Home शहरं पुणे Pune corona cases: पुण्यात २४ तासांत करोनाचे ७ बळी - pune corona...

Pune corona cases: पुण्यात २४ तासांत करोनाचे ७ बळी – pune corona cases seven corona patients dead in last 24 hours


पुणेः पुणे शहर आणि जिल्ह्यातील करोना रुग्णांची वाढत असताना मृतांची संख्याही वाढत आहे. पुण्यातील ससून रुग्णालयासह खासगी रुग्णालयात चोवीस तासात ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. त्यामुळे मृतांची संख्या ११५ पर्यंत पोहोचली. मृतांमध्ये ५ महिलासंह दोन पुरुषांचा समावेश आहे.

पुण्यात रविवारी दिवसभरात ५५ जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर शहर-जिल्ह्यात रविवारी दिवसभरात १३८ नवीन करोना रुग्णांची भर पडली आहे. पुणे कँटोन्मेंटमध्ये रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे रुग्णसंख्येने दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. रुग्णसंख्या २०५० एवढी झाली आहे.

स्थलांतरीत मजुरांच्या यादीवर काम सुरू

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या हद्दीतून परराज्यांत किंवा अन्य जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या मजूर, विद्यार्थी, यात्रेकरू आणि अन्य व्यक्तींच्या याद्या पोलिस आयुक्तालयांकडून नेमण्यात आलेल्या पोलिस उपायुक्तांकडून, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात संबंधित तहसीलदारांकडून तयार करण्यात येणार आहे. सध्या याद्या तयार करण्याचे काम सुरू असून, संबंधित नागरिक जाणाऱ्या भागांतील जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाल्यावरच पासेस दिले जाणार आहेत’ असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

मुंबईत करोनाचे ४४१ नवे रुग्ण, २१ मृत्यू; एकूण बाधित ८६१३

धारावीत धास्ती वाढली! ९४ नवे करोनाबाधित; दोघांचा मृत्यू

राज्यातील रुग्णसंख्या १२,९७४वर

करोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असून, आज रविवारी दिवसभरात ६७८ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर २७ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण बाधित रुग्णांची संख्या १३ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. तर, मृत्यूची संख्या ५४८वर गेली आहे. आज ११५ रुग्ण बरे होऊन, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण २११५ रुग्ण करोना आजारातून बरे होऊन घरी परतले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

IND vs AUS 1st Odi 2020: India Tour Of Australia 2020 When And Where To Watch And Follow The Live Streaming Of Australia Vs...

सिडनी: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली वनडे सिडनी क्रिकेट मैदानावर उद्या म्हणजे २७ नोव्हेंबर रोजी होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ...

Shweta Tiwari In Legal Trouble Ex-Employee Alleges Fraud – ५२ हजार पडले महागात! श्वेता तिवारीविरोधात कर्मचाऱ्याने केला कोट्यवधींचा मानहानीचा खटला

मुंबई- श्वेता तिवारी गेल्या काहीदिवसांपासून सतत चर्चेत राहत आहे. एका संकटातून डोकं वर काढत नाही तोवर दुसरं संकट तिच्या पुढे उभं राहत आहे....

GATE 2021 mock test: GATE 2021: मॉक टेस्टसाठी लिंक अॅक्टिव्ह – gate 2021 mock test link for gate 2021 activated on gate iit ac...

GATE 2021: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई (IIT Bombay) ने अभियांत्रिकी पदवीधर एप्टीट्यूड टेस्ट इन इंजीनियरिंग (GATE 2021) साठी मॉक टेस्टची लिंक अॅक्टिव्ह...

Recent Comments