Home शहरं सोलापूर Prakash Ambedkar on Corona Caller Tune: Prakash Ambedkar: 'करोनाच्या कॉलर ट्यूनमागे काय...

Prakash Ambedkar on Corona Caller Tune: Prakash Ambedkar: ‘करोनाच्या कॉलर ट्यूनमागे काय कटकारस्थान आहे; मोदींनी खुलासा करावा’ – vanchit bahujan aghadi leader prakash ambedkar objects corona caller tune


सोलापूर: ‘मागील तीन महिन्यांपासून प्रत्येकाच्या मोबाइलवर कोविडची कॉलर ट्यून येतेय. या माध्यमातून लोकांना विनाकारण भीती दाखवली जातेय. यामागे नेमकं काय षडयंत्र आहे याचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावा,’ अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. (Prakash Ambedkar opposes Corona Caller Tune)

आणखी वाचा: आजोबांवरील टीकेला रोहितदादांचे खास ‘पवार स्टाइल’ उत्तर

देशात करोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून प्रत्येकाच्या मोबाइलवर एक कॉलर ट्यून वाजत आहे. करोनापासून सावध कसे राहायचे याची माहिती या कॉलर ट्यूनमधून दिली जाते. देशात अनलॉकचे पर्व सुरू झाल्यानंतर सूचनांमध्ये थोडा बदल करण्यात आला आहे. मात्र, कॉलर ट्यून सुरूच आहे. नंबर डायल करताच सुरू होणाऱ्या या ट्यूनमुळं लोक त्रस्त आहेत. प्रकाश आंबेडकरांनी यामागे षडयंत्र असावं, असा संशय व्यक्त केला आहे. ‘करोनाच्या नावाखाली सरकार सर्वसामान्य लोकांना ब्लॅकमेल करत आहे. एकाकी जीवन जगण्यास भाग पाडलं जात आहे, असा आरोप आंबेडकरांनी केला आहे. ते सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

करोनापेक्षा जास्त लोक पूर्वी टीबीने दगावले होते, तेव्हा कुठंही लॉकडाऊन झालं नव्हतं. करोनाच्या लॉकडाऊनमुळं लोकांची उपासमार होत आहे. उद्योगधंदे बंद आहेत. लोकांना नोकऱ्या नाहीत. त्यातच करोनाची कॉलर ट्यून लावून भीती निर्माण केली जात आहे. तीन महिन्यांनंतरही ही रिंगटोन बदलली नाही, यामागे काय षडयंत्र आहे, हे मोदींनी सांगितलं पाहिजे,’ असं आंबेडकर म्हणाले. ‘लोकांचं आयुष्य सरकारनं उद्ध्वस्त केलंय. लॉकडाऊनमुळे अनेक लोक मानसिक रोगी झाले आहेत. आरोग्य यंत्रणेमुळं अनेकांचा जीव वाचत आहेत, लॉकडाऊनमुळे नाही,’ असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला. ‘यापुढं कुठल्याही तारखेची वाट न बघता सर्वांनी नेहमीसारखं जीवन जगायला सुरुवात करावी, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

वाचा: तू पेपर वाचत नाहीस का; आव्हाडांनी अक्षय कुमारला खिंडीत गाठले

ही नवी चोरी आहे!

‘जगाच्या बाजारात तेलाच्या किंमती पडत असताना भारतात तेलाचे भाव वाढत आहेत. ही नवीन चोरी आहे, हे सरकार संघटित गुन्हेगारांचे आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात आणून कार्यक्रम केला, त्यामुळंच इथं करोनचा शिरकाव झाला. त्यासाठी पंतप्रधानांवर ३०२ चा गुन्हा दाखल व्हायला हवा, अशी मागणीही आंबेडकरांनी केली.

Live: सोने महागले; प्रति तोळ्याचा दर ५० हजारांवरSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sharjeel Usmani: गुन्हा रद्द करण्याची शर्जील उस्मानीची मागणी – elgar parishad 2021: sharjeel usmani moves bombay high court to quash fir against hime

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईपुण्यातील एल्गार परिषदेतील भाषणात आक्षेपार्ह भाषण केल्याबद्दल पोलिसांनी अलिगढ विद्यापीठातील माजी विद्यार्थी नेता शर्जील उस्मानी याच्याविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर...

Recent Comments