Home शहरं पुणे Pune murder: ते पत्ते खेळत होते, कडाक्याचं भांडण झालं अन् क्षणार्धात... -...

Pune murder: ते पत्ते खेळत होते, कडाक्याचं भांडण झालं अन् क्षणार्धात… – pune murder of a security guard in an argument


पुणे : गंगाधाम चौकाजवळ असलेल्या आईमाता मंदिराजवळील मोकळ्या जागेत एका सुरक्षारक्षकाचा लोखंडी पाइपने मारहाण करून खून केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. पत्ते खेळताना वाद झाल्याने हा खून झाल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रकाश खाजाप्पा खाणेकर (वय ३४, मूळ रा. दुधणी, अक्कलकोट, जि. सोलापूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश दिवसा बिगारी काम करून, रात्री एका मोकळ्या प्लॉटमध्ये सुरक्षारक्षकाचे काम करतो. शनिवारी दुपारी तो काही ओळखीच्या लोकांसमवेत मोकळ्या प्लॉटमधील राहत्या शेडमध्ये पत्ते खेळत होता. त्या वेळी झालेल्या भांडणात आरोपींनी प्रकाशला जबर मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. नागरिकांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून एक दांडके हस्तगत केले आहे. प्रकाशला दारूचे व्यसन असल्याने त्याची पत्नी आणि तीन मुले त्याच्यापासून वेगळे राहत होते. पोलिस उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलिस आयुक्त सुनील कलगुटकर, डॉ. शिवाजी पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक घाडगे, पोलिस निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी घटनास्थळी भेट दिली. बिबवेवाडी पोलिस, तसेच गुन्हे शाखेची पथके आरोपींचा माग काढत आहेत.

‘तो’ नराधम धमकी देऊन १६ वर्षीय मुलीवर करायचा अत्याचार

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी ‘त्या’ २७ जणांचे नोंदवले जबाबSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Aditya Roy Kapur: एका कॉलवर आदित्य रॉय कपूरच्या मदतीला धावून आले रामदास आणि सत्यजित पाध्ये – Aditya Roy Kapur Becomes Bollywoods First Actor Get...

मुंबई- अनुराग बसू यांनी दिग्दर्शित केलेला 'लुडो' हा चित्रपट एका ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता आदित्य रॉय-कपूरनं या चित्रपटात एका शब्दभ्रमकाराची भूमिका...

सटाण्यातील व्यावसायिक माखिजा यांची आत्महत्या

म. टा. वृत्तसेवा, सटाणा सटाणा शहरातील बागलाण ब्रॅण्डी हाऊसचे संचालक (वय ६२) यांनी रविवारी सायंकाळी लोहणेर येथील पुलावरून गिरणा नदीपात्रात उडी मारून ...

व्यापारी सासूरवाडीला गेला होता, फ्लॅटवर परतल्यानंतर दृश्य बघून हादरलाच

म. टा. प्रतिनिधी, : सासूरवाडीला गेलेल्या कापड व्यवसायिकाचे घर फोडून चोराने दोन लाखांची रोकड आणि दोन तोळ्याचे दागिने लांबविल्याची घटना सोमवारी (२३ नोव्हेंबर)...

Recent Comments