Home शहरं पुणे Pune crime: पिंपरी: एटीएम गॅस कटरने कापला, अवघ्या १० मिनिटांत साडेनऊ लाख...

Pune crime: पिंपरी: एटीएम गॅस कटरने कापला, अवघ्या १० मिनिटांत साडेनऊ लाख पळवले – pune thieves cuts atm steal over rs 9 lakh


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: हिताची मनी स्पॉट एटीएम मशीनचा खालचा भाग गॅस कटरच्या साह्याने कापून त्यातील साडेनऊ लाखांची रोकड लंपास करण्यात आली. चिंबळी येथे रविवारी (१३ सप्टेंबर) मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. एटीएम मशीनमधून पैसे चोरण्याचा अशा घटना पुन्हा घडू लागल्याने चिंता वाढली आहे.

चिंबळी गावापासून १०० मीटर अंतरावर हिताची मनी स्पॉट एटीएम सेंटर असून, या एटीएम सेंटरचा खालचा भाग गॅस कटरच्या साह्याने कापला. त्यानंतर चोरट्यांनी या एटीएम मशीनमधून रोकड लंपास केली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरट्यांनी अवघ्या दहा मिनिटांत मशीनचा भाग कापून, रोकड लंपास केली आहे. या एटीएम सेंटरबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले नाहीत. एटीएम मशीनला असणाऱ्या कॅमेऱ्यावर चोरट्यांनी रंगाचा स्प्रे मारला. त्यामुळे त्यामध्ये चोरट्यांचे चेहरे स्पष्टपणे दिसत नाहीत.

प्रेमविवाह केला, वडिलांनी मुलीच्या पतीची केली हत्या, संसारच झाला उद्ध्वस्त

होम क्वारंटाइनचा बहाणा; ‘शौकीन’ पतीला पत्नीने तरुणीसोबत रंगेहाथ पकडले

पिंपरी: ऑक्सिजन सिलिंडरचा टेम्पो पळवला, करोना संकटात टंचाई असताना झाली चोरी

गेल्या अनेक महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एटीएम सेंटर फोडून चोरी करण्याचे प्रकार पूर्णपणे थांबले होते. त्यानंतर पुन्हा एटीएम चोरी करणाऱ्या टोळीने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसत आहे. याबाबत रविवारी संध्याकाळी उशिरापर्यंत तक्रार देण्यासाठी संबंधित बँक किंवा हिताची मनी स्पॉट कंपनीकडून कोणीही पोलीस ठाण्यात आले नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

धक्कादायक! ऑनलाइन क्लास सुरू असताना शिक्षकाने विद्यार्थिनीला पाठवले अश्लील फोटो

अनैतिक संबंधांत पतीचा अडथळा, पत्नीनं डोक्यात दगड घातलाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sensex today: शेअर बाजार ; नफावसुली जोरात, सेन्सेक्स ४०० अंकांनी कोसळला – Sensex Down By 400 Points As Sell Off Across The Conters

मुंबई : महिनाअखेरच्या शेवटच्या सत्रात गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर विक्रीने सेन्सेक्स आणि निफ्टीच्या घोदौडीला ब्रेक लावला. आज शुक्रवारी सेन्सेक्स ४०० अंकांनी कोसळला आहे. निफ्टीमध्ये...

nashik municipal corporation: पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड – nashik municipal corporation has announced bonus to employees

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिककरोना संकटामुळे महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम झाला असला तरी, आयुक्त कैलास जाधव यांनी सानुग्रह अनुदानाबाबत पालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदाही 'गुड...

Recent Comments