Home देश private train: रेल्वेचे खासगीकरण, २०२३ पर्यंत धावणार खासगी ट्रेन! - railways plans...

private train: रेल्वेचे खासगीकरण, २०२३ पर्यंत धावणार खासगी ट्रेन! – railways plans to operate private train by april 2023


नवी दिल्लीः रेल्वेच्या खासगीकरणाच्या दिशेने सरकारने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. एप्रिल २०२३ पर्यंत देशात अनेक खासगी ट्रेन रूळावर धावतील, अशी घोषणा रेल्वे बोर्डाने केलीय. वेगवेगळ्या मार्गावर धावणाऱ्या खासगी ट्रेनचे भाडे किती असेल? असा प्रश्न उपस्थित केला गेला. तर विमान प्रवासाच्या भाड्याच्या तुलनेत खासगी ट्रेनचे भाडे असेल. या खासगी ट्रेनचे भाडे रेल्वेच निश्चित करेल, असं रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी गुरुवारी सांगितलं.

खासगी ट्रेनसाठी पुढच्या वर्षी फेब्रुवारी किंवा एप्रिलपर्यंत निविदा काढण्यात येतील. यानुसार २०२३पर्यंत खासगी ट्रेन रुळावर धावतील, असं विनोद कुमार यादव म्हणाले. खासगी कंपन्यांना उत्पन्नाचा काही भागही द्यावा लागले. सर्वाधिक भागिदारी असलेल्या दावेदाराला कॉन्ट्रॅक्ट दिले जाईल. मालवाहतुकीवरील शुल्काच्या माध्यमातून खर्चांची वसुली केली जाईल, असं यादव म्हणाले.

ऊर्जा शुल्कही लावले आहे. यामुळे आम्ही अधिक ऊर्जा कुशल ट्रेन्सना पुरवता यईल. रेल्वे कोच भारतातच तयार होतील. या खासगी ट्रेन्सचे चालक आणि गार्ड्सही रेल्वेच पुरवेल. पॅसेंजर ट्रेन्समधील खासगी भागिदारी ही रेल्वेच्या एकूण वाहतुकीच्या फक्त ५ टक्के इतकी असेल. यानुसार २०२३ पर्यंत खासगी ट्रेन धावतील. सर्व डबे मेक इन इंडिया अंतर्गत खरेदी केले जातील, अशी माहिती यादव यांनी दिली.

आता ऊर्जा क्षेत्रात चीनला झटका, आयातीचे नियम कडक करणारः आर. के. सिंह

रेल्वेने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन खासगी ट्रेन्सद्वारे झाले नाही तर संबंधित कंपन्यांवर दंडही आकारण्यात येईल. भागिदारीसोबतच ट्रेनही खासगी कंपन्यांनाच आणावी लागतील आणि त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे कामही त्यांनाच करावे लागेल, असं यादव यांनी स्पष्ट केलं.

पुतीन यांना मोदींनी दिल्या शुभेच्छा; दोघांमध्ये झाली ही महत्त्वाची चर्चा

भारतीय रेल्वेने आपल्या रेल्वे मार्गावर खासगी ट्रेन चालवण्या करता खासगी गुंतवणुकीसाठी उचललेले हे पहिले पाऊल आहे. गेल्या वर्षी आयआरसीटीसीने लखनऊ-दिल्ली तेजस एक्स्प्रेसपासून या योजनेची सुरुवात केलीय. सध्या आयआरसीटीसीकडून तीन खासगी ट्रेन चालवण्यात येत आहेत. वाराणसी-इंदूर मार्गावर काशी-महाकाल एक्स्प्रेस, लखनऊ-दिल्ली तेजस आणि अहमदाबाद-मुंबई तेजस एक्स्प्रेस या ट्रेन्सचा यात समावेश आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aurangabad Corona Update: नव्या ३८ बाधितांची भर; ५६ जणांनी सुट्टी – aurangabad corona update : aurangabad reported 38 new corona cases in yasterday

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजिल्ह्यात शनिवारी ३८ करोनाबाधितांची भर पडली. त्यात शहरी भागातील ३१ तर ग्रामीण भागातील सात रुग्णांचा समावेश आहे.सध्या जिल्ह्यात १६७ करोनाबाधित...

public health service in nashik: सार्वजनिक सुटीतही ओपीडी सुरूच ठेवा – opd service in civil hospital and other government hospital should be continue even...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकसिव्हिल हॉस्पिटलसह अन्य सर्व सरकारी हॉस्पिटल्समध्ये दुपारी १ ते ४ यावेळेत विशेष बाह्यरुग्ण विभाग कार्यान्वित करावा. तसेच योगा क्लासेससारखे...

Recent Comments