Home टेकनॉलॉजी पॅक कॉम्पुटर मोबाइल PUBG MOBILE: ...म्हणून PUBG Mobile वर बंदी नाही - pubg mobile somehow...

PUBG MOBILE: …म्हणून PUBG Mobile वर बंदी नाही – pubg mobile somehow escaped govt ban and indians are wondering why


नवी दिल्लीः भारतात सोमवारी ५९ प्रसिद्ध चायनीज अॅप्सवर बंदी घालण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. यात टिकटॉक पासून यूसी ब्राऊझर, हेलो अॅप आणि शेअरइट यासारख्या प्रसिद्ध अॅप्सचा समावेश आहे. भारतात या अॅप्सचे कोट्यवधी युजर्स होते. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या यादीत PUBG Mobile आणि Zoom अॅप्सचे नाव नाही. तरी सुद्धा हे दोन्ही अॅप्स ट्रेंडमध्ये आले आहेत. बंदी घातलेली यादी पाहिल्यानंतर बरेच लोक विचारीत आहेत की, जर प्रसिद्ध अॅप्सवर बंदी घातली तर या दोन अॅप्सचा यात समावेश का नाही.

वाचाः TikTok प्ले स्टोरवरून आउट, हळूहळू गायब होताहेत अॅप

पबजी खरंच, चायनीज अॅप आहे?
पबजी (PlayerUnknown’s Battlegrounds) एक प्रसिद्ध अॅक्शन गेम आहे. याला दक्षिण कोरियाची व्हिडिओ गेम कंपनी Bluehole च्या सब्सिडियरी कंपनीने बनवले आहे. हे २००० मध्ये आलेल्या जपानी चित्रपट Battle Royale ने प्रेरित आहे.

या गेमचे कनेक्शन म्हणजे, गेम कंपन्यांपैकी एक Tencent Games चीनची कंपनी आहे. टेंसेंट गेम्सने पबजीला चीनमध्ये लाँच करण्याची ऑफर दिली होती. त्यासाठी काही भागीदारी खरेदी केली होती. परंतु, PUBG ला चीनमध्ये बंदी घातली आहे. चीनमध्ये याला नवीन नावाने आणले आहे. प्ले स्टोरवर या गेमचे पब्लिशर टेंसेंट गेम्स आहे. पबजीची ऑनरशीप संयुक्त आहे. परंतु, Zoom कम्यूनिकेशन एक अमेरिकन कंपनी आहे. याचे फाउंडर Eric Yuan आहे. ज्यांचा जन्म चीनमध्ये झाला होता. परंतु, ते अमेरिकन नागरिक आहेत.

Shareit

वाचाः फोनमध्ये सुरू असलेले चायनीज अॅप्स होणार बंद

या अॅप्सवर बंदी का घातली ?
ज्या अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. त्यात टिकटॉक, Shareit, UC ब्राउजर, Likee, Mi कम्युनिटी, Club Factory, baidu मॅप, Helo, UC न्यूज, Bigo लाइव, Mi व्हिडिओ कॉल-शाओमी, Vigo विडियो, क्लीन मास्टर, कॅम स्कॅनर सह ५९ अॅप्सचा समावेश आहे.

वाचाः फोनमधून हटवा चीनी अॅप, असे निवडा भारतीय अॅप

वाचाः चीनी अॅप्स का बंद केले?, आता युजर्स काय करणार?

वाचाः सरकारचा मोठा निर्णय, TikTok सह ५९ चायनीज अॅपवर बंदी



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

covaxin: ‘कोव्हॅक्सिन’ लस घेण्यास RML डॉक्टरांचा नकार, ‘कोव्हिशिल्ड’ची मागणी – resident doctors of ram manohar lohia hospital refusing to take covaxin

नवी दिल्ली : देशात शनिवारी कोव्हिड १९ लसीकरण मोहिमेला प्रारंभ करण्यात आलाय. याच दरम्यान दिल्लीत राम मनोहर लोहिया रुग्णालयाच्या (RML Hospital) डॉक्टरांनी 'कोव्हॅक्सिन'...

BMC: आयुक्तांचे विशेष अधिकार काढले – bmc standing committee meeting agreed to remove the powers of bmc commissioner for corona expenditure

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमार्चपासून करोना प्रतिबंधासाठी महापालिकेने प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. या कालावधीत करोना नियंत्रणासाठी महापालिका आयुक्तांना विशेष अधिकार देण्यात आले. मात्र...

Nashik Municipal Corporation election: शिवसेनेचे मिशन महापालिका सुरू – shiv sena’s mission started for nashik municipal corporation election

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिकशिवसेनेने वर्षभरापूर्वीच मिशन महापालिका सुरू केले असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्षभराची रणनीती ठरवण्यासह नाशिकच्या प्रश्नांवर शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव...

Recent Comments