Home देश Priyanka Gandhi Vadra: प्रियांका गांधींचे सत्ताधारी भाजपला उत्तर, आता इथे राहायला जाणार?...

Priyanka Gandhi Vadra: प्रियांका गांधींचे सत्ताधारी भाजपला उत्तर, आता इथे राहायला जाणार? – priyanka gandhi planning to shift from delhi to lucknow


लखनऊः दिल्लीतील लोधी इस्टेट येथील सरकारी बंगला खाली करण्याची नोटीस केंद्र सरकारने काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांना बजावली. सरकारच्या या निर्णयाला आता प्रियांका गांधी भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशातील लखऊनमध्ये शिफ्ट होण्याची दाट शक्यता आहे. प्रियांका गांधी लवकरच लखनऊमधील लखनऊमधील कौल हाऊसमध्ये शिफ्ट करणार आहेत, अशी माहिती प्रियांका गांधी यांच्या निकवर्तीयांनी दिलीय. कौल हाउस हे इंदिरा गांधी यांच्या मामी शीला कौल यांचे आहे.

प्रियांका गांधी या पक्षाच्या सरचिटणीस आहेत. त्यासोबतच त्यांच्यावर उत्तर प्रदेशची पक्षाची जबाबदारी आहे. त्या काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या प्रभारी आहेत. यामुळे प्रियांका गांधी यांचा हा निर्णय रणनितीचा भाग मानला जात आहे. करोना संसर्गामुळे प्रियांका गांधी यांच्या यूपीतील भेटी कमी झाल्या होत्या. यामुळे लखनऊमधील त्या शिफ्ट झाल्यातर राजकीय दृष्टीने काँग्रेससाठी हे महत्त्वाचं ठरणार आहे.

प्रियांका गांधी काँग्रेस सरचिटणीस झाल्यानंतर यूपीमध्ये त्या अधिक सक्रिय झाल्या. लॉकडाउनमधील स्थलांतरी मजुरांचा मुद्दा असो की त्यांना बसने घरी पाठण्याचा मुद्दा किंवा सोनभद्रमधील शेतकऱ्यांच्या नरसंहारानंतर झालेले आंदोलन प्रियांका गांधी या हे मुद्दे उपस्थित करत राहिल्या.

एका महिन्याच्या आत सरकारी बंगला सोडा, प्रियांका गांधींना केंद्राची नोटीस

आगामी निवडणुकीपूर्वी पक्षाची पाळंमुळं घट्ट करणार

उत्तर प्रदेश निवडणुकांपूर्वी प्रियांका गांधी यांना लखनऊमध्ये आपल पाळंमुळं घट्ट करण्याचा निर्णय आधीच घेतला होता. इंदिरा गांधी यांच्या मामी शीला कौल यांच्या घरी ‘कौल हाउस’च्या दुरुस्तीचे काम आधीच करण्यात आले आहे. लखनऊत प्रियांका गांधी याच घरात राहतील, असं सांगण्यात येतंय.

चिन्यांनाही असंच बाहेर करा, प्रियांका गांधींवरून मेहबूबा मुफ्तींचा सरकारला टोला

प्रियांका गांधी यांची मुलं त्यांच्याबरोबर लखनऊला शिफ्ट होणार की नाही याचा निर्णय अद्याप झालेला नाही. पण उत्तर प्रदेशातील राजकारणात पूर्णपणे सक्रिय आणि सहभागी होण्यासाठी प्रियांका गांधी मात्र नक्कीच शिफ्ट होमार आहेत. उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पक्ष बळकट करण्यासाठी आपला अधिकाधिक वेळ प्रियांका गांधी देणार आहेत.

सोनिया गांधी यांच्या प्रकृतीमुळे प्रियांका गांधी चिंतेत असतात. दिल्लीत असल्याने आई सोनिया गांधी यांच्या १० जनपथ येथील घरीच त्या अधिक वेळ असतात. पण उत्तर प्रदेशच्या आगामी निवडणुका आणि समीकरणं पाहता येथे वेळ देणं काँग्रेससाठी फायद्याचं ठरणार आहे. यामुळे प्रियांका गांधी यांच्या टीमच्या सूचनेवरून हा निर्णय घेण्यात आला. यादरम्यान प्रियांका गांधी या दिल्लीत महिन्यातून एक दोन आठवड्यासाठी येत-जात राहतील.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

bad cholesterol increased in youths: ‘लॉकडाउन’मध्ये तरुणाईच्या चरबीत वाढ – youths bad cholesterol levels increased in body due to work home home and lockdown

म. टा. प्रतिनिधी, पुणेकरोनाच्या साथरोगाच्या काळात झालेल्या लॉकाडाउनदरम्यान 'वर्क फ्रॉम होम'मुळे शारीरिक हालचालींवर आलेल्या मर्यादा आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरातील 'बॅड कोलेस्ट्रॉल'ची पातळी...

e catering services in railway: Indian Railway : लसीकरण मोहिमेसोबतच रेल्वेच्या प्रवाशांना खुशखबर – indian railways allows e catering services at selected railway stations...

नवी दिल्ली : आजपासून देशभरात करोनाविरुद्ध लसीकरण मोहिमेला सुरुवात झालीय. त्याचसोबत रेल्वेकडूनही प्रवाशांना खुशखबर देण्यात आलीय. भारतीय रेल्वेकडून देशातील काही ठराविक रेल्वे स्थानकांवर...

बळीराजाला बळ

म. टा. प्रतिनिधी, मुंबई मागील ५० दिवस दिल्लीत वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी संयुक्त...

Recent Comments