Home शहरं पुणे Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेला थ्री स्टार मानांकन - three star rating...

Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेला थ्री स्टार मानांकन – three star rating for pune municipal corporation


म. टा. प्रतिनिधी, पुणे

केंद्र सरकारच्या कचरामुक्त शहरांच्या स्पर्धेत (गार्बेज फ्री सिटीज्) लाल रेघ मिळाल्यानंतर झालेल्या पुनर्तपासणीमध्ये पुणे पालिकेच्या गुणांकनात सुधारणा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पंचतारांकित दर्जासाठी आटापिटा करणाऱ्या पालिकेला अखेर ‘थ्री स्टार’ मानांकनावर समाधान मानावे लागणार आहे.

केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने देशातील काही शहरांच्या प्रस्तावांचा फेरविचार करून त्यांचे नवे मानांकन जाहीर केले आहे. मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मिश्र यांनीच त्याबाबतची घोषणा केली असून, त्यामध्ये पुण्याला थ्री स्टार मानांकन देण्यात आले आहे. पुण्यासह नगर, विशाखापट्टणम्, बडोदा, बल्लारपूर, नोएडा आणि ग्वाल्हेर या सर्वच शहरांच्या मानांकनात सुधारणा झाली आहे. मंत्रालयाने गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या यादीत राज्यातून केवळ नवी मुंबई महापालिकेलाच पंचतारांकित मानांकन प्राप्त झाले होते. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांनी पंचतारांकित दर्जासाठी प्रस्ताव पाठविला होता. मात्र, देशातील इतर शहरांच्या तुलनेत स्वच्छतेच्या बाबतीत निश्चित केलेल्या निकषांमध्ये दोन्ही महापालिकांना स्थान मिळविता आले नाही.

गेल्या महिन्यात निकाल जाहीर झाल्यानंतर पुणे महापालिकेने केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाशी पत्रव्यवहार करून पुण्याच्या प्रस्तावाची फेरतपासणी करण्याची विनंती केली होती. त्यानुसार पुण्याच्या प्रस्तावाची छाननी केल्यानंतर पंचतारांकित ऐवजी थ्री स्टार मानांकनासाठी महापालिका पात्र ठरत असल्याचे स्पष्ट झाले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

hyderabad rain: ‘हैदराबादमध्ये १०० वर्षांत असा पाऊस पडला नाही’, CM नी केली ‘ही’ मोठी घोषणा – hyderabad had not experienced such heavy rainfall in...

हैदराबादः महाराष्ट्रसोबत तेलंगणमध्ये ( hyderabad rain ) पावसाने प्रचंड नुकसान झाले. महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना अद्याप राज्य सरकारकडून कुठलीही मदत घोषित करण्यात...

Nawab Malik: कोंबडा आरवला नाही तरी सकाळ होते!; फडणवीसांवर राष्ट्रवादीने डागली तोफ – ncp leader nawab malik targets devendra fadnavis

मुंबई: 'कोंबडा आरवला किंवा नाही आरवला तरी सकाळ व्हायची थांबत नाही. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्या कोंबड्यासारखीच अवस्था झाली आहे', अशी...

Recent Comments