Home देश Priyanka Gandhi Attacks UP Government: मी इंदिरा गांधींची नात आहे, भाजपची अघोषित...

Priyanka Gandhi Attacks UP Government: मी इंदिरा गांधींची नात आहे, भाजपची अघोषित प्रवक्ता नाही; प्रियांकांचे उत्तर


नवी दिल्ली: कानपूरमधील एका आश्रयगृहातील अनेक मुलींना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या मुद्दयावरून राजकारण तापत चालले आहे. याच मु्द्द्यावरून काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश बाल संरक्षण आयोगाने काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांना नोटीस पाठवली होती. त्या नोटीशीला आज शुक्रवारी प्रियांका गांधी वाड्रा यांनी उत्तर दिले आहे. मी इंदिरा गांधी यांची नात आहे, मी भारतीय जनता पक्षाची अघोषित प्रवक्ता नाही, जी कारवाई करायची आहे ती करा, असे या नोटीशीला उत्तर देताना प्रियांका म्हणाल्या.

प्रियांका गांधी वाड्रा नोटीशीला उत्तर देताना म्हणाल्या की, जनतेची एक सेविका या नात्याने माझे कर्तव्य उत्तर प्रदेशच्या जनतेप्रती आहे. आणि ते कर्तव्य आहे सत्य लोकांसमोर ठेवणे. माझे काम कोणत्या सरकारी कामांचा प्रचार करणे हे नाही. उत्तर प्रदेश सरकार आपल्या इतर विभागांद्वारे मला व्यर्थ धमक्या देत वेळ वाया दवडत आहे.

जी काही कारवाई माझ्यावर करायची असेल, ती बेलाशक करावी. मी सत्य लोकांपुढे मांडत राहीन. मी इंदिरा गांधी यांची नात आहे. काही विरोधी पक्षांच्या नेत्यांसारखी मी काही भारतीय जनता पक्षाची अघोषित प्रवक्ता नाही, असे म्हणत प्रियांका गांधी वाड्रा यांनी उत्तर प्रदेश सरकारला उत्तर देताना इतर पक्षातील नेत्यांनाही टोला लगावला आहे.

प्रियांका गांधींचे ट्विट

कानपूरमधील एका आश्रयगहात गेल्या काही दिवसांपूर्वी खळबळ उडाली होती. आश्रयगृहातील ५७ मुलींना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाली. या व्यतिरिक्त यातील एकूण ६ मुली गरोदर असल्याचेही स्पष्ट झाले होते. यानंतर हा मुद्दा काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा उपस्थित करत होत्या. काही दिवसांपूर्वी प्रियांका गांधी वाड्रा यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर कानपूर आश्रयगृहात अल्पवयीन मुली गरोदर राहण्यावर आणि विशेषत: एचआयव्ही आणि हेपेटायटीस सी चा संसर्ग होण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. यामुळेच उत्तर प्रदेशच्या प्रदेश बाल संरक्षण आयोगाना प्रियांका गांधी वाड्रांना नोटीस धाडली आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

म. टा. वृत्तसेवा, सटाणा मागील काही वर्षात शेतात सततची नापिकी आणि वाढत्या कर्जाच्या ओझ्याखाली दबल्याने तळवाडे दिगर येथील शेतकऱ्याने शुक्रवारी (दि.२२) आपल्या शेतातील...

Bharat Arun: चौथी कसोटी जिंकण्यासाठी भारतीय संघाने घेतली होती मोठी रिस्क – aus vs ind indian cricket team bowling coach bharat arun reaction on...

नवी दिल्ली: ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाने घेतलेल्या एका धाडसी निर्णयामुळे विजय मिळाल्याचे संघाचे गोलंदाजीचे कोच भरत अरुण ( bharat arun) यांनी सांगितले....

Anna Hazare: अण्णा हजारेंच्या आंदोलनाचे काय होणार? संभ्रम वाढला – no team this time, anna hazare will alone go on fast over farmers issue

अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनासाठी यावेळी ‘टीम अण्णा’ तयार करण्यात आलेली नाही. वेळ पडलीच तर हजारे एकटेच उपोषण सुरू करणार, हे...

Recent Comments