Home शहरं पुणे pune news News: आणखी दोन हॉस्पिटलमध्ये - in two more hospitals

pune news News: आणखी दोन हॉस्पिटलमध्ये – in two more hospitals


म टा…

Updated:

MT

म. टा. प्रतिनिधी, पुणे शहरातील करोनाबाधितांची वाढणारी संख्या लक्षात घेता महापालिकेने नवीन दोन हॉस्पिटलमध्ये केवळ करोनाबाधितांवर उपचार करण्याची व्यवस्था केली आहे. ‘फ्लू क्लिनिक’ची संख्या कमी करून तेथील मनुष्यबळ या हॉस्पिटलमध्ये वापरण्यात येत आहे. महापालिकेने शहरात थंडी ताप, खोकला; तसेच श्वसनाचे आजार असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ‘फ्लू क्लिनिक’ सुरू केले आहेत. पहिल्या टप्प्यात शहरातील विविध ७४ ठिकाणी ‘फ्लू क्लिनिक’ सुरू करण्यात आले होते; परंतु आता ५६ फ्लू क्लिनिक ठेवण्यात आले आहेत. फ्लू क्लिनिकमध्ये सुमारे २५०० रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यामधून करोनाची लागण झालेले ११ रुग्ण निष्पन्न करण्यात आले आहेत. करोनाबाधितांची वाढणारी संख्या लक्षात घेता आणखी दोन रुग्णालयांमध्ये केवळ करोनाबाधितांवर उपचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दोन रुग्णालयांमध्ये डॉक्टर; तसेच पॅरामेडिकल स्टाफची आवश्यकता होती. त्यासाठी ‘फ्लू क्लिनिक’ची संख्या कमी करून येथील मनुष्यबळ या हॉस्पिटलमध्ये वापरण्यात येत आहे. त्याचबरोबर महापालिकेने प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून मोबाइल क्लिनिक सुरू केले आहे. मोबाइल क्लिनिकद्वारे मोठ्या प्रमाणात रुग्ण तपासण्यात येत आहेत. तसेच, महापालिकेच्या शिक्षकांकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. अशा प्रकारे करोनाबाधितांना निष्पन्न करण्यासाठी महापालिकेकडून वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. याद्वारे आतापर्यंत १११ रुग्ण निष्पन्न झाले असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी सांगितले. शहरातील खासगी डॉक्टरांकडून थंडी ताप, खोकला; तसेच श्वसनाचे आजार असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यात येत नाहीत. अशा रुग्णांना महापालिकेच्या ‘फ्लू क्लिनिक’मध्ये उपचारांसाठी पाठविण्यात येते. खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरू ठेवून उपचार करणे अपेक्षित आहेत. तसेच, शहरातील डॉक्टरांनी फ्लूचे रुग्ण आढळल्यास त्याची माहिती तत्काळ महापालिका प्रशासनाला द्यावी, असे आवाहनही महापालिकेकडून करण्यात आले आहे.

 

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

love jihad: महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’ विरोधाचे सूर; ‘या’ संघटनेचा पुढाकार – rashtriya warkari parishad demands anti love jihad law in maharashtra

अहमदनगर: उत्तर प्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा लव्ह जिहाद विरोधी कायदा त्वरित लागू करावा, अशी मागणी राष्ट्रीय वारकरी परिषदेने केली आहे. या संदर्भात त्यांनी...

indian railway special train: Indian Railway : ३१ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार ‘या’ १३ विशेष रेल्वे – indian railways 13 special train service extended till...

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या पूर्व - मध्य रेल्वे झोनकडून करोना काळात चालवण्यात येणाऱ्या विशेष रेल्वेच्या संचालन कालावधीत वाढ केल्याचं जाहीर करण्यात आलंय....

Recent Comments