Home शहरं पुणे pune Migrants: पुण्यात वारजे पुलाखाली कामगारांची गर्दी; पोलिसांनी केला लाठीमार - pune...

pune Migrants: पुण्यात वारजे पुलाखाली कामगारांची गर्दी; पोलिसांनी केला लाठीमार – pune lockdown: cops lathi charge migrants as thousands gather near warje bridge


पुणे: कामगारांनी कोणत्या वेबसाइटवर माहिती भरावी, त्याच्या लिंक व इमेल आयडीची माहिती घेण्यासाठी वारजे पुलाखाली सोमवारी सकाळी अचानक मोठी गर्दी जमली होती. तसेच, काही जणांस गावी जाण्यासाठी परवानगी दिल्याचे कळाल्यामुळे काही मजूर व कामगार आले होते. शेवटी पोलिसांना हा प्रकार समजल्यानंतर पोलिसांनी काही कामगारांना लाठ्यांचा प्रसाद देत सर्वांना हुसकावून लावले. त्या कामगारांना आता घरी जाऊन अर्ज भरण्यासाठी मदत केली जात आहे.

पुण्यात कंटेन्मेंट झोन वगळून मद्यविक्रीस अखेर परवानगी

करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देश लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अनेक कामगार पुण्यात अडकले आहेत. शासनाने अशा कामगारांना त्यांच्या गावी जाण्यासाठी आता परवानगी दिली आहे. सध्या या कामगारांना गावी जाण्यास अर्ज करण्यासाठी ई-मेल व वेबसाइटची लिंक देण्यात आली आहे. वारजे पोलिसांनी याबाबतच्या माहितीच्या प्रती काढून वारजे पुलाखाली लावल्या होत्या. त्याची माहिती मिळताच वारजे परिसरातील अनेक कामगारांनी पुलाखाली सकाळी गर्दी केली. तसेच, काही जणांस गावी जाण्यास परवानगी दिली जात असल्याचे कोणी तरी सांगितले. त्यामुळे अनेक कामगारांनी तिकडे धाव घेतली. वारजे पुलाखाली पाचशेपेक्षा जास्त कामगार जमा झाले. त्यामुळे सुरक्षित वावर करण्याच्या आदेशाचे उल्लंघन झाले. या कामगारांनी या ठिकाणी त्यांना तत्काळ त्यांच्या गावी जाऊ देण्यासाठी घोषणाबाजी सुरू केली.

लयभरी! पुण्यातील हॉटस्पॉटची संख्या घटणार

वारजे माळवाडी पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण, जमाव मोठा असल्यामुळे पोलिसांनी काही जणांस लाठ्यांचा प्रसाद देण्यास सुरुवात केली. त्यामुळे जमाव पांगला. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता. शेवटी जमाव पांगविल्यानंतर पोलिसांनी गावी जाणाऱ्या कामगारांच्या वस्त्यांवर जाऊन त्यांना अर्ज भरण्यासाठी मदत सुरू केली आहे. तसेच, गर्दी न करण्याच्या सूचना कामगारांना दिल्या आहेत.

कामगारांनी अर्ज भरण्यासाठी माहिती वारजे पुलाखाली लावण्यात आली होती. त्यामुळे कामगारांनी त्या ठिकाणी सकाळी गर्दी केली होती. त्याची माहिती मिळताच पोलिसांनी जाऊन समजावून सांगत ही गर्दी हटविली. तसेच, कामगारांना त्याच्या घरी जाऊन अर्ज भरण्यासाठी मदत केली जात आहे.

– अशोक कदम, वरिष्ठ निरीक्षक, वारजे माळवाडी

पुण्यात २४ तासांत करोनाचे ७ बळीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

pune phd student murder latest news: Pune Crime: पुण्यात पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याचा खून; चेहरा दगडाने ठेचला – 30 year old phd student murdered...

पुणे: पुणे येथील पाषाण भागातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एनसीएल) येथे पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक...

latest opinion poll 2021: Opinion Poll: मोदी-शहांचे आव्हान परतवत ममता साधणार हॅट्ट्रिक!; दक्षिणेतील ‘या’ राज्यात सत्तांतर? – tmc to retain bengal ldf headed for...

हायलाइट्स:पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी हॅट्ट्रिक साधण्याची शक्यता.आसाम भाजपकडे राहणार तर पुदुच्चेरीत कमळ फुलणार.तामिळनाडूत स्टॅलिन तर केरळात डाव्यांची जादू दिसणार.नवी दिल्ली: पश्चिम बंगाल, आसाम,...

Amravati lockdown news: Amravati Lockdown: अमरावती, अचलपुरात लॉकडाऊन वाढवला; ‘हे’ शहरच कंटेन्मेंट झोन! – lockdown in amravati achalpur extended till march 8

हायलाइट्स:अमरावती विभागात अनेक शहरांत करोनाचे थैमान.अमरावती व अचलपूरमध्ये लॉकडाऊन वाढवला.नागपुरातील स्थिती गंभीर, लॉकडाऊन लावला जाण्याची शक्यता.अमरावती: विदर्भात सध्या अमरावतीमध्ये करोनाने थैमान घातले असून...

Recent Comments