Home मनोरंजन preity zinta on kashmiri pandit sarpanch: अजय पंडिता यांना न्याय मिळालाच पाहिजे:...

preity zinta on kashmiri pandit sarpanch: अजय पंडिता यांना न्याय मिळालाच पाहिजे: प्रिती झिंटा – preity zinta demands justice for ajay pandita kashmiri pandit sarpanch


मुंबई: गेल्या सोमवारी ८ जून रोजी जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील लरकीपोरा भागात दहशतवाद्यांनी सरपंच अजय पंडिता यांची गोळ्या घालून हत्या केली होती. अजय पंडिता यांच्या हत्येचा देशभरात निषेध केला जात आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील या मुद्द्यावर सोशल मीडियाच्या आधारे मत मांडत पंडिता यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी गेली आहे. अभिनेत्री प्रिती झिंटा हिनं याच संदर्भात केलेलं ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

प्रितीनं अजय पंडिता यांना न्याय मिळाला पाहिजे तसंच दोषींविरोधात कडक कारवाई केली गेली पाहिजे असं म्हटलं आहे.’अनंतनाग इथं एका सरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनं मला प्रचंड दु:खी आणि अस्वस्थ केलंआहे. या दु:खाच्या क्षणी मी त्यांच्या कुटुंबाबद्दल शोक व्यक्त करते. त्यांच्या कुटुंबाला योग्य न्याय आणि दोषींविरोधात कडक कारवाई केली जाईल अशी अपेक्षा आहे’, असं प्रितीनं तिच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, अभिनेत्री कंगना रनौट हिनं देखील या संदर्भात मत व्यक्त केलं आहे. या मुद्द्यार बॉलिवूडमधले कलाकार गप्प का आहेत? असा सवाल तिनं उपस्थित केला आहे. अजय पंडिताचे समर्थन न केल्याबद्दल कंगनानं बॉलिवूड स्टार्सवर कडक टीका केली. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, जिहादी अजंडा चालवणारे लोक सेक्‍युलॅर‍िझमच्या कातडीखाली लपत आहेत. कंगनानं व्हिडिओमध्ये एका कार्डबोर्डवर लिहिलं होतं की, ‘मी हिंदुस्थान आहे. मला लाज वाटते. अजय पंडिताला न्याय मिळाला पाहिजे. ज्यांच्यावर जम्मू- काश्मीर येथील अनंतनाग येथे हत्या करण्यात आली.’

सेक्‍युलॅर‍िझमच्या नावाखाली जिहादी अजेंडा चालवला जात आहे- कंगना रणौत
कशी झाली अजय पंडिता यांची हत्या?

गेल्या सोमवारी ८ जून रोजी जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील लरकीपोरा भागात दहशतवाद्यांनी सरपंच अजय पंडिता यांची गोळ्या घालून हत्या केली होती. सायंकाळी ६ वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली होती. लष्कर ए तोयबाशी निगडीत दहशतवादी संघटना ‘द रेझिस्टंस फ्रंट (TRF)’नं या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. अजय पंडिता हे काँग्रेसशी संबंधित होते. अजय पंडिता यांच्या घराजवळच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु, इथं त्यांचा मृत्यू झाला.

काश्मीरी पंडित सरपंचाच्या हत्येनंतर स्थानिकांमध्ये दहशतSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Nitin Raut: ‘महापारेषण’मध्ये ८५०० पदांची भरती – energy minister nitin raut says mahapareshan will be recruiting for 8500 post

म. टा. प्रतिनिधी, मुंबईराज्य सरकारच्या ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीतील तांत्रिक श्रेणीतील जवळपास ८५०० रिक्त पदे भरण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत...

Heavy Vehicles: अखेर अवजड वाहनांना बंदी! – heavy vehicles finally banned from nandur to jail road nashik

म. टा. वृत्तसेवा, पंचवटीजेलरोडच्या सिंधी कॉलनीसमोर बुधवारी दाम्पत्याला ट्रकने चिरडल्यानंतर शहर वाहतूक पोलिसांना जाग आली. नांदूर नाक्यापासून जेलरोडकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यासाठी...

Recent Comments