Home शहरं मुंबई Prithviraj Chavan: prithviraj chavan : ... म्हणून नरेंद्र मोदी चीनमध्ये लोकप्रिय झाले;...

Prithviraj Chavan: prithviraj chavan : … म्हणून नरेंद्र मोदी चीनमध्ये लोकप्रिय झाले; चव्हाणांची खोचक टीका – congress leader prithviraj chavan attack on prime minister narendra modi said he became popular in china


मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनबाबत सतत बोलत आहेत. त्यामुळे ते चीनमध्ये लोकप्रिय ठरले आहेत, अशी खोचक टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. चीनने भारतीय भूभागात घुसखोरी केली नसल्याचं वक्तव्य मोदींनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भारतीय जवानांचं मनोबल ढासळलं असल्याची टीकाही त्यांनी केली. ( prithviraj chavan attack on narendra modi )

भारत-चीन सीमेवर चिनी सैनिक आणि भारतीय जवानांमध्ये झालेल्या झटापटीत २० भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या हद्दीत चीनने घुसखोरी केली नाही. भारताच्या कोणत्याही चौकीवर चीनने ताबा मिळविलेला नाही, असं स्पष्ट केलं होतं. गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांबरोबर झालेल्या झटापटीवर आम्हाला चिंता आहे आणि सीमेवर तैनात असलेल्या जवानांप्रती आम्हाला अभिमानही आहे, असं मोदींनी म्हटलं होतं. तर सीमेचं रक्षण करणं आणि घुसखोरी रोखणं ही सरकारची प्रमुख जबाबदारी आहे. काँग्रेसने हा मुद्दा सातत्याने उचलून धरला. पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचं चव्हाण म्हणाले.

‘सीमावादावर खरं कोण बोलतंय? भारताचे राजदूत की पंतप्रधान?’

गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीबाबत केंद्र सरकारमध्येच वेगवेगळी मते आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने नियंत्रण रेषेवर चिनी सैनिकांनी तळ ठोकल्याचं आणि चिनी सैनिकांनी नियंत्रण रेषेवर कारवाया सुरू केल्याचं मान्य केलं आहे. मात्र, सर्व पक्षीय बैठकीत मोदींनी नियंत्रण रेषेवर कोणतीच घुसखोरी झाली नसल्याचं म्हटलं आहे, याकडेही चव्हाण यांनी लक्ष वेधले आहे.

  • काँग्रेसच्या बचावासाठी शिवसेना धावली; भाजपला दिला ‘हा’ सल्लाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

yediyurappa karnataka cm: ‘कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरून येडियुरप्पांची लवकरच उचलबांगडी’ – yediyurappa will not remain cm for long karnataka bjp mla hints at rebellion

बेंगळुरू: भाजपचे ज्येष्ठ आमदार बासनागौडा पाटील यतनाल यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहेत. बीएस येडियुरप्पा हे फार काळ मुख्यमंत्रीपदी राहणार नाहीत. त्यांचा उत्तराधिकारी हा...

mumbai news News : मुंबईवरील वीजसंकट: ऊर्जामंत्री देणार ‘शॉक’; ‘तो’ मोबाइल तपासणार! – mumbai power cut energy minister nitin raut warned of stern action

मुंबई:मुंबई आणि एमएमआर परिसराचा वीज पुरवठा ठप्प होण्यावरून ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ऊर्जा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. या प्रकरणी...

Recent Comments