Home शहरं सातारा Prithviraj Chavan: Prithviraj Chavan: घरच्या कामासाठी सरकारला प्रश्न विचारत नाही; चव्हाणांचा पवारांना...

Prithviraj Chavan: Prithviraj Chavan: घरच्या कामासाठी सरकारला प्रश्न विचारत नाही; चव्हाणांचा पवारांना टोला – india china face off: congress leader prithviraj chavan taunts ncp chief sharad pawar


सातारा: भारत-चीनमधील संघर्षाच्या मुद्द्यावरून राजकारण करणं चुकीचं असल्याचं सांगणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे. ‘जनतेचा आवाज म्हणून आम्ही चीनच्या मुद्द्यावरून आवाज उठवत आहोत. घरगुती कामासाठी आम्ही सरकारला प्रश्न विचारत नाही,’ असा खोचक टोला चव्हाण यांनी पवारांना हाणला आहे. (Prithviraj Chavan taunts Sharad Pawar)

वाचा: पिचड पिता-पुत्रांच्या मनात काय?; वडिलांनंतर मुलानंही केलं पवारांचं कौतुक

पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीच्या विरोधात काँग्रेसनं आज साताऱ्यात आंदोलन केलं. त्यानंतर काँग्रेस कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. गलवान खोऱ्यातील संघर्षाच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनी अलीकडंच काँग्रेसला सुनावले होते. ‘काल परवा झालेल्या भारत-चीन संघर्षावेळी चीनने भारताचा काही भाग बळकावला ही गोष्ट खरी आहे. किती भूभाग बळकावला हे माहीत नाही. पण १९६२ च्या युद्धानंतर चीननं आपला ४५ हजार किलोमीटरचा भूभाग बळकावला होता. तो अजूनही चीननं सोडलेला नाही. ही गोष्ट आपण विसरू शकत नाही. त्यामुळं आरोप करताना पूर्वी आपल्या काळात घडलं याचा मी विचार करतो. कारण हा राष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यात राजकारण आणता कामा नये, असं पवार म्हणाले होते. साताऱ्यातच ही पत्रकार परिषद झाली होती. त्यामुळं साहजिकच पवारांच्या या वक्तव्याबद्दल आज पृथ्वीराज चव्हाण यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

वाचा: ‘बरे झाले शरद पवारांनी शिवसेनेबरोबर सरकार घडवून आणले’

‘राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर राजकारण करू नये हे खरं आहे. मात्र, विरोधी पक्षाला प्रश्न विचारण्याचा पूर्ण हक्क आणि अधिकार आहे. त्यामुळं आम्ही प्रश्न विचारतच राहणार. आम्ही कुठल्याही घरगुती कामासाठी सरकारला प्रश्न विचारत नाही. लोकहिताच्या मुद्द्यावरच प्रश्न विचारत आहोत,’ असं चव्हाण म्हणाले.

वाचा: ‘नेहरूंनी चुका केल्या असतीलही, तुम्ही १९६२ मध्ये का रांगताय?’

वाचा: तुमच्या वीज बिलाचे आकडे का वाढलेत माहित्येय? ही आहेत कारणंSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

tender for roads: आठ रस्त्यांच्या निविदांना मिळाली मंजुरी – eight road tenders received approval

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादराज्य शासनाने मंजूर केलेल्या १५२ कोटी रुपयांतून महापालिकेमार्फत करण्यात येणाऱ्या नऊपैकी आठ रस्त्यांच्या कामांच्या निविदांना समितीने मंजुरी दिली आहे. आता...

sarsenapati hambirrao movie: ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडला ‘हा’ योगायोग – heavy rain interrupted the shooting once again said actor director pravin tarde

मुंबई टाइम्स टीमअभिनेते प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित 'सरसेनापती हंबीरराव' हा भव्य ऐतिहासिक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोणत्याही ऐतिहासिक चित्रपटासाठी भव्य...

mumbai: मुंबई: क्लिनिकमध्ये आलेल्या रुग्ण महिलेचं डॉक्टरने घेतलं चुंबन – mumbai 78 year old doctor arrested for touching woman patient inappropriately in clinic

मुंबई: क्लिनिकमध्ये आलेल्या रुग्ण महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली ७८ वर्षीय डॉक्टरला अटक करण्यात आली. रुग्ण महिला डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये आली होती. डॉक्टरने तिचे चुंबन...

Recent Comments