षी हजारो भाविक येतात. मात्र, यंदा करोनामुळे...

railway security force: पळालेली तीन चिमुकली पुन्हा मातेच्या कुशीत – three children found nashik railway station to railway security force after inform his family

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड"वडील जेलमध्ये, धुणीभांडी करणारी आई दिवसभर कामावर.. आम्हाला पोटभर जेवायलाही मिळत नाही..!" या गरिबीला कंटाळून तीन चिमुकली मुले अखेर घरातून...

Recent Comments