Home देश पैसा पैसा Provident Fund interest likely to cut: केंद्र सरकारला चणचण; ‘पीएफ’वर दर कपातीचे...

Provident Fund interest likely to cut: केंद्र सरकारला चणचण; ‘पीएफ’वर दर कपातीचे संकट – interest on provident fund likely to be reduce


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : नोकरीच्या काळात हळूहळू साठवल्या जाणाऱ्या भविष्यनिर्वाह निधीवर जुलैपासून कमी व्याज मिळण्याची शक्यता आहे. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेला (ईपीएफओ) परतावा कमी मिळत असल्यामुळे ही परिस्थिती निर्माण होणार आहे. सध्या ईपीएफओ भविष्यनिर्वाह निधीवर ८.५ टक्के व्याज देत आहे. मात्र, मार्च महिन्यामध्ये याची घोषणा झाली असली तरी अद्याप या व्याजदरावर केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून शिक्कामोर्तब व्हायचे बाकी असल्याचे समजते.

चालू वर्षासाठी पीएफवर ८.५ टक्के घोषित व्याजदर देता येईल काय, याबाबत चाचपणी करण्यासाठी संघटनेच्या वित्त, गुंतवणूक आणि लेखा परीक्षण समितीची बैठक लवकरच होणार आहे. ८.५ टक्के व्याजदरावर केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे शिक्कामोर्तब झाल्यानंतरच कामगार मंत्रालय त्याविषयी अधिसूचना जारी करणार आहे.

केंद्र सरकारने कोव्हिड-१९ संसर्गाशी मुकाबला करताना पैशांची चणचण भासू नये यासाठी अनेक उपाय योजले आहेत. त्यापैकी भविष्यनिर्वाह निधी योगदान तीन महिन्यांसाठी १२ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणून कर्मचाऱ्यांच्या हातात अधिक वेतन यावे अशी सोय केली होती. त्यातच लॉकडाउनच्या काळात ईपीएफओच्या सर्वच कार्यालयांतून सुरक्षित वावराचे सर्व निकष पाळून ५० टक्क्यांपेक्षा कमी कर्मचारी बळाच्या साह्याने कामकाज सुरू होते.

दरवाढ सुरूच ; जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव
नव्या कर्मचाऱ्यांची भर
एप्रिल महिन्यामध्ये संघटित क्षेत्रात एक लाख ३३ हजार नव्या कर्मचाऱ्यांची भर पडली. मात्र, या नोकरभरतीवर कोव्हिड-१९ चे सावट दिसून आले. त्यापूर्वी मार्च महिन्यात नव्या सदस्यतेचे प्रमाण घटून ईपीएफओ सदस्यनोंदणी पाच लाख ७२ हजारांवर आली. त्याआधी फेब्रुवारी महिन्यात १०.२१ लाख सदस्यांची नोंदणी ईपीएफओकडे झाली होती. सामान्य स्थितीत ईपीएफओकडे दरमहिना सात लाख नवे कर्मचारी सभासद नोंदवले जातात.

रक्कम काढण्याची सुविधा
एप्रिल आणि मे महिन्यांत कोव्हिड-१९च्या कहरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या साठलेल्या भविष्यनिर्वाह निधीपैकी काही रक्कम काढून घेण्यास ईपीएफओने परवानगी दिली होती. याच काळात ३.६१ दशलक्ष कर्मचाऱ्यांनी रक्कम काढून घेण्यासाठी दावे केले होते. एकूण ११,५४० कोटी रुपयांचे दावे ईपीएफओने मंजूर केले. त्यापैकी ४,५८० कोटी रुपयांचे दावे कोव्हिड-१९ अॅडव्हान्स अंतर्गत केले गेले होते. या आगाऊ रकमेची मोठी मदत सदस्य कर्मचाऱ्यांना एप्रिल व मे या दोन महिन्यांत झाली. विशेषतः दरमहिना १५ हजार रुपयांपेक्षा कमी वेतन मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना या योजनेचा विशेष लाभ घेता आला.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

सटाण्यातील व्यावसायिक माखिजा यांची आत्महत्या

म. टा. वृत्तसेवा, सटाणा सटाणा शहरातील बागलाण ब्रॅण्डी हाऊसचे संचालक (वय ६२) यांनी रविवारी सायंकाळी लोहणेर येथील पुलावरून गिरणा नदीपात्रात उडी मारून ...

व्यापारी सासूरवाडीला गेला होता, फ्लॅटवर परतल्यानंतर दृश्य बघून हादरलाच

म. टा. प्रतिनिधी, : सासूरवाडीला गेलेल्या कापड व्यवसायिकाचे घर फोडून चोराने दोन लाखांची रोकड आणि दोन तोळ्याचे दागिने लांबविल्याची घटना सोमवारी (२३ नोव्हेंबर)...

oppo a15: ओप्पोचा हा बजेट स्मार्टफोन आणखी स्वस्त, कंपनीकडून मोठी कपात – oppo a15 gets a rs 1,000 price cut in india, know new...

नवी दिल्लीः ओप्पोने आपला बजेट स्मार्टफोन OPPO A15 च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. त्यामुळे या फोनची किंमत आता १० हजार रुपयांपेक्षा कमी...

Recent Comments